1

सचिन खरोखरच देव झालाय का ?


१) अस्तिक आणि नास्तिकांमध्ये जसे देव आहे कि नाही यावरून भांडण चालू असते, त्याप्रमाणे सचिन देव आहे कि नाही यावरून नेहमी भांडण चालू असते.

२) देवाप्रमाणेच सचिनवर टीका केलेली लोकांना (सचिन भक्तांना) आवडत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणारे लेख येतात.
.
३) देवाप्रमाणे हल्ली त्यालाही सोन्या - चांदीच्या वस्तू भेट देण्यात येत आहेत.

४) सामान्य माणसाला मिळालेली भेट तो सहसा सर्वांसमोर विकत नाही. पण देवाला अर्पण केलेल्या गोष्टी(नारळ, साड्या ई. ) ज्या प्रमाणे जाहीररीत्या विकल्या जातात तशीच सचिनची फेरारी सुद्धा विकली गेली.

५) "सचिन जर देव असेल तर तो प्रत्येक सामन्यात चांगला का खेळत नाही ?"
     "जगात जर देव असेल तर तो प्रत्येकाला नेहमी सुखी का ठेवत नाही ?"

६) जगात देवाच्या असण्या/नसण्यावरून एवढे वाद झाले असले तर स्वत: देव येवून काही बोलत नाही तसेच सचिनसुद्धा तो देव आहे की नाही याबद्दल एकही शब्द बोलत नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------

ब्लॉग परत चालू करण्याच्या दृष्टीने हा काही फारसा चांगला लेख नाही. पण Drafts मध्ये उगीच साठवलेले जुने लेख प्रकाशित करण्याचा विचार आहे.  माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे, "तुका म्हणे, 'something is better than अजिबात nothing' ".

1 प्रतिक्रिया:

Ameya said...

खरं तर कोणत्या पण सांघिक खेळात कोणताही एक माणूस देव नसतो. सचिन ला देव हे पदवी देण्यामागच कारण माझ्या मते तरी एवढंच आहे - त्याच्या क्रिकेट मधल्या achievements ह्या अचाट,असामान्य किंवा कोणत्याही दुसऱ्या player ला जवळपास पण जाता येणार नाहीत अश्या आहेत. जर कोणी देव म्हणजे तो खेळताना काहीच चूक करत नाही असा म्हणत असेल तर हा शुध्द वेडेपणा अहे.