1

तुरुंगातील दरोडेखोराची चोरी करण्यासाठी बाहेर जाण्याची मागणी

येरवडा, पुणे - येरवडा तुरुंगात नुकत्याच दाखल झालेल्या प्रकाश पातोळे उर्फ पक्या या अट्टल दरोडेखोराने आपल्याला चोरी करण्यासाठी बाहेर जाऊ द्यावे या आशयाचा अर्ज आज जिल्हा कोर्टात दाखल केला. आपले कुटुंब उपजीविकेसाठी आपल्यावर अवलंबून असून चोरी करणे हा आता आपला व्यवसाय झाला असून तो करण्यासाठी परवानगी मिळावी असे त्याने केलेल्या अर्जात म्हणाले आहे.

गेल्याच पक्याला आठवड्यात चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्या नावावर दरोडा, घरफोडी, पाकीटमारीचे अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. अटक झाल्यापासून तो येरवड्याचा तुरुंगात आहे.

चोरीच्या परवानगीचा अर्ज करून त्याने सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली. 'आपली पत्नी आणि तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे. चोरीच्या व्यवसायावरच आपले पोट अवलंबून आहे. त्यामुळे हा व्यवसाय करण्याची अनुमती आपल्याला मिळावी. शिवाय, संसद, राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मला माझ्या भागातील लोकप्रतिनिधींपर्यंत माझ्या भागातील प्रश्न पोचवायचे आहेत.' अशी मागणी त्याने केली आहे.

(संपूर्ण काल्पनिक..)

1 प्रतिक्रिया:

vaibhav_sadakal said...

kay kalpana aahe................................