3

window shopping

ट्रेकिंग करताना किल्ल्यांतून फिरताना जुन्या काळातील window shopping बद्दल मनात आलेला एक विचार -

कदाचित जुन्या काळीही राजघराण्यातील लोक window shopping करत असतील. कदाचित ते जरा वेगळ्या प्रकारचे असेल. ते सध्यासारखे नसेल तर खरोखरचे शॉपिंग असेल. राजघराण्यातील राण्या किल्ल्याच्या खिडकीत बसून "तो दूरवर दिसणारा किल्ला आपल्याकडे हवा" किंवा "त्या शेतात फार आंब्याची झाडे दिसत आहेत. तिकडे आंबे आण जरा" असे म्हणत असतील का ? आणि जर एखादा "शौकीन" राजा असेल तर "ती नदीकाठी कोण नवीन मुलगी दिसते आहे रे ? जरा चौकशी करा" असे म्हणत असेल का ?
0
भारतीय बुद्धी अमेरिकेला भारी

भारतीय मिडियाला कोणत्याही गोष्टीतील "भारतीय कनेक्शन" शोधायची हौस का आहे हे मला समाजत नाही. उद्या ओबामांचे भारतीय कनेक्शन सांगताना त्यांच्या लहानपणीच्या घराजवळील चौकात जो मेक्सिकन भिकारी होता त्याला भारतीय अन्न आवडायचे, अशी बातमी आली तर मला नवल वाटणार नाही.
5
पुण्यातील रस्त्यांवर गाडी चालवताना सिग्नलला थांबणे म्हणजे real-life tetris खेळण्यासारखे आहे असे मला वाटू लागले आहे. सिग्नलला वाहनांच्या ३-४ रांगा लागलेल्या असतात. आपल्या गाडीचा आकार आणि कुठल्या दिशेला वळायचे आहे ते बघून एका रांगेत उभे राहायचे. सिग्नल जास्त वेळ असेल तर सगळ्या रांगेतील इंच-न-इंच जागा भरते. टेट्रीस मध्ये ज्या प्रकारे सगळ्या रांगा पूर्ण भरल्या कि लगेच गायब होतात त्याच प्रकारे सिग्नलला भरलेल्या रांगा सिग्नल सुटला कि लगेच गायब होतात आणि नवीन रांगा लागतात.
1

तुरुंगातील दरोडेखोराची चोरी करण्यासाठी बाहेर जाण्याची मागणी

येरवडा, पुणे - येरवडा तुरुंगात नुकत्याच दाखल झालेल्या प्रकाश पातोळे उर्फ पक्या या अट्टल दरोडेखोराने आपल्याला चोरी करण्यासाठी बाहेर जाऊ द्यावे या आशयाचा अर्ज आज जिल्हा कोर्टात दाखल केला. आपले कुटुंब उपजीविकेसाठी आपल्यावर अवलंबून असून चोरी करणे हा आता आपला व्यवसाय झाला असून तो करण्यासाठी परवानगी मिळावी असे त्याने केलेल्या अर्जात म्हणाले आहे.

गेल्याच पक्याला आठवड्यात चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्या नावावर दरोडा, घरफोडी, पाकीटमारीचे अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. अटक झाल्यापासून तो येरवड्याचा तुरुंगात आहे.

चोरीच्या परवानगीचा अर्ज करून त्याने सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली. 'आपली पत्नी आणि तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे. चोरीच्या व्यवसायावरच आपले पोट अवलंबून आहे. त्यामुळे हा व्यवसाय करण्याची अनुमती आपल्याला मिळावी. शिवाय, संसद, राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मला माझ्या भागातील लोकप्रतिनिधींपर्यंत माझ्या भागातील प्रश्न पोचवायचे आहेत.' अशी मागणी त्याने केली आहे.

(संपूर्ण काल्पनिक..)