3

window shopping

ट्रेकिंग करताना किल्ल्यांतून फिरताना जुन्या काळातील window shopping बद्दल मनात आलेला एक विचार -

कदाचित जुन्या काळीही राजघराण्यातील लोक window shopping करत असतील. कदाचित ते जरा वेगळ्या प्रकारचे असेल. ते सध्यासारखे नसेल तर खरोखरचे शॉपिंग असेल. राजघराण्यातील राण्या किल्ल्याच्या खिडकीत बसून "तो दूरवर दिसणारा किल्ला आपल्याकडे हवा" किंवा "त्या शेतात फार आंब्याची झाडे दिसत आहेत. तिकडे आंबे आण जरा" असे म्हणत असतील का ? आणि जर एखादा "शौकीन" राजा असेल तर "ती नदीकाठी कोण नवीन मुलगी दिसते आहे रे ? जरा चौकशी करा" असे म्हणत असेल का ?
0
भारतीय बुद्धी अमेरिकेला भारी

भारतीय मिडियाला कोणत्याही गोष्टीतील "भारतीय कनेक्शन" शोधायची हौस का आहे हे मला समाजत नाही. उद्या ओबामांचे भारतीय कनेक्शन सांगताना त्यांच्या लहानपणीच्या घराजवळील चौकात जो मेक्सिकन भिकारी होता त्याला भारतीय अन्न आवडायचे, अशी बातमी आली तर मला नवल वाटणार नाही.
5
पुण्यातील रस्त्यांवर गाडी चालवताना सिग्नलला थांबणे म्हणजे real-life tetris खेळण्यासारखे आहे असे मला वाटू लागले आहे. सिग्नलला वाहनांच्या ३-४ रांगा लागलेल्या असतात. आपल्या गाडीचा आकार आणि कुठल्या दिशेला वळायचे आहे ते बघून एका रांगेत उभे राहायचे. सिग्नल जास्त वेळ असेल तर सगळ्या रांगेतील इंच-न-इंच जागा भरते. टेट्रीस मध्ये ज्या प्रकारे सगळ्या रांगा पूर्ण भरल्या कि लगेच गायब होतात त्याच प्रकारे सिग्नलला भरलेल्या रांगा सिग्नल सुटला कि लगेच गायब होतात आणि नवीन रांगा लागतात.
1

तुरुंगातील दरोडेखोराची चोरी करण्यासाठी बाहेर जाण्याची मागणी

येरवडा, पुणे - येरवडा तुरुंगात नुकत्याच दाखल झालेल्या प्रकाश पातोळे उर्फ पक्या या अट्टल दरोडेखोराने आपल्याला चोरी करण्यासाठी बाहेर जाऊ द्यावे या आशयाचा अर्ज आज जिल्हा कोर्टात दाखल केला. आपले कुटुंब उपजीविकेसाठी आपल्यावर अवलंबून असून चोरी करणे हा आता आपला व्यवसाय झाला असून तो करण्यासाठी परवानगी मिळावी असे त्याने केलेल्या अर्जात म्हणाले आहे.

गेल्याच पक्याला आठवड्यात चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्या नावावर दरोडा, घरफोडी, पाकीटमारीचे अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. अटक झाल्यापासून तो येरवड्याचा तुरुंगात आहे.

चोरीच्या परवानगीचा अर्ज करून त्याने सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली. 'आपली पत्नी आणि तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे. चोरीच्या व्यवसायावरच आपले पोट अवलंबून आहे. त्यामुळे हा व्यवसाय करण्याची अनुमती आपल्याला मिळावी. शिवाय, संसद, राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मला माझ्या भागातील लोकप्रतिनिधींपर्यंत माझ्या भागातील प्रश्न पोचवायचे आहेत.' अशी मागणी त्याने केली आहे.

(संपूर्ण काल्पनिक..)
9

काय म्हणता ?

"काय राजा, काय म्हणतोस ? शिक्षण संपले न तुझे आता ? आता पुढे काय ? नोकरी ? कुठे ? तुला Infosys मध्ये पण मिळाली होतीस ना ? मग तिकडे का नाही जात ? माझ्या अमुक-अमुक चा तमुक आहे Infosys मध्ये"
"काय राजा, काय म्हणते नोकरी ? तुम्हा IT वाल्यांची ऐट असते एकदम. ५ दिवस काम, २ दिवस आराम !"
"काय राजा, कालची रेव्ह पार्टी आणि अटकेची बातमी वाचलीस का ? IT वाले होते म्हणे बरेच. तुझ्या ओळखीचे होते का कोणी ? तुम्ही असले काही करत नाही ना ? तुम्ही चांगल्या संस्कारी घरातील मुले असे काही करणार नाहीच म्हणा, पण काळजी वाटते म्हणून विचारले."
"काय राजा, नोकरी लागली, आता जागेचे काय ? काय म्हणतोस ? भाव वाढलेत ? ते पण आहेच म्हणा, पण खरे सांगू का, तुम्हा IT वाल्यांमुळेच पुण्यात जागेच भाव एवढे वाढले आहे. "
"काय राजा, अमेरिकेला जाणारेस म्हणे, छान छान, इकडे परत येणारे का तिकडेच settle होणार आता ?"
"काय राजा, आहे का ओळख ? नाही तू आता अमेरिका रिटर्न, तू कशाला आमची ओळख ठेवतोस ?"
"काय राजा, आता लग्न कधी ? का जमवले आहेस तू तुझे तुझे ? तसे असले तरी आम्हाला सांगितलेस तरी चालेल हो ! हल्लीची पिढी पुढारलेली आहे. "
"काय राजा, कसा चालू आहे संसार ? लग्न बाकी उत्तम झाले हो ! आणि आपल्यातीलच केलीस हे उत्तम !"
"काय राजा, good news कधी देणार आहेस ?"
"राजा, good news मिळाली हो ! अभिनंदन !"
"राजा, मुलगा अगदी गोड आहे, तुझ्यावरच गेलेला दिसतोय."
"काय राजा, काय नाव ठेवलेस मुलाचे ? अथर्व ? उत्तम !"
"काय राजा, मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहेस ? तू काय इंग्रजी शाळेतच घालणार म्हणा ! फिया केवढ्या वाढल्यात हल्ली ! तरी तुमचे double income आहे, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. "
.
.
.
(अशीच बाष्कळ बडबड..)
.
.
.
"काय राजा, मुलाला पण कॉम्पुटर इंजिनियर करणार का ?"
"काय राजा, पेढे कुठे आहेत अथर्वच्या बारावीच्या निकालाचे ? "
"काय राजा, मुलाला कुठे मिळाली admission ? PICT ? हे कुठे आहे ? हल्ली काय म्हणा, गल्लोगल्ली कॉलेजेस निघाली आहेत. पैसे फेका आणि डिग्र्या घ्या. "
.
.
"काय अथर्व, शिक्षण संपले ना तुझे ? आता पुढे काय ?"
6

Random Thoughts - 12

१) पुण्यातील खड्डे आणि गतिरोधक यांची तुलना -
साम्ये -
रस्त्यावर कुठेही, कोणत्याही आकारात, कोणत्याही कारणाशिवाय उगवतात.
एकदा उगवले कि लवकर जात नाहीत.
गाडी २ फुटावर नेल्याशिवाय त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही.
दोघांमुळे पाठीला तेवढाच त्रास होतो.
फरक -
गतीरोधकामध्ये खड्डा असू शकतो. खड्ड्यात गतिरोधक नसतो.

२) १०० च्या स्पीडने दुचाकी चालवताना रस्त्यावर समोर कुत्रा आल्याचा अनुभव आला आहे का कधी ? ज्याप्रमाणे Infinite improbability drive विश्वातील प्रत्येक ठिकाणी almost एकाच वेळी जाऊन येते, त्याचप्रमाणे कुत्रा दिसल्यापासून अपघात होईपर्यंत/ टळेपर्यंत almost एकाच वेळी सगळ्या विचारांना भेट देऊन येते.

३) " काय बोलले आहे यापेक्षा ते कोणी बोलले आहे हे जास्त महत्वाचे आहे." - पु. ल. देशपांडे
सध्या या वाक्याचा बराच अनुभव येताना दिसतोय. राजकारणात तर फारच !

वरील वाक्यासमोर पुलंचे नाव लिहिण्यामागे दोन उद्देश आहेत. पहिले म्हणजे हे त्यांचे वाक्य आहे आणि जर तुम्हाला हे वाक्य समजले असेल तर दुसरा उद्देश सांगायची गरज नाही.

४) पुण्यात सिटीप्राईडचे अजून एक मल्टीप्लेक्स चालू होणारे. ते वाचून माझ्या मनात आलेला हा ग्राफ -

५) अमिताभ आता दिसेल ते उत्पादनांच्या जाहिराती करत आहे. आता फक्त sanitary napkin ची जाहिरात बाकी आहे. कदाचित काही दिवसांत तो ती पण करेल. अक्चुली, ती जाहिरात कशी असेल याबद्दल मी अंदाज केला आहे. जाहीरातीत अमिताभ म्हणेल, "आयुष्याच्या एका टप्प्यावर मला जीवनसाथी म्हणून दोन पैकी एका स्त्रीला निवडायचे होते. मी जयाला निवडले कारण तिच्याजवळ होता आत्मविश्वास, जो फक्त ... वापरून मिळतो."
3

पुणेकर काय काय करतात ?

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करतात.
गुलाबी थंडीचा आस्वाद घेतात.
भक्तीरसात चिंब होतात.
स्वरगंगेत न्हाऊन निघतात.
उकाड्याने हैराण होतात.
महागाईने/भारनियमाने त्रस्त होतात.
साथीच्या रोगाने रुग्णशय्येवर पडतात.
खरेदीचा मनमुराद आनंद लुटतात.
पावसाळ्याचा सुरुवातीला "आयुधे" विकत घेवून सज्ज होतात.
एखाद्यास उस्फुर्त मदत करतात.
एखाद्याच्या गाण्याला मनापासून दाद देतात.
गटारीला किलोच्या किलो मटण/चिकन फस्त करतात.
हिवाळ्यात शेकोटीच्या आश्रयाला स्थिरावतात.
एखाद्या समस्येने चिंतातूर होतात.

------------------------------------------------

दैनिक सकाळ मधील (मला आत्ता आठवलेली) हि काही ठरलेली वाक्ये ! हल्ली सकाळची दुसऱ्या दिवसाची मुख्य बातम्या काय असतील हे आता मला बऱ्यापैकी सांगता येवू लागले आहे.
1

The Peter Serafinowicz show

काही दिवसांपूर्वी BBC ची The Peter Serafinowicz show हि विनोदी मालिका पाहिली. classic British comedy आणि The Onion News चा sarcasm या दोघांचा उत्तम मिलाफ यात आहेत. पण दुर्दैवाने (as usual BBC) फक्त ६ भागानंतर हि मालिका बंद झाली.

या मालिकेतील काही निवडक videos -1

मनमोहनसिंग आणि H2G2

काल The Telegraph मधील Does the Prime Minister Matter ? हा लेख वाचला आणि Hitchhiker's guide to the galaxy मधल्या President ची आठवण झाली. यातील galaxy च्या President चे वर्णन करतान लेखक म्हणतो,
It might not even have made much difference to them if they'd known exactly how much power the President of the Galaxy actually wielded: none at all. Only six people in the Galaxy knew that the job of the Galactic
President was not to wield power but to attract attention away from
it
.

भारतात मनमोहनसिंग हेच काम करत आहेत का ?