5

Random Thoughts - 9

या वेळचे Random Thoughts जरा वेगळे आहेत. हल्ली एखादा विचार आला कि तो लगेच बझवर टाकून मी मोकळा होतो. त्यामुळे बरयाच दिवसात असा लेख लिहिला नव्हता. खाली दिलेले विचार हे खरे म्हणजे वेगवेगळ्या लेखांच्या कल्पना आहेत. कधीकाळी ड्राफ्ट्समध्ये साठवलेले लेख आज वाचत होतो. कधीतरी त्यावर विचार केलेला असल्यामुळे ते डिलीट करणे जीवावर आले आणि त्यांचे पूर्ण लेख बनवणे जास्तच जीवावर आले होते. तेंव्हा असे लेख खाली लिहित आहेत.

1) मध्यंतरी मजीद माजिदीचे चित्रपट पाहण्याचा योग आला. त्याने दिग्दर्शित केलेले The Willow Tree, Baran, The Color of Paradise, Children of Heaven, Pedar, Avaze gonjeshk-ha असे सहा चित्रपट पाहिल्यावर माजिदीमय झालो होतो. छोट्या छोट्या गोष्टींतून नेमका आशय मांडणे, मुलगा-बाप यांचे नाते, इराणचा सुंदर निसर्ग(इराण मध्ये एवढा सुंदर निसर्ग आहे, असे मला वाटले पण नव्हते !), पाण्याच्या वेगवेगळ्या रूपांचा कल्पकतेने केलेला वापर - त्याच्या चित्रपटाची वैशिष्ठे सांगावी तितकी कमीच आहेत. नेहमीच्या हॉलीवूड, बॉलीवूडच्या चित्रपटांपेक्षा हे चित्रपट पाहणे हा एक सुखद अनुभव होता.

2) मला GF नाही याबद्दल बरयाच टिप्पण्या ऐकावया लागतात.
a) तू काय, मुलगी पटवलीच असशील, छुपा रुस्तुम आहेस तु !
b) तू काय पुण्याला आहेस, मुलींची काही कमी नाही तिथे !
c) तू काय IT मध्ये आहेस, मुली नुसत्या मागे लागत असतील तुझ्या !
d) तू एवढा ब्लॉग लिहितोस, मुली फुल फिदा असतील तुझ्यावर !
यांची आता सवय झाली आहे मला. पण मागच्या आठवड्यात आत्तापर्यंत न ऐकलेली अजून एक comment ऐकली. -

"तु पुरुष आहेस, मुलगी पटवण्यासाठी अजून काय लागते ? " - आवरा ! GF नाही म्हणून काहीही ऐकून घायचे का ?

3) पुण्यातील पादचाऱ्यांचे आणि मुख्यत: समोरच्या वाहनांना हिरवा सिग्नल लागल्यावरच रस्ता ओलांडायला सुरुवात करणार्यांचे मला नवल वाटते. स्वारगेटच्या चौकात मला रोज असे लोक दिसतात. तिथे आधीच सिग्नलला प्रचंड गर्दी असते. सगळे वाहनचालक सिग्नलकडे डोळे लावून बसलेले असतात. Matirx Revolution मध्ये machine army ने zion ला ड्रील पाडल्यावर ज्या वेगाने छोट्याश्या भोकातून tiny machines आतमध्ये येतात तसेच काहीतरी हिरवा सिग्नल लागल्यावर पुण्यात होते. आणि त्याचवेळेस काही लोक समोरून रस्ता ओलांडायला घेतात. अर्थात ते पण जीव मुठीत धरूनच चाललेले असतात. पण मी तेंव्हा गाडीवर असतो. त्यामुळे माझा दृष्टीकोन वेगळा असतो.

5 प्रतिक्रिया:

ANAGHA said...

Different strokes with random thoughts...
I agree, Buzz and Tweets have kinda totally got the blogging scene down.. Nonetheless, ppl like you keep inspiring lower beings like me to post something... :)
And couldn't agree more on point no 3... Kai vede loka aahet.. I cross my irritation levels at such times.. Rather than 'Matrix', I feel like doing an 'Apocalypse Now' to them :P

zampya said...

आजच गुगल बझ वर आम्ही दखल झालो आणि तुमचा ब्लॉग सापडला.प्रथमच येथे धडकलो. लेखासह थीमही खूप आवडली.आता येत जाऊ असेच तुम्हाला सतवायला. :)

BinaryBandya™ said...

"तु पुरुष आहेस, मुलगी पटवण्यासाठी अजून काय लागते ? " - आवरा ! GF नाही म्हणून काहीही ऐकून घायचे का ?हाहा मस्तच ...

Maithili said...

हे हे.. भार्री...भन्नाट एकदम....!!! :D

Sagar Kokne said...

पोस्ट नंबर २...कैच्याकै