10

Random Thoughts - 10

१) आता फ्लेक्स/होर्डींग्स हि काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. रस्त्याने जाताना जाहिरातींचे फ्लेक्स सारखे नजरेस पडतात. ज्या फ्लेक्सवर जाहिराती नसतात त्यांवर संबंधित जाहिरात कंपनीचे नाव आणि फोन नंबर असतो. मग या जाहिरात कंपन्या स्वत:ची जाहिरात कशी करतात ? रिकाम्या फ्लेक्सवरील कंपनीची माहिती आणि कंपनीची जाहिरात यातील फरक कसा ओळखायचा ?यात दोघांत काही फरक असतो का ?
समजा तुम्हाला एकाद्या फ्लेक्सवर स्वत:च्या उत्पादनाची जाहिरात करायची आहे. तुम्ही त्या फ्लेक्सवर लिहिलेल्या नंबरवर फोन केलात आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले, "अहो तो फ्लेक्स आमचा नाहीये. तिथे फक्त आमच्या कंपनीची जाहिरात आहे. आमच्या कंपनीचे फ्लेक्स दुसऱ्या ठिकाणी आहेत. त्याबद्दल माहिती सांगू का ?" तर तुम्हाला कसे वाटेल ?

२) प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध जाणे जर चांगले असते तर वन-वे मध्ये चुकीच्या बाजूने येणारे वाहनचालक भारी असतात का ?

३) पुण्यात पी.एम. टी. गणपती, रक्षाबंधन, नवरात्र इत्यादी सणांच्या निमित्ताने जादा बसगाड्या सोडते आणि मग या जादा गाड्यांमुळे किती नफा झाले ते काही दिवसांनी वर्तमानपत्रात येते. त्यावेळी मला असा प्रश्न पडतो कि या जादा गाड्या आणतात कुठून ? आणि रोज लोक बसमधून प्रचंड गर्दीमधून जात असताना यातल्या काही गाड्या का सोडत नाहीत ?

४) हा PICT बद्दलचा माझा एक चांगला अनुभव आहे. कॉलेजात असताना मी एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता पण मिळण्याची फारशी अपेक्षा नव्हती. आता तर मी त्याबद्दल विसरूनही गेलो होतो. पण काही दिवसांपूर्वी कॉलेजातील एका कार्यालयीन कर्मचार्याने मला चक्क फेसबुक शोधून add केले आणि शिष्यवृत्तीचा धनादेश आला आहे, तो घेवून जा असे सांगितले. माझा तर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. त्या कर्मचार्याच्या wall वर जाऊन बघितले असता बहुतांश नोंदी कॉलेजशी संबंधित होत्या.(अमुक-तमुक फोर्म आलेत, धनादेशासंदर्भात भेटा इत्यादी, इत्यादी.) कॉलेजने फेसबुक वर असे official account उघडायला काय हरकत आहे ? किंवा कॉलेजची स्वत:ची वेबसाईट आहेच कि. त्यावर द्या कि हि माहिती ! तसेही सगळे जग एका क्लिकच्या अंतरावर आले आहेच. :P

५) परवाच 80-20 rule चा कुठेतरी उल्लेख वाचला. माझ्या आयुष्यात आता बऱ्याच ठिकाणी apply होतो. माझी gtalk list, facebook friend list, कार्यालयातील कर्मचारी ई. ई.

६) कोणी कसली जाहिरात करावी हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सचिनची कपडे धुण्याच्या पावडरची जाहिरात, किरण बेदींची No-Marks ची जाहिरात बघून कसेतरीच वाटते. या जाहिराती स्वीकारण्यापूर्वी ते काय विचार करत असतील ?

७) मी वेगाने दुचाकी चालवत असताना जेवढा comfortable असतो तेवढा वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर मागे बसल्यावर नसतो. समोरच्यावर विश्वास नाही म्हणा किंवा माझ्या हातात कंट्रोल नसल्याची भावना म्हणा, पण जरा वेगळे वाटते. मी अशीच गाडी चालवत असताना मागे बसणाऱ्याला असेच वाटत असेल का असा विचार येतो. तर असेच एका मागे बसून जाताना double seat bike racing ची कल्पना मला आली. साधी bike race आता जुनी झाली आहे (अर्थात, त्यातले धोके अजूनही आहेत !). माझ्या मते, साध्या बाईक रेस पेक्षा double seat bike race जास्त आव्हानात्मक असेल कारण त्यात दोघांचे को-ओर्डीनेशन लागेल. असल्या रेसचा विचार आधी कोणी केलाय कि नाही ?

10 प्रतिक्रिया:

Gaurav said...

मी अशीच गाडी चालवत असताना मागे बसणाऱ्याला असेच वाटत असेल का असा विचार येतो

Same thoughts..Very nicely written...

Mrunal said...

Double seat bike race awadlay ! :)
Bakki uttam ! :)

Mrunal said...
This comment has been removed by the author.
THE PROPHET said...

लय भारी!
जाहिरात आणि डबलसीट बाईक रेसिंग जाम आवडले!
बाकी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा मुद्दाही विचार करण्याजोगा आहे!

आनंद पत्रे said...

मस्त आहेत, पण काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय ;)

अभिजीत said...

गौरव, मृणाल, विभी,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

आनंद,
धन्यवाद :)
काही विचार ब्लॉगवर टाकताना censor केले. ;)

tanvi said...

किरण बेदी आणि सचिनच्या जाहिरातींबाबतचे मुद्दे जास्त पटले... अर्थात बाकिचेही पटलेच :)

tanvi said...

किरण बेदी आणि सचिनच्या जाहिरातींबाबतचे मुद्दे जास्त पटले... अर्थात बाकिचेही पटलेच :)

अभिजीत said...

तन्वी ताई,

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

Yogesh said...

भारीच...मुद्दा २,३ अन ६ विचारकरण्यासारखे आहेत.