4

ध्यासपर्व

ध्यासपर्व : रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनकार्यावर आधारलेला चित्रपट.
अमोल पालेकारांचे उत्कृष्ट दिग्दर्शन. रघुनाथरावांच्या भूमिकेतील किशोर कदम आणि मालतीबाईंच्या भूमिकेतील सीमा विश्वास यांचा सहजसुंदर अभिनय !

संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक असलेल्या रघुनाथरावांच्या जीवन संघर्षाचे नेमके चित्रीकरण चित्रपटात केले आहे. सततच्या बाळंतपणामुळेच तत्कालीन समाजात स्त्रियांचे वाढते मृत्यू होत असल्याचे जाणून सर्व समाजच रोष पत्करून पत्नी मालतीबाईंच्या मदतीने संतती नियमनाचा प्रसार सुरु केला. paris ला जाऊन या संबंधीची सर्व शास्त्रीय ज्ञान प्राप्त केले. परत इकडे येवून "समाज स्वास्थ्य " या मासिकाद्वारे समाजातील लैंगिक अंधश्रद्धा, संतती नियमनाची गरज. लैंगिक रोग या विषयीच्या प्रश्नांना वाचा फोडली.

दुर्दैवाने आजही परिस्थिती परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे असे वाटत नाही. आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या नेतृत्वाखाली कुटुंबनियोजनाची जबरदस्ती झाल्यावर सरकार आता हा प्रश्न हाताळण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसत नाही. या विषयावर बोलणे अजूनही taboo मानले जाते.

र.धों. कर्वे यांच्या कार्याची माहिती करून घेण्यासाठी हा चित्रपट बघणे मस्ट आहे.

4 प्रतिक्रिया:

THE PROPHET said...

मी ध्यासपर्व थोडासा बघितला होता एकदा टीव्हीवर. कलाकारांचे अभिनय फारच दमदार वाटले होते मला.
पुन्हा रधोंचं कार्य महत्वाचं आहेच!
बघेन लवकरच!

tanvi said...

मुळात नावचं बघ किती बोलके आहे... एका ’ध्यासाचे’ पर्व.... रधोंविषयी बरेच ऐकले होते म्हणून आवर्जून पाहिला होता हा सिनेमा... किशोर कदम आणि सीमाचा अभिनयही त्याच ताकदीचा....
पोस्ट लिहावी वाटली तुला ही याबद्दल खरे तर तुझेच कौतूक..

(माझ्या या आधिच्या कमेंट्स सारखी ही पण गायब न होवो म्हणजे मिळवले...)

अभिजीत said...

विद्याधर, तन्वी ताई,
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

तन्वी ताई,
तुझी कोणती comment डिलीट झाली आहे ?

tanvi said...

अरे कमेंट डिलीट झालेली नाहिये पण इथे घोळ काय होतो की मी कमेंट टाकली की ब्लॉगरबुवा मला अरेबिक मधे काहितरी मेसेज देतात.... जो मला अर्थातच समजत नाही... मग त्याच्या लांबीवरून ती कमेंट तुम्हाला मिळालीये की गायब झालीये असा अंदाज बांधते ;).... काल पहिल्यांदाच तुझ्या ब्लॉगवर मला लांब वाक्यात अरेबिक मेसेज आला म्हणजे कमेंट तुला मिळाली :)यापुर्वी २/३ वेळा गायब झाल्यात कमेंटा....