3

जाहिराती : आज - कल

हल्ली जाहिरातींचा सुद्धा रटाळ होवू लागल्या आहेत. अर्थात जाहीरांतीचा उद्देश एकच असला तरी innovative जाहिराती हल्ली कमी झाल्या आहेत.( At least मी ज्या वेळी बघतो तेंव्हा तरी त्या फारश्या नसतात.) मागे मी एकदा चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या साच्याबद्दल लिहिले होते. असाच जाहिरातींचा साचा सुद्धा बनला आहे असे मला वाटते. तर अश्या साच्यातील जाहिराती बनवण्याची कृती खालीप्रमाणे -

१) तुम्हाला ज्या वस्तूची जाहिरात करायची आहे त्याच्याशी संबधित समस्या घ्या. तुमचे पूर्ण जीवनाची त्या समस्येमुळे वाट लागली आहे (आय.टी. वाल्यांच्या भाषेत P1 blocker bug ) असे सांगा.

२) तुमचे सगळे मित्र या समस्येमुळे तुमची हेटाळणी करत आहेत असे दाखवा. (उदा, कमी उंची, लहान केस, केसात कोंडा, काळा चेहरा, पूर्ण साफ न धुतलेले कपडे, डाग पडलेली लादी इत्यादी इत्यादी )

3) तुम्ही सगळी उत्पादने वापरून बघितली तरी कसलाच उपाय होत नाही.

4) मग एक डॉक्टरचा कोट घालून चष्मा लावलेला माणूस (ज्याचे जाहिरातीतील आडनाव कपूर, कुमार असे काहीतरी असते !) एक उत्पादन दाखवतो आणि एक ग्राफ दाखवतो. त्यावर २ उत्पादनांची तुलना केलेली असते. ज्यानुसार "सामान्य" उत्पादनाच्या तुलनेत ज्याची जाहिरात आहे ते उत्पादन दुप्पट/तिप्पट चांगले असते. हे उत्पादन म्हणे science आणि nature चे perfect combination असते. आणि हा डॉक्टर कोणत्यातरी संस्थेत या उत्पादनावर रिसर्च करत असतो.

5) हे उत्पादन वापरल्यावर तुमचे अवघे जीवनच बदलून जाते. तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळतो. सुंदर तरुण/तरुणी तुमच्या मागे लागतात, नवरा/बायको खुश होते इत्यादी इत्यादी.

दूरदर्शनवर बघण्यासारखे कार्यक्रम फारसे नसतात म्हणून म्हणून मी जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले होते पण आता जाहिरातीसुद्धा बघणेबल राहिल्या नाहीत. आणि सारखा India TV बघून सुद्धा आता त्याचा कंटाळा येवू लागला आहे. या वाहिनीला प्रतिस्पर्धी वाहिनी का निघत नाहीये अजून ?

3 प्रतिक्रिया:

THE PROPHET said...

हे एकदम बेस्ट ऑब्झर्व्हेशन आहे!
जाहिराती टाईपकास्ट होऊ लागल्यात...
९० च्या दशकातली मजा राहिली नाही!
आणि इंडिया टीव्ही ला कॉम्पिटिटर येणं... मुश्किल ही नही...नामुमकिन है!

आनंद पत्रे said...

:)

Sagar Kokne said...

चांगले निरीक्षण केले आहे...
आणि त्यात पण सेलेब्रिटीसना( अभिनय क्षेत्रात नसलेल्या) घेऊन केलेल्या जाहिराती पाहताना अजुनच दया येते.