9

चित्रपटगृहात राष्ट्रगीत - योग्य कि अयोग्य ?

हल्ली चित्रपटगृहात चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येते. एका ठिकाणी वाचलेल्या माहितीनुसार ६५ सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळेपासून चित्रपटगृहात चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येत असे. तेंव्हा वातावरण राष्ट्रभक्तीने भरलेले होते. पुढे पुढे, चित्रपट संपल्यावर प्रेक्षक लगेच बाहेर पडू लागत किंवा जागेवर बसून राहत, त्यामुळे राष्ट्रागेताचा अपमान होत असे. त्यामुळे हि प्रथा बंद करण्यात आली होती. दोन दशकांपूर्वी बंद करण्यात आलेल्या या पध्दतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शासनाने या प्रकारचा कायदा केला आहे कि नाही या बद्दल मला अधिक माहिती कळली नाही.

या पद्धतीविषयी लोकांच्या मनात संमिश्र भावना आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे -

पाठींबा देणाऱ्या -
१) हि फार चांगली पद्धत आहे. हल्ली राष्ट्रगीत फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीलाच टी.व्ही. वर बघण्यास मिळते .
२) मोठ्या पडद्यावर राष्ट्रगीत चालू पाहून देशभक्तीने मन एकदम भरून येते. नाहीतरी हि भावना हल्ली फारशी मनात येत नाहीच.
३) राष्ट्रगीत चालू असताना पडद्यावर जो व्हीडीओ दाखवतात तो बघताना एकदम भारी वाटते.

विरोध करणाऱ्या -
१) राष्ट्रगीताला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण चित्रपटगृह हि काय राष्ट्रगीत लावण्याची जागा आहे का ? लोक तिथे मनोरंजनासाठी आलेले असतात. राष्ट्रगीत ऐकण्यासाठी नाही.
२) चित्रपटगृहात प्रवेश करताना एका हातात कोकची बाटली, एका हातात पोपकोर्न असतात. मग समोर अचानक राष्ट्रगीत सुरु झाले कि काय करावे ते सुचत नाही.
३) चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे म्हणजे सक्तीची देशभक्ती आहे. आणि राष्ट्रगीत चालू असताना उभे राहण्याची सक्ती कशाला ? जागेवर बसून मला देशाभिमान व्यक्त करता येत नाही का ?
४) जर राष्ट्रगीत लावायचेच आहे तर मग फक्त चित्रपटगृहातच का ? कार्यालये, महाविद्यालये, संसद आणि इतर सर्व ठिकाणी का नाही ?

याबाबत आपले मत काय ?

9 प्रतिक्रिया:

Abhishek said...

अभिजीत
प्रथम, हा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन..

१० वर्षापुर्वी मी शाळेतुन मी बाहेर पडलो, त्यानंतर राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचा प्रसंग सार्वजनिक जीवनात फ़ारच कमी आला (अपवाद,१५ ओगस्ट/२६ जानेवारी,ते सुद्धा कधीतरी)
अशावेळी,चित्रपट्ग्रुहात होणारे राष्ट्रवंदन नक्कीच सुखकारक आहे..

मोठ्या पडद्यावर राष्ट्रगीत ऐकताना आजही अंगावर काटा येतो.
आजवरचा अनुभव आहे की कोणीही सिनेमाग्रुहात राष्टगीताची अहवेलना केली नाही. सर्वजण आवर्जुन उभे राहतात.

राष्ट्र्गीतासाठी दाखवले जाणारी द्रुष्येही समर्पक असतात (अपवाद ईंडियन आयडल्सची चित्रफ़ित)

आपला देश लोकतांत्रिक आहे, परंतु "सक्तीची देशभक्ती" ह्या नावाखाली बरेच लोक मनमानी करत आहेत,त्याना ईंगा दाखवला पाहिजे.

मी या प्रथेचे पुर्ण समर्थेन करतो

Potter said...

चांगला विषय आहे.
१. खरं तर चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावण्यामागे एखादच कारण आहे असं मला वाटत नाही. दैनंदिन जीवनात खरच राष्ट्रगीत कानावर पडत नाही हे अगदी खरं आहे.
२. साधारण दीड वर्षांनी राष्ट्रगीत कानावर पडले म्हणून असेल किंवा अजून काही पण मला तरी ऐकून खूप भारावून गेलो हे खरे.
३. चित्रपटगृहात राष्ट्रगीत नको असेल तर हा राष्ट्राचा अपमान आहे असं कोणाला म्हणल तर कोणी पण चिडेल. ज्यांना राष्ट्रगीत नको असं वाटत त्यांना देशावर प्रेम नाही वगरे वाद घातला तर ते बावळटपणाचं आहे. On the other hand, जर का चित्रपटगृहात राष्ट्रगीत हि सक्तीची देशभक्ती वाटत असेल तर त्यांनी उशिरा यावे चित्रपटगृहात. राष्ट्रगीत का लावतात असं विचारून वाद विवाद कशाला करा ?
४. ह्यावरून एक पुणेरी पाटी पण लावता येईल मग चित्रपटगृहाच्या बाहेर - "राष्ट्रगीत चालू झाल्यावर उभे राहायचे नसेल तर उशिरा जा." :-P

आनंद पत्रे said...

मी विरोधी गटातला केवळ क्र. ३ साठी असहमत.

THE PROPHET said...

विरोधी लोकांच्या प्रतिक्रिया 'आवरा' आहेत.
लेख जाम आवडला! :)

कांचन कराई said...

दैनदिंन आयुष्यात राष्ट्रगीत कानावर फारसे पडत नाही म्हणून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते हे ठीक आहे. पण कितीतरी लोक राष्ट्रगीत सुरू असताना एक मिनिटही जागेवर शांत उभे राहू शकत नाहीत. चित्रपटगृहामधे राष्ट्रगीताची धून वाजत असताना पडद्यावर निरनिराळी दृष्ये दाखवली जातात. देशभक्तीने ऊर भरून येतो, हेही ठीक आहे. पण राष्ट्रगीताची लांबी किती असावी यालाही मर्यादा आहेत, त्यांचे उल्लंघन होत असते. मिनिटभरापेक्षा सावधान स्थितीत कुणीही उभे राहू शकत नाही अशा परिस्थितीत मोठ्या मोठ्या गायकांचे हावभाव, भारतातील निसर्गसौंदर्य आणि सैनिकांचा कदमताल पडद्यावर दाखवताना राष्ट्रगीताची धून किती लांबत चालली आहे, हे कोण पहाणार?

सोहम said...

चित्रपट गृहात राष्ट्रगीत लावले जाते ही गोष्ट योग्य आहे.
राष्ट्रगीत चालु असताना उभे रहाणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे पण सक्तीचे नाही.
अर्थात कोणताही सच्चा देशप्रेमी अस करणार नाही पण राष्ट्रगीत चालु असताना उभे न रहाणे हे कायद्याने गुन्हा ठरत नाही.
२००५ मध्ये लालु प्रसाद व राबडी देवी प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालात ही ह्याचा उल्लेख आढळतो.

संदर्भ :

http://www.rediff.com/news/2005/feb/04anthem.htm
http://www.mha.nic.in/pdfs/Prevention_Insults_National_Honour_Act1971.pdf

Jitesh Shah said...

1) Ase temporary "desh-bhaktine man bharun aale" prasang useless ahet. 5 mintanni me desh-bhakti baddal sagLa visarto and movie enjoy karat asto (and ti mostly engraji movie aste)

2) Rashtrageet he lokanchya manat korayla pahije and tya sathi schools/college/work-place ya sarkhya jaaga mahatvachya ahet. Movie la yenari loka bahercha jag visrayla movie la aaleli astat. tya atmosphere madhe rashtrageetacha respect ulat kami hoto.

Me asa notice kela ahe ki shaLet jehva rashtrageetala ubha rahaycho or atta pan 15th aug la jehva ubha rahto.. tehva jya feelings yetat tyachya 1% pan theathres madhe yet nahit.

3) mazya mate tari rashtrageet ka asta tar tumhi deshasathi kahi karayla jaata (military, sports, etc), tehva inspiration miLava and hausla pakka vhava mhanun rashtrageet vaprava.. aslya khusllak thikani vaparna is a waste of rashtrageet.

me tar mhantoy, rashtrageet barobar thodi bhagwat geeta pan aaikava.. lokanchya vagnyat farak padel ka tyane?

(marathi comment english madhe type kelyabaddal kshamasv)

Vedang said...

I'm with Jitesh on this. I think it is an insult of the National Anthem to play it in a theatre. The national anthem should be played to build a feeling of unity. This is the reason we sang the national anthem in school, it makes us forget our differences and unite for a common love. I can understand and appreciate the national anthem being played in sports (eg in World Cup), but it is just insulting to have it playing in the theatres (inspiring movie montage alongside or otherwise)

Sagar Kokne said...

विषय चांगला आहे..पण विरोध करणार्‍यांना आजच्या स्वातंत्र्याची किंमत कळत नाही एवढेच म्हणून शकतो