6

पुणेरी वेटर

तिरसटपणाबद्दल पुणेकर प्रसिद्ध आहेतच. नुकताच विद्याधरने पुण्याबद्दल लेख लिहिला आहे. तो वाचून मला पुण्यातील काही तिरसट उत्तरांची आठवण झाली. जरी येथील दुकानदारांच्या तिरसटपणाचे बरेच किस्से आहेत तरी इथल्या हॉटेलातील वेटरसुद्धा काही कमी नाही. मला किंवा माझ्या मित्रांना आलेले पुणेरी वेटरांचे काही अनुभव सांगत आहे.

१) स्थळ : Up & Above - मागवलेली रोटी एकदम गार आली. त्याबद्दल विचारले असता वेटरचे उत्तर - "साहेब, इकडे खूप गार हवा आहे ना, त्यामुळे किचनमधून इथपर्यंत येताना गार झाली."

२)स्थळ : जाधवगड - या जुन्या गढीचे विठ्ठल कामतांनी resort मध्ये रुपांतर केले आहे. तिथे मागवलेला चहा कोमट होता. तो गरम का नाही याबद्दल विचारले असता उत्तर आले- "आम्ही मायक्रोव्हेव मध्ये चहा गरम करतो, त्यामुळे नीट गरम झाला नसेल"

३) स्थळ : हॉटेल समुद्र - ऑर्डर देऊन बराच वेळ झाला तर मागवलेले पदार्थ येत नव्हते म्हणून आमच्या टेबलजवळच उभ्या असलेल्या वेटरला अजून किती वेळ लागेल असे विचारले. "तुम्ही मला ऑर्डर दिली आहे का ? " त्याने बाणेदारपणे विचारले. मी नाही म्हणाल्यावर ''हा माणूस उगीच का त्रास देतोय ?" असा भाव चेहऱ्यावर आणून तो चक्क तिथून निघून गेला.

४) स्थळ : Hotel Oasis - veg clear सूप मागवलेले असताना cream of tomato सूप आले. ते परत घेवून जाण्यास सांगितल्यावर तो उत्तरला, "साहेब, घ्या कि हेच. तसेही सगळे सेमच असते"

५) स्थळ : गुड लक - इथले वेटर तर इथे वर्षानुवर्षे काम करून एकदम तयार झाले आहेत. मी बघितलेला १ किस्सा. एक बाई आणि तिची मुलगी हॉटेलात आली होती. त्यांनी कोणतीतरी डिश मागवली होती. ती डिश apparently गोड असते पण इथे तिखट बनून आली.
बाई - अहो, हि डिश गोड असते. तुम्ही तिखट केलीये.
वेटर - आमच्या इथे आम्ही अशीच बनवतो. आधी विचारायला हवे होते तुम्ही.
बाई - जाऊदे, डिश cancel करा मग.
वेटर - (चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव) इथे डिश cancel पण होत नाही. पाहिजे तर दुसरी डिश करा अजून ऑर्डर.

६) स्थळ : हॉटेल रुतू'ज गार्डन - हे हॉटेल लहान असल्यामुळे मालकच बरेचदा वेटरचे काम करतो. तर या हॉटेलचे त्याने ठरवलेले काही अलिखित नियम खालीलप्रमाणे-
अ) जर एक-दोन माणसे आली असतील आणि अख्खे हॉटेल जरी रिकामे असेल तरी त्यांनी ६ लोकांच्या टेबलवर बसायचे नाही.
ब) बसल्यावर ५ मिनिटांच्या आत ऑर्डर द्यायची.
क) सगळी ऑर्डर एकदम द्यायची. आत्ता थोडी, नंतर थोडी, असे चालणार नाही. फक्त जीरा राईस आणि दाल फ्रायची ऑर्डर नंतर दिली तरी चालेल.
ड) लिंबू सरबताची ऑर्डर पण आधीच द्यावी लागते. कमीत कमी ४ ग्लास हवे असेल तरच ऑर्डर स्वीकारली जाते.
यापैकी कोणताही नियम पाळला नाही किंवा मालकाच्या मनात आले तर तो लगेच तुम्हाला बाहेर काढू शकतो.

6 प्रतिक्रिया:

THE PROPHET said...

अशक्य भारी लिहिलंयस!
हे मुपी मधे पाठवून दे!

Praj ~ said...

aamhala ek waiter mhanla hota 'chyayla lai kaam ahe.. tumcha tumhi wadhun ghya'
lol

भानस said...

हा हा... एकदा गोव्याहून परत येतांना बस हातखंब्याला जेवणाच्या स्टॉपसाठी थांबली. रात्रीचा एक वाजून गेलेला, अगदी अन्नावर वासनाच नव्हती तरी बळजोरीने पुलाव मागवला तर त्याच्यात चक्क चार इंचाचा मोठ्ठा खिळा आला. वेटरला बोलावून दाखवले तर मोठ्यांने हसून म्हणतो कसा, " अहो खिळा कुठेयं, मुळा आहे तो. नीट पाहतच नाही तुम्ही लोक आणि काय पन बोलता की. " आम्ही दोघे अवाक... :(

मालकांना सांगितले तर चक्क म्हणे पैसे घेणारच पाहिजे तर अजून एक पुलाव देतो तुम्हाला.

Abhishek said...

१ . "साहेब, इकडे खूप गार हवा आहे ना"
साहेब????
:-)

अपर्णा said...

ha ha ha...aata ekda punya nagarit jawach lagel....
BTW looks like you do not reply to your comments..

Vikrant Deshmukh... said...

अभिजीत,
तू माझा हा लेख वाचलास की नाही?
http://vikrantdeshmukh.blogspot.com/2010/08/blog-post.html