5

Random thoughts - 7

१) खजुराच्या लोणच्याचा शोध कसा लागला असेल ?

एकदा एका सुनेने चुकून २ किलो खजूर एकदम आणला. ते पाहून तिची सासू चिडली आणि तिला म्हणाली, "एवढ्या खजुराचे काय लोणचे घालायचे आहे का ?" सुनेच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. "आंब्याचे लोणचे करतात तर खजुराचे लोणचे करून का बघू नये" असा विचार तिने केला आणि अश्या रीतीने खजुराच्या लोणच्याचा जन्म झाला.

२) परवाचीच गोष्ट आहे !
ऑफिसातून घरी येताना माझ्या पुढे एक काकू "बायकांच्या नॉर्मल स्पीड"ने activa चालवत होत्या. त्यांच्या मागच्या सीटवर त्यांचा कुत्रा तोल सांभाळून बसला होता. मागच्या सीटवर कुत्रा न बांधता नुसताच बसलेला बघितला नव्हता मी अजून कधी ! गाडी चालवणाऱ्या काकू आणि तो कुत्रा दोघांचेही कौतुक वाटले मला.


३) "कुस्ती" चित्रपटाचा प्रोमो बघितला. पैलवान खली अभिनय करतो आहे या चित्रपटात. हिंदी चित्रपटातील नाच-गाण्याचा अट्टाहास डोक्यात जातो बरेचदा. खलीला काय नाचवता अरे ! नाचताना (आणि एकूणच सगळीकडे) तो थर्ड क्लास animated movie मधले बेढब पात्र वाटतो. अजून किती गाण्यांत नाचणार आहे तो कोणास ठाऊक !


४) काल पहिल्यांदाच घुंगरू न लावलेले उसाचा रस काढणारे यंत्र बघितले. व्यवस्थित चालते कि ते पण :P

५) हा फारच वेगळ्या प्रकारचा विचार आहे.
फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्ब कसा फोडायचा ?
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या परिसरात बॉम्ब असलेली दुचाकी फारसा विचार न करता पार्क करा. फार विचार न करता या विभागात गाडी लावली तर ती खात्रीने "No Parking" विभागातच लावली जाते. ५-१० मिनिटांमध्ये वाहतूक पोलिसांचा ट्रक येवून तुमची गाडी घेवून फरासखाना पोलीस स्टेशनात घेवून जाईल. झाले तुमचे काम !

आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या परिसरातच बॉम्ब फोडायचा असेल तर ?
जरा विचार करून, बरोबर पार्किंग विभागातच गाडी पार्क करा.६) कधी कधी मला वाटते कि आपल्या देशाचे "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य बदलून "All iz well" ठेवावे कि काय ? एवढ्या depressing घटना घडत आहेत आजूबाजूला, अश्या खोट्या आशेची तरी गरज आहे आपल्याला.

७) माझ्या सेलफोनचा display बंद पडल्यापासून आंधळा माणूस जसा मोबाईल वापरेल तसा मी वापरतोय. कोणाचा call आल्यावर आवाज ओळखला नाही तर उगीच फोन बिघडल्याची टेप वाजवावी लागते. जर येणाऱ्या call ला शझाम software वापरून फक्त "hello" शब्द ऐकून call कोणाचा आहे ते कळले असते तर किती बरे झाले असते !
त्याच्या पुढे जाऊन, भेटणाऱ्या लोकांवर त्याचा उपयोग करून "ओळखलस का ? मागच्या वेळी भेटलो होतो तेंव्हा एवढासा होतास !" असे विचारून बुचकळ्यात टाकणाऱ्या लोकांना याचा उपयोग करून ओळखता आले तर किती बरे होईल !

5 प्रतिक्रिया:

Maithili said...

arree kasali bhaarrii aahe hi post....
1. Khajuraache lonache aste...???
2. Are waah ( He tya Bhoo bhoo sathi )
3. हिंदी चित्रपटातील नाच-गाण्याचा अट्टाहास डोक्यात जातो बरेचदा. खलीला काय नाचवता अरे ! नाचताना (आणि एकूणच सगळीकडे) तो थर्ड क्लास animated movie मधले बेढब पात्र वाटतो. patale...
4. Hehe... mastach....
6. agdi kharey....

Pratik said...

1 Bhaari aahe... Trademark Abhijeet Vaidya, as usual :)

5 Agadi Kharay!

"Random" updates "regularly" taakat jaa :)

danin said...

Bharii ahe Vaidya saheb

सतीश गावडे said...

मित्रा,

काल मराठी ब्लॉगवर तुझ्या नोंदीचा संदर्भ मिळाला आणि मग तुझ्या सार्‍या नोंदी अधाशासारखा वाचत सुटलो...

खुप छान लिहितोस तू. मोजक्या शब्दांत, हलकं फुलकं पण तरीही वस्तूस्थितीचा अचूक वेध घेणारं...

आनंद पत्रे said...

आवडेश