11

तारीफ पे तारीफ

कॉलेजनंतर लगेच नोकरी पकडल्याचा एक फायदा म्हणजे बहुतेक प्रत्येक विकांतामध्ये आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटण्याच्या निमित्ताने एकाद्या हॉटेलात जाऊन मनसोक्त हादडतो. त्यामुळे महाराष्ट्रीयन, कोल्हापुरी, थाई, Mexican, चायनीज, इटालियन खाद्यपदार्थ मिळणाऱ्या सगळ्या बहुतेक सगळ्या हॉटेलांची वारी झाली आहे. अश्याच प्रकारे नवीन हॉटेलांचा शोध घेताना मागच्या वर्षी "तारीफ" या हॉटेल बद्दल कळले आणि तेंव्हापासून तारीफ हे आमच्या "Best hotels for chicken" च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

औंधमध्ये सर्जा हॉटेलच्या जरा पुढे Naturals आईस्क्रीम पार्लरच्या शेजारी तारीफ आहे. हॉटेल तसे लहान आणि मागच्या बाजुला असल्यामुळे तेथे हॉटेल आहे हे आधी कळतच नाही. हॉटेलात ४-४ लोकांसाठीची फक्त ८-१० टेबले आहेत. त्यामुळे जर मोठा ग्रुप असेल तर थांबावे लागते. हि जागा जुन्या राजस्थानी पद्धतीने सजवली आहे. टेबलावर बसल्यावरच किचनचा काही भाग दिसतो आणि आपली भूक चाळवते.

तारीफ हे मुख्यत: मुघलाई जेवण, कबाब, बिर्याणीसाठी प्रसिद्ध असले तर तिकडची प्रत्येक डिश उत्तम असते. चिकन तंदुरी, चिकन बिर्याणी या आमच्या तिथल्या ठरलेल्या डिशेस आहेत. प्रत्येक वेळी आम्ही एक नवीन कबाब चाखून बघतो. एखादी डिश चांगली असेल कि नाही नाही हा प्रश्नच तिकडे पडत नाही. ऑर्डर केलेल्या डिशमध्ये वेगळे काय असेल हाच प्रश्न असतो ! तिथले कबाब हे पुण्यात सर्वोत्कृष्ट आहेत असे आमचे मत आहे. चिकनप्रमाणाचे तिकडे असणारे माशांच्या डिश पण अप्रतिम असतात.

सामन्यात: अश्या प्रकारच्या हॉटेलमध्ये शाकाहारी मेनू फक्त नावाला असतो. पण इकडे शाकाहारी पदार्थ पण उत्तम असतात. नुसते शाकाहारी खाण्यासाठी पण इकडे येता येईल. (अर्थात, मी तिकडे शाकाहारी खाल्लेले नाही. माझ्या एका घासफूस खाणाऱ्या मित्राचे हे certificate आहे.) तिकडचे desserts विशेषत: "शाही तुकडा" खरोखरच शाही असतो.

तारीफबद्दल सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे हॉटेलचा मालक. प्रसन्न स्वभावाचा, गप्पिष्ट माणूस आहे हा ! बाहेर वाट बघताना किंवा आत बसून खाताना मधून मधून येऊन गप्पा मारत बसतो तो. आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या गप्पांचा कंटाळा येत नाही. :P

मनसोक्त चिकन हादडल्यावर तिथेच शेवटी दिले जाणारे पान खाऊन शेजारी असलेल्या Naturals मध्ये जाऊन आईस्क्रीम खाणे मस्ट असते.

जर तुम्ही औंध मध्ये असाल किंवा चांगले कबाब खाण्याची इच्छा झाली तर मुद्दाम वाट वाकडी करून तारीफ ला भेट द्या.


----------

हि माझी पहिलीच खादाडीची पोस्ट आहे. आणि तरीही मी तिथले फोटो टाकले नाहीयेत. कारण तारीफच्या एवढ्या सुंदर डिशेस समोर असताना त्याचे फोटो काढत बसणे मला जमले नसते. दगडातून नग्नसुंदरीचे शिल्प तयार करताना शिल्पकार समोर नग्न सुंदरी असताना दगडावर हातोडी मारत बसतो, तसा मनोनिग्रह माझ्याकडे नाही. ;)


------

अपडेट : आत्ताच चिन्मयने सांगितलेल्या माहितीनुसार टेस्टी खाना ने कालपासून home delivery च्या लिस्ट मध्ये तारीफचा समावेश केला आहे.

11 प्रतिक्रिया:

hrishikesh said...

tareef chya jevanache photo lavanya pekshya, post wachun tithe jevun alelya mandali n shi kiti sundar jevan zhale hya baddal gappa marnyat jasti majya e :P

hrishikesh said...
This comment has been removed by the author.
Praj ~ said...

post this on burrp.com
http://pune.burrp.com/listing/taareef_aundh_pune_restaurants/170879039

Mahendra Kulkarni said...

नक्की जाइन पुढल्या पुणे भेटीत.

THE PROPHET said...

>>दगडातून नग्नसुंदरीचे शिल्प तयार करताना शिल्पकार समोर नग्न सुंदरी असताना दगडावर हातोडी मारत बसतो, तसा मनोनिग्रह माझ्याकडे नाही. ;)

उपमेसाठी त्रिवार सलाम!

आनंद पत्रे said...

प्रॉफेट + १...

Sandeep said...

Waiting jast asel tar to Malak welcome drink pan deto, of course complimentary!
Me abhimanane sangu shakto ki tithali ek hi non-veg dish me khayachi rahileli nahi. Ulat Menu Card war nasnari Tandoori Surmai dish kharach khooop bhari ahe.. Wicharun bagha.. nirasha honar nahi!

अभिजीत said...

संदीप,
मी पण welcome drink प्यायलो आहे तिकडे आणि तू म्हणतोस ती सुरमई ची डिश पण ट्राय केली आहे. तिथल्या "off the menu" डिशेस पण अप्रतिम आहेत.

Abhijit Dhariya said...

dhanywad...lavakarach janar aahe ghaspus khayala !

kiran said...

Uttam, Ata ha post vachlya nantar tondala pani sutale ahe. Lavkarach Ek vaari karavi lagel taarif chi :)

भानस said...

तारीफ की तारीफ सुनके बहोत दिल कर रहा हैं जाने का... :) आशा आहे शाकाहारीही तितकेच तारीफेकाबील असेल.