7

ऑफिसातील मायक्रोव्हेव ओव्हन

मी ऑफिसमध्ये डबा घेवून जातो हे कळल्यावर माझी दूरच्या नात्यातील एक काकू branded आणि महागातला जेवणाचा डबा घ्यावा म्हणून माझ्या मागे अडून बसली. अर्थातच तिच्याकडे त्या डब्यांची agency आहे. (असले कोणत्यातरी agency असलेले नातेवाईक सगळ्यांनाच असतात का ? :P) मी तिला माझा डबा चांगला असल्याचे नाना परीने पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी तिने तिचे राखीव हत्यार काढले.

काकू - " तुझा डबा स्टेनलेस स्टीलचा असल्यामुळे त्यातील जेवण गार होते. माझ्याकडील डब्यात अन्न गरम राहते."
मी - "आमच्या ऑफिसात मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्यात जेवण गरम करता येते."
काकू - "पण त्यासाठी काचेची भांडी लागणार ना मग ? मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये स्टील कसे चालणार ? "
मी - "आमच्या मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये चालते सगळे"
काकू - "तुला घ्यायचा नसेल डबा तर सरळ सांगून टाक ना तसे. उगीच थापा का मारतोस ?"
मी - "डबा मला घ्यायचा नाहीये. पण मी थापा मारत नाहीये. आमच्या ऑफिसमधील मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये खरच काहीही ठेवलेले चालते"

खरच ! ज्यांना-ज्यांना मी हे सांगतो त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये high frequency radio waves असतात जे अन्नातील रेणुंवर आदळून त्यांना आपल्या जागेवरून हलवतात. रेणू एकमेकांवर आदळून उष्णता तयार होते नि पदार्थ तापतो. धातू सामान्यपणे विद्युत सुवाहक असल्यामुळे जर धातू ओव्हन मधेय ठेवले तर या waves च्या मार्गात अडथळा येतो. त्यामुळे मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये धातू वापरू नये अशी सूचना असते.

अर्थात घराच्या ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. पण हा ओव्हन ऑफिसचा असल्यामुळे एवढा विचार कोणी केला नसावा. जेवणाच्या वेळेस अन्न गरम करण्यासाठी आमचे जेष्ठ सहकारी त्यात स्टीलची भांडी ठेवताना बघून आम्ही पण सर्रासपणे हे करण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे ओव्हनला काही त्रास झाला नाही. अन्न व्यवस्थित गरम होते. ओव्हनचा स्फोट वगैरे काही होत नाही.

आमच्या ओव्हनमध्ये स्टील ठेवलेले का चालते याची काही गमतीशीर कारणे आम्ही शोधली आहेत -
१) हा खरा ओव्हन नाहीये. तिकडे खालती gas शेगडी आहे.
२) या ओव्हन ला patch मारला आहे.
३) ओव्हनमध्ये स्टीलला काचेमध्ये tyepcast केले जाते.

आपल्याला आयुष्यात असे बरेचदा सांगण्यात येते की एखादी गोष्ट करू नका नाहीतर मोठे नुकसान होईल आणि आपण भीतीने ती गोष्ट करत नाही. पण शेवटी एखादेवेळेस चुकून आपण ती गोष्ट करतो आणि आपल्याला कळते की ती गोष्ट केली तर काही नुकसान होत नाही तर फायदाच होतो.

[नोंद :ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवा हे सांगण्यास हा लेख लिहिलेला नाही. मी फक्त माझा अनुभव सांगितला आहे. तुमच्या ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवल्यावर तुमचे काही नुकसान झाले तर त्याला मी जबाबदार नाही. ]7 प्रतिक्रिया:

Akshay Sumant said...

hehe Abhijit tu sangitlela kissa khara aahe asa sangnaara mi ek witness :p Pan microwave madhe steel chi bhandi bilkul chalat nahit (Normal microwave madhe !) Thevlyas sparks hotat. Tyamule aaplya office chi case ajab aahe. Ha "ase karu naye" phobia nahi !

अभिजीत said...

अक्षय,

मला वाटतंय की normal microwave मध्ये स्टीलची भांडी ठेवल्यावर फक्त sparks येतात. बाकी काही होत नाही. अशी भांडी ठेवून ओव्हन गंडला आहे असा दुर्दैवी माणूस कोणाला माहित आहे का ?

हेरंब said...

हॉ अभिजीत. ओव्हनल गंडवणारा दुर्दैवी माणूस ही कमेंट टाकतोय. अर्थात मी नाही गंडवलं.. आमच्या ऑफिसमधल्या एकाने गंडवलं. आणि ओव्हन मरतुकड्या फुलबाजीप्रमाणे ४ स्पार्क्स टाकून गतप्राण झाला.
त्यामुळे तू शोधलेल्या कारणांमधलं पाहिलं कारण मला जास्त संयुक्तिक वाटतंय :P

pashanbhed said...

तुमचा ओव्हन कोणत्या कंपनीचा आहे? अन मॉडेल काय? मी पण तोच घेईन.

अभिजीत said...

हेरंब,
पहिले कारण संयुक्तिक वाटत असले तरी हे लक्षात घेतले पाहिजे की प्लास्टिक आणि काचेच्या भांड्यातील पदार्थ व्यवस्थित गरम होतात. कदाचित स्टीलच्या भांड्यांसाठी शेगडी चालू करत असतील आणि बाकीच्यांसाठी ओव्हन :P

@ pashanbhed
Samsung चा आहे तो. model माहित नाही. बघून सांगतो.

अक्षय said...

आमच्याही ऑफिस मधल्या oven मध्ये आम्ही स्टील ची भांडी सर्रास ठेवतो..
आणि सगळी ovens अजून चालू आहेत.
बहुदा हा company specific नसून global प्रकार असावा..

तरी अझीन्गोच्या oven ला आमच्या शुभेच्छा..
कळावे accenture चा oven!

Nikhil Talpallikar said...

ek number re ... steel la glass madhe typecast ... lol