4

TEDx @ पुणे

TEDx चा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यासाठी स्वयंसेवकांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. जागतिक दर्जाचा कार्यक्रम करण्यसाठी आम्हांस स्वयंसेवकांची गरज आहे. कृपया TEDx च्या mailing list चे सदस्य होवून आम्हाला मदत करा. प्रकल्प आरंभाची सभा शानिवारी २७ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत SICSR (Symbiosis Institute of Computer Studies and Research, Model Colony. नकाशा ) होईल . कृपया सभेस या. सभेस कोणीही हजर राहू शकतो. सभा नि:शुल्क आहे.

TEDx बद्दल थोडेसे :सेन्धील मुल्लैनाथान यांचा हा TED वरील व्याख्यानाचा हा video आहे. "आपण साध्या समस्या उपाय माहीत असूनदेखील कश्या सोडवू शकत नाही ?" या विषयावरचे हे भाषण बघून आपणांस TED वरील भाषणांची कल्पना येईल. प्रणव मिस्त्रीचा हा Sixth sense technology चा video तर आपण बघितलाच असेल.

TEDx हि TED ची स्थानिक पातळीवरील आवृत्ती आहे. तुम्हाला TED बद्दल माहिती असेल किंवा TED चे काही videos आपण बघितलेही असतील. TED हि ना-नफा तत्वावर काम करणारी एक संघटना आहे. प्रेरणादायी कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटनेतर्फे जगभरात विविध ठिकाणी व्याखानसत्रे आयोजित केली जातात. एखाद्या कल्पनेत असणाऱ्या जग बदलण्याच्या शक्तीवर TED चा विश्वास आहे. म्हणूनच TED उत्कृष्ठ विचार असलेल्या कल्पना भाषणांच्या स्वरुपात एकत्र करत आहे. आणि या भाषणांचे video सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. TED हे "Technology, Entertainment and Design" चे लघुरूप आहे. पण आता जगाला बदलून टाकणारी कोणतीही कल्पना TED मध्ये समाविष्ट होते.

TEDx हे TED च्या मानांकनानुसार भरणारे स्थानिक पातळीवरील व्याखानसत्र आहे. अर्ध्या किवा पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात निमंत्रित, काळजीपूर्वक निवडलेल्या लोकांची व्याखाने होतात. कोणतेही व्याखान १८ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचे नसते. विषय वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात. कार्यक्रमात फक्त व्याखाने असतात. इतर काही नाही. आणि ही व्याखाने खरोखर सुंदर असावीत आमची इच्छा आहे. व्याखाने जी श्रोत्यांना विचारमग्न किंवा अचंबित करतील !

माझी खात्री आहे कि पुण्यात अश्या बऱ्याच व्यक्ती आहेत. त्यांना शोधण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. जयंत नारळीकर, अरविंद गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती संभावित वक्त्यांच्या यादीत आहेत. यांना बोलावण्याचा प्रयत्न आम्हीच करूच, पण याच बरोबर, तरुण, फारश्या प्रसिद्ध नसलेल्या पण पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरू शकतील अश्या कल्पना असणाऱ्या वक्त्यांची आम्हाला गरज आहे.

असे वक्ते शोधण्यास आम्हास मदत करणार ना ? तर मग, २७ तारखेच्या सभेला या. आणि TEDxPune group चे सदस्य व्हा. (किंवा TEDxPune ला Twitter वर follow करा.)


[Punetech वरील या लेखाचा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे . आहे. एकाद्या इंग्रजी लेखाचे मराठीत भाषंतर करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.]

4 प्रतिक्रिया:

हेरंब said...

अप्रतिम कल्पना. प्रणव मिस्त्रीच्या 'सिक्स्थ सेन्स' वाल्या भाषणामुळे मी TED चा पंखा झालो. महान आहेत ते लोक.

तुमच्या उपक्रमास शुभेच्छा !!

Maharashtra Navnirman Sena said...

फक्त व्याख्यानच असावे असा नियम नाही.
तुम्हाला कोणतीही कला सादर करता येते. www.ted.com वर मल्लिका साराभाई, शिवमणी, व अनेक कलाकारांनी आपली कला सादर केलेली दिसेल.

kiran said...

वैद्य साहेब,
मला TEDx पुण्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे ऐकून नितांत आनंद झाला. मी या कार्यास पाठींबा देत, सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन देतो.
आणि भाषांतर अगदी बेचूक आणि नेमके आहे.

अभिजीत said...

@हेरंब,
धन्यवाद

@मनसे,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. असा काही नियम नाहीये.

@किरण,
धन्यवाद