9

अमेरिकेचे अध्यक्ष अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज संध्याकाळी अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार झाले. ओसामा नावाच्या अतिरेक्याने केलेल्या बेछुट गोळीबारीत ते जागच्या जागी मरण पावले. "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

ओसामा गेल्या महिन्यापासूनच चर्चेत होता. अमेरिकेच्या विमानतळावर उतरल्यापासूनच त्याचे वागणे वेगळे होते. समोरचा माणूस अस्वस्थ होईपर्यंत त्याच्याकडे एकटक बघण्याचा विचित्र आजार त्याला होता. अमेरिकन विमानांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यात आई मरण पावल्यावर तो आपल्या मोठ्या भावाकडे राहण्यासाठी आला होता. विमानतळावर तपासणी चालू असतानाच त्याने अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याचे मनसुबे जाहीर केले होते. "माझे नाव ओसामा आहे आणि मी अतिरेकी आहे." हा निरोप त्याला अध्यक्षांना सांगायचा होता. हातात मशीनगन घेवून तो मधून मधून "शुटींग" करत असे. "सगळे मुसलमान अतिरेकी नसतात" असे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांवर तर तो फारच चिडत असे.

"मी अतिरेकी आहे" अशी कबुली दिल्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. पण ही घटना अभूतपूर्व असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. खरा अतिरेकी कधी अशी कबुली देत नाही असे वारंवार सांगून त्यांनी सरकारवर त्याला सोडण्यासाठी दबाव आणला होता. "ओसामा खरच अतिरेकी आहे का ?" यावर एक sms contest सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ९० % लोकांनी तो अतिरेकी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याची सुटका झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने sms पाठवणा~यांचे आभार मानून अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या अतिरेक्यांविरुद्ध अमेरिका लढत आहे ते अतिरेकी नक्की आहेत तरी कसे हे जाणून घेण्यासाठी अध्यक्षांनी आपल्यासोबत एखादी बियर पार्टी आयोजित करावी अशी सूचना त्याने केली होती. "I can screw up almost anything" असा बोर्ड घेवून तो दारोदार भटकत होता.

अखेरीस ओबामांनी त्याला भेटायचे मान्य केले. आज संध्याकाळी त्यांची भेट एका पटांगणात झाली. दोघांचेही समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. हातमिळवणी आणि बियरची १-१ बाटली झाल्यावर ओबामांनी "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" अशी घोषणा केली. त्यावर प्रतिकिया म्हणून ओसामाने हातातल्या बंदुकीने ओबामांवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बियरमध्ये काहीतरी मिसळलेले असावे असा अंदाज विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.

"मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर अतिरेक्यांसोबतचेच नव्हे तर सर्वच ठिकाणाचे युद्ध संपवीन आणि मगच नोबेल पारितोषिक स्वीकारीन" अशी घोषणा ओसामाने केली आहे. त्याला हंगामी अध्यक्ष बनवण्याच्या जोरदार हालचाली चालू आहेत.

ओबामांचा अंत्यसंस्कारविधी उद्या पार पडेल.

[संपूर्ण काल्पनिक ]

9 प्रतिक्रिया:

Praj ~ said...

wtf?

danger manus ahes tu :P

btw typo - 'ओबामाने हातातल्या बंदुकीने ओबामांवर गोळ्यांचा वर्षाव केला.'

Praj ~ said...

update..
i haven't seen MNIK.. so din't understand it..

अभिजीत said...

@ प्रज,
चूक दुरुस्त केली आहे.
कदाचित हा लेख वाचून तुला MINK ची कथा कळेल. :P

Salil said...

hehehehehe
awesome!!

Makarand MK said...

लय भारी !!
मी MNIK ची केवळ झलक पाहिली आहे. पण तरीही लेख भन्नाट लिहिलायस!!

सुरुवातीला काही गंभीर प्रकरण असणार अस्म वाटत होतं. पण नंतर मस्त वाटलं. कसं काय सुचलं असं ???

Pushkar said...

zabardast...!!!!

हेरंब said...

'खान म्हनत्यात मला' अजून बघितला नाहीये.. त्यामुळे नीट कळला नाही लेख. पण मस्त वाटतोय. खान बघितल्यावर पुन्हा वाचतो :)

अभिजीत said...

@हेरंब,
"माय नेम इज खान" बघ असा सल्ला मी तुला देणार नाही कारण फारच बकवास चित्रपट वाटला मला तो. जर चुकूनमाकून बघितलासच किंवा त्याची कथा ऐकलीस, तर हा लेख चांगला कळेल.

हेरंब said...

हो रे.. वीकेंडात बघितला खान.. डोकं उठलं नुसतं. पण तुझी पोस्ट लय जबरी !!