8

सुर पुन्हा जुळलेच नाहीत

"मिले सुर मेरा तुम्हारा" हे गाणे माहित नसलेला अणि ते आवडत नसलेला भारतीय माणूस सापडणे विरळाच ! १९८८ साली तयार केलेले हे गाणे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळाच्या विषय आहे. भारतीय परंपरा, एकात्मता यांचे सुंदर दर्शन या गाण्यातून घडते.

आणि आता २२ वर्षानंतर आरती आणि कैलाश सुरेंद्रनाथ (हो, या नावाची दोन माणसे आहेत ! ) यांनी हे गाणे "फिर मिले सुर मेरा तुम्हारा" या नावाने remix केले आहे. कालच या गाण्याचे उद्घाटन झाले. हे गाणे परत चित्रित करण्यामागचा हेतूच मला कळला नाहीये. ज्याप्रमाणे सध्याच्या संगीत क्षेत्रातील कोणतेही remix मूळ गाण्यापेक्षा वाईट असते, त्याचप्रमाणे हे नवीन गाणे पण मूळ गाण्याच्या तुलनेत फारच वाईट आहे. १६ मिनिटांच्या या गाण्यात २२ अभिनेते/अभिनेत्री, १८ संगीतकार/गायक आणि इतर १५ प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती आहेत. गाण्यातील संगीतकारांचा थोडासा चांगला भाग वगळला तर हे गाणे पूर्णपणे बॉलीवूडमय आहे. नवीन भारतच जर दाखवायचा असेल तर कितीतरी चांगले लोक आहेत आपल्याकडे. सचिन तेंडूलकर, अब्दुल कलाम, मेधा पाटकर, अरविंद केजरीवाल अशी बरीच नावे घेता येतील. करण जोहर, शामक डावर, भूपेन हजारीया, उघडे पाय दाखवणारी दीपिका पदुकोण, बनियन घातलेला सलमान खान दाखवण्याची काय गरज आहे ? फक्त बॉलीवूड म्हणजे भारत नाही.

खरे तर नवीन हे गाणे नवीन चित्रित करण्याची पण गरज नाही. जुनेच गाणे एवढे चांगले आहे की तेच पुन्हा पुन्हा दाखवले तरी आम्ही आनंदाने बघू.


जुने मिले सुर मेरा तुम्हाराफिर मिले सुर मेरा तुम्हारा - १फिर मिले सुर मेरा तुम्हारा - २

8 प्रतिक्रिया:

Abhishek said...

अगदी बरोबर आहे, सगळे वशिल्याची लोक भरली आहेत. दीपिकाला अर्ध्या कपड्यात काय एकात्मता दाखवायची आहे देव जाणे...
नको त्या लोकांना नको तेवढे फूटेज दिले आहे... मला कळत नाही, ही जबाबदारी भारत बाला ला का नाही दिली.
थियेटरमध्ये जन गण मन च्या वेळी दाखवले जाणारे विडिओ कितीतरी चांगले आहेत

Ajay Sonawane said...

pahila gana he dusryapekshaa hajar patine changala ahe, vadach nahi

Narayani Barve said...

तुमचे म्हणणे एकदम पटले. ह्या गाण्याची remix करण्याची गरजच नाही. आणि हे गाणं जर कोणी आता बघितले तर भारताचे खरे दर्शन तर होतच नाही. मला तर संगीत सुद्धा आवडले नाही. दीपिकाचे तोकडे बघून मला तर अक्षरश: दिग्दर्शकाची कीव करावीशी वाटली.

http://cinema-baghu-ya.blogspot.com/

अभिजीत said...

अभिषेक,
वशिल्याचे माहित नाही पण काही मोजकीच माणसे आहेत हे खरे !

अजय, नारायणी,
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे.

Salil said...

Exactly kay sadhya karayacha hota tyanna ha video banawun he tyanna tari mahiti ahe ka asa waTat nahi.

Apart from the fact ki video bore,waeet ahe, ajun ek goshta khatakali mhaNaje ekahi cricketer nahi - uralele sagaLe sportspersons ahet bharatatale. BCCI ni hafta dila nahi kay tyancha?

Aniket Kulkarni said...

कालच माझ्या मित्राने ह्य गाण्याविशयी मला सांगितलं, खर तर A. R. Rahman, हा आमचा मह्त्त्वाचा मुद्दा होता, पण जेंव्हा मी you tube वर हे गाणे शोधले, तेव्हा सुरुवात बरी वाट्ली, पण जेंव्ह मी अभिनेते पाहीले, तेव्ह video चक्क बंद केला. कारण हे ह्या गाण्याचे मूळ नाहीच आहे! केवळ एक निष्फ़ळ प्रयोग, बाकी काही नाही.

aDi said...

Perfect!

nivaantharshad said...

ani mool sangitkar ashok patki yancha saadha ullekh pun nahi...