1

कुठे जातो तुमचा आयकर ? - २

मंत्र्यांची दालने चकाचक करण्यासाठी

२१ मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काही मंत्र्यांच्या दालनातील उंची सोफे व फर्निचर मंत्रालयामागील मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले आहे. यापूर्वीही मंत्र्यांच्या दालनाचे सर्वार्थाने नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र नव्याने आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी आपल्या दालनाचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असताना, महागाई वाढत असताना मंत्री दालनाच्या सुशोभीकरणात व्यग्र आहेत असे दिसते. सुशोभीकरण केल्यावर ते जास्त चांगल्या प्रकारे कामे करणार आहेत का ? बऱ्याच मंत्र्याची दालने चांगली असूनही वास्तुशात्राच्या, फेंगशुईच्या नियमांनुसार दालनांचे सुशोभीकरण चालू आहे असे ऐकले आहे. प्रत्येक वेळी मंत्री कार्यभार स्वीकारल्यावर एक काम सर्वप्रथम करतो ते म्हणजे दालनाचे सुशोभीकरण.

निवडणुकीच्या आधी सोनिया गांधीनी कॉंग्रेसजनांना साधी राहणी स्वीकारण्यास सांगितले होते. त्याचा बराच गाजावाजा झाला. आता निवडणूक संपल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचाव्वन

1 प्रतिक्रिया:

unadkya said...

सगळ्यांचे खायचे दात वेगळे !! तसं पण आज काल निवडून आला म्हणजे करोडपती झाला हीच भावना आहे. आयकर भरताना नेहमी कोडं पडतं कुणाला देतोय मी हे ?? देशाला कि भ्रष्ट नेत्यांना??