8

तो राणे नव्हेच !

नारायण राणे यांनी झेंडाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दाखवल्यावर अखेरीस या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. झेंडा प्रदर्शनाच्या या घटना म्हणजे WTF story of the week होत्या.

पहिल्यांदा अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेकडून आणि मनसेकडून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळवला.पण या गडबडीत राणेंची परवानगी राहून गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठे ठाकरे(हिंदू ह्रुदयसम्राट), राज ठाकरे(युवा ह्रुदयसम्राट) आणि नारायण राणे(कोकणाचे भाग्यविधाते(म्हणजे नक्की काय ?)) हि तीन शक्तीपीठे झाली आहेत. तिघांपैकी कोणीतरी आडवा येतोच. या वेळी राणे आले.

या चित्रपटात सदा मालवणकर नावाची मालवणी भाषेत बोलणारी व्यक्तिरेखा आहे. ती नारायण राणेंवर आधारित आहे आणि त्यामुळे तमाम कोकणवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे विधान नितेश राणे यांनी केले. कुठली कोकणी माणसे ? मी पण कोकणीच आहे. मला काही वाटले नाही. आणि माझ्या माहितीच्या कोणत्याच कोकणी माणसाला काही वाटले नाही. अर्थात आता राणे कुटुंबीय स्वत:ला "कोकणाचे भाग्यविधाते" म्हणवून घेत असल्यामुळे तमाम कोकणी जनतेच्या भावनांचे कंत्राट त्यांनी घेतले असावे . अर्थात हल्ली लोकांच्या भावना कशामुळेही दुखावतात म्हणा. अवधूत गुप्ते यांनी चित्रपट काढल्यामुळे अजूनतरी कोणाच्या भावना दुखावल्याचे ऐकिवात नाही.

मग अवधूत गुप्तेंनी एक युक्ती केली. सदा मालवणकर या व्यक्तिरेखेचे नाव सदा पानवलकर असे ठेवले. आणि त्याची बोलायची पद्धत मालवणी न ठेवता साधी ठेवली. बस ! बाकी काही नाही. आणि आता नारायण राणेंनी चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली. नाव बदल्यामुळे लोकांना ती व्यक्तिरेखा कोण आहे हे कळणार नाही असे राणेंना वाटते का ? आता सदा मालवणकरचे नाव बदलून सदा पानवलकर ठेवले आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि ती व्यक्तिरेखा बघूनच ती राणेंवर आहेत हे लगेच समजते.

समजा या चित्रपटात सदा मालवणकरने काही कृष्णकृत्ये(खून, बलात्कार, लाच ईत्यादी) केल्यामुळे राणेंना (आणि तमाम कोकणवासीयांना ) वाईट वाटले असेल तर आता वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कारण सदा मालवणकरचे नाव आता सदा पानवलकर आहे. तो राणे नव्हेच !

8 प्रतिक्रिया:

Salil said...

arre hi tar style asate!
kuNas thawuk raNe ni hirwa zenda ka dakhawala aNi tyacha karaN kay - paise ekde-tikde zhale ki prasiddhicha ya mahinyacha quota complete zala tyacha!

darjaa lekh!

हेरंब ओक said...

सगळं प्रसिद्धीच्या हव्यासापायी.. बाकी काही नाही. आमीर/VVC आणि भगत झाले.. आता गुप्ते आणि राणे. बाकी सगळं सारखंच.

chetan said...

Zenda cha Vishay ani tyachya prasidhdhi sathi zalele natya yat nakkich sambandh ahe he jar koni mhanale tar he ajun prasidhdhi karaNyasathi ek karan asel..
Shevati mahatva Zenda hatat ghenaryala nahi . ani Zenda kadhanaryala(Avdhootla) pan nahi..Fakt konacha ahe tyala mahatva ahe...

Potter said...

झकास !
माझ्या मते हल्ली रिलीज़ च्या आधी मीडिया राईट प्रमाणे controversy rights पण विकले जात असावेत.
I was just wondering for a few days what the heck was all the issue about. Good to know some details.

अभिजीत said...

सलील हेरंब चेतन अमेय,

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हेरंबने लिहिल्याप्रमाणे आता सगळे खरच प्रसिद्धीच्या हव्यासापायीच होत आहे.

harshad said...

अवधूत गुप्तेला ला म्हणावे आता पंधरा रस्सा न ओरपता तांदळाची पेज पीत जा...शक्ती येईल..!

Ajay Sonawane said...

avadhut gupte chaa manjar jhalay, daadhi vadhlele manjar...

'chabuk' kuthe gele re tyacha, phakta lahan pora madhyech chabuk chabuk karat asto :-)

-ajay

Sandeep said...

Rane Kutumb he Konkan che bhagyavidhate ahet ase mhantlyamule jya konkanwasiyanchya bhavana dukhavlya gelya tyache kay?? Bawlatpanach karaycha ahe tar to amhalahi yeto.