5

फलकचोर

पुण्यात अणि इतर सगळ्याच शहरात फ्लेक्सच्या फलकांचे लोण आता चांगलेच पसरू लागले आहे. कुठल्याही निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स अणि त्यावरचे फोटो आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. हे फ्लेक्स लावणारे लोक ते काढण्याचे भानगडीत मात्र पडत नाहीत. सगळेच राजकीय पक्ष यात सामील असल्यामुळे महानगरपालिकासुद्धा हे फलक हटवण्याच्या फंदात फारशी पडत नाही.

मागच्याच आठवड्यात एका वेगळ्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले. दांडेकर पूल वस्तीजवळ हा फलक लावला होता. त्या विभागातील गुंड, घरफोडे, चोर, खंडणी बहाद्दर, खुनी, पाकीटमार यांचे फोटो या फलकावर होते. त्या विभागातील पोलीस आणि सजग नागरिक मंच यांनी मिळून तो फलक लावला होता. १-२ दिवसांनंतर बघितले तर त्यातला एक फोटो नावासकट कापला होता. अजून ३-४ दिवसांत अजून २-३ फोटो कापले गेले. आणि शेवटी तो फलकच गायब झाला. त्या फलकावर ज्यांचे फोटो होते त्यांनीच तो फलक चोराला असावा.

आता एक फ्लेक्स कमी झाला म्हणून आनंद मानायचा की तो फ्लेक्स चोरीला गेला म्हणून दु:ख व्यक्त करायचे याचा विचार मी करतोय. आता जेंव्हा तिथले लोक असा फलक पुन्हा लावतील तेंव्हा या चोरांच्या फोटोसमोर फलकचोर असेसुद्धा लिहितील का ?

5 प्रतिक्रिया:

Praj ~ said...

lol

Chetan Vaishampayan said...

Vah......
Halli Bhavik, Nete yanchya photo madhe dev pan disat nahi...Pratyakkanna vatate aplya choukat apala photo asava .. swatache kahi nasel tar ( swatahala koni olakhat nasel tar) dusryanna shubhechcha denyasathi tari..
Falak he Publicity che best medium ahe.. he nakki......

Salil said...

heehee, sahire :-)

Prabhas said...

मला तरी वाटतं की, ते फोटो पेपर मधुन छापायला पाहीजे होते. मग कुठुन कुठुन काढतील ते?

काढायचेच झाले तर त्यांना रद्दी गोळा करत फिरावे लागेल, ज्यानी त्यांचीच जरा कमाई होईल नंतर...

Veerendra said...

अहो सरकारी चोरांचे फलक टिकतात .. इतरांचे जाणारच .. त्यांचा थोडीच कुठे वशिला आहे ??