8

Random Thoughts - 11

१) रजत शर्माने India TV का चालू केला ? आणि तिथे 'जगावेगळ्या' बातम्या का असतात ?

कोणे एके काळी रजत शर्मा चा 'आप कि अदालत' हा कार्यक्रम चांगला होता. पण कालांतराने सर्व वाहिन्यांकडून त्याच्या कार्यक्रमास नकार मिळाल्याने चिडून त्याने स्वत:ची वाहिनी चालू केली. वाहिनी चालू करतानाच त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले, "मी एक तास माझा कार्यक्रम करणार. बाकीचा वेळ तुम्हाला काय पाहिजे ते करा. पण काहीही जास्तीचा खरच न करता स्टूडीओ मधेच बसून computer वापरून काय पाहिजे ते करा. (तसेही आता सगळे जग एका क्लिकच्या अंतरावर आले आहे :P)"

२) गुगल डूडल हा एक भन्नाट प्रकार आहे. हल्ली बहुतेक रोज दिवसातील नव्या डूडलविषयी माहिती असते. थोडे दिवसांनी कदाचित असेही होईल कि ज्या दिवशी default google logo आहे त्या दिवशी बातम्या येतील आणि असे का घडले याचे विवेचन येईल.

३) परवाच आमच्या घरी गुडनाईट ची नवीन mosquito repellent coil आणली. coil वर "mini jumbo coil" असे लिहिले होते. हा काय प्रकार आहे ? दोन्ही प्रकार एकत्र कसे असू शकतील ? आणि तरीही ती coil नेहमीच्याच आकाराची होती. कदाचित दोन्ही प्रकार एकमेकांना cancel करत असतील.

४) नुकताच दंतवैद्याकडे जाण्याचा योग आला. एकदा का त्यांच्याकडे गेलो कि फक्त झालेल्या आजारावर उपचार करून ते सोडताच नाहीत. पुण्यातील वाहतूक पोलीसासारखेच त्यांचे असते. पोलिसाने एकदा अडवले कि मग license, PUC, documents, insurance, helmet, first aid kit, helmet अशी यादी वाढतच जाते. दंतवैद्यांचे पण असेच काहीतरी असते.

५) चंद्रशेखर गोखले यांची खालील चारोळी बहुतेक सगळ्यांच माहित असेल -
प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण उगाच आयुष्य दवडतो.

पण एकही मुलगी हे ऐकेल असे मला वाटत नाही. :P
6

काचेची बरणी, २ कप चहा आणि पुण्यातील वाहतूक

"काचेची बरणी आणि २ कप चहा" हि गोष्ट सगळ्यांचा माहिती असेल. माहित नसेल त्यांच्यासाठी खाली परत देतोय.


तत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरु झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरुन झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणुन विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणी हळुच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यानी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालुन चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले "आता जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा. पिंगपाँगचे बॉल ही महत्त्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी.

"आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणी सारी शक्ती लहान लहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा..आपल्या सुखासाठी महत्त्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या.

"आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला बाहेर जेवायला घेऊन जा. घराची साफ़-सफ़ाई करायला आणि टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल."

"पिंगपाँगच्या बॉलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरे महत्त्व आहे. प्रथम काय करायचे आहे हे ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."

सरांचे बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं - "यात चहा म्हणजे काय?"

सर हसले आणि म्हणाले - "बरं झालं तु विचारलंस. तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर एक-दोन कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते."रोज कार्यालयात जाता-येताना सिग्नलला वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यावर हि गोष्ट जरा पुण्यातील वाहतुकीसाठी थोडी सुधारावीशी वाटली.

कोठल्याही सिग्नलला सुरुवातीला चारचाकी उभ्या राहतात. त्यांनी मोठी जागा घेतल्यावर जिथे जमेल तिथे दुचाकीवाले घुसतात. रस्ता ओलांडणारे पादचारी दुचाकीच्या मधून मधून जात असतात. आणि एवढे करून शेवटी रत्याच्या बाजूला चहा - मुख्यत: पाणीपुरीच्या एखाद्या ठेल्यासाठी नक्कीच जागा असते.

आता याचा मुख्य गोष्टीची संबंध काय ? काही नाही. सिग्नलला थांबल्यावर उगीच डोक्यात येणारे विचार, दुसरे काय !
28

कर्णवैद्याचा एक अनुभव

कानात दडा बसल्यामुळे काल जवळच्या ENT specialist कडे गेलो होतो. डॉक्टर साधारणत: सत्तरी पार केलेले होते.
डॉ - काय होतंय ?
मी - पोहायला गेलो होतो. त्यामुळे कानात दडा बसलाय. ऐकायला कमी येतंय एकदम.
डॉ - कुठे गेला होता पोहायला ?
मी - गावाला. विहिरीत.
डॉ - कोणते गाव ?
मी - श्रीवर्धन.
डॉ - कोणते ?
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.
डॉ - कुठले ?
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.

मला एकतर कमी ऐकायला येत असल्यामुळे माझ्या बोलण्याचा आवाज कमी होता. त्यामुळे समोरच्याला ऐकू येत आहे कि नाही याचा अंदाज घेवून बोलावे लागत होते. डॉक्टरांच्या प्रश्नाने मला कळेना कि हे माझी फिरकी घेत आहेत कि यांना खरोखर कमी ऐकू येते कि येणाऱ्या सगळ्याच रुग्णांशी हे असे वागतात आणि त्यांना बुचकळ्यात टाकतात.

डॉ - श्रीगोंदा ? तिकडे आहेत का एवढ्या विहिरी.
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.
डॉ - अच्छा श्रीवर्धन. मग विहिरीत का गेलास ? समुद्रात जायचे की?
मी - (मनात) कुठे गेलो ते महत्वाचे नाहीये.
(उघडपणे - काहीतरी बोलायचे म्हणून) विहिरीत पोहण्याची वेगळी मजा असते.
डॉ - किती दिवस गेला होतास गावाला ?
मी - ३
डॉ - मग तिन्ही दिवस पोहालास का ?
मी - हो
डॉ - मग विहिरीत सूर, मुटके वगैरे सगळे मारले का ?
मी - हो.

एवढा सवाल-जवाब झाल्यावर शेवटी त्यांनी माझे कान तपासायला घेतले. "पाण्यात पोहाल्याने कानात घट्ट बसलेला मळ सैल झाला आहे. तो काढावा लागेल. हल्ली कानाकडे कोणी लक्षच देत नाही. यांना नुसते स्टायलीश हेअर-कट, फेस क्रीम पाहिजे." मला वाटले आता हे "हल्लीच्या पोरांना.." वर दळण दळत बसणार. पण अजून फारसे काही न बोलता त्यांनी उजव्या कानातील मळ काढण्यास सुरुवात केली. एक लाब आणि बारीक अवजार कानात घातल्यावर कानाच्या पडद्याला एकदम वेदना झाल्यामुळे मी कळवळलो. "अरे ओरडतोस काय ?" माझ्याकडे त्रासिक चेहरा करून ते म्हणाले. जसे काय जगात असा ओरडणारा मीच पहिला आहे.

"हे बघ. तुझ्याकडे ३ पर्याय आहेत. मी आत्ता मळ काढतोय तसा काढणार. त्याला २ मिनिटे त्रास होईल पण लगेच साफ होईल. दुसरे म्हणजे मी दोन्ही कानांच्या जवळ तो भाग बधीर करण्यासाठी २ इंजेक्शन देणार. तिसरे म्हणजे मी काही औषधे लिहून देणार. ती कानात घालून २ दिवसांनी ये. मग मळ काढू. पण मग २ दिवस दडा तसाच राहील. काय करतोस बोल." मी शांतपणे पहिला पर्याय निवडला. एव्हाना मला कळून चुकले होते कि त्यांना ऐकायला फारच कमी येते. कमी ऐकू येणारा ENT specialist मी कधी imagine च केला नव्हता. अवजार कानात घातल्यावर माझे बारीक आवाजातील ओरडणे परत सुरु झाले. ओरडण्याचा आवाज फक्त "आ आ " असाच राहून त्यापुढे "आई"ची चौकशी करणारे अपशब्द तोंडात येवू नये यासाठी मला विशेष काळजे घावी लागत होती. त्यातच डॉक्टरांनी म्हणाले, "अरे ओरडतोस कशाला ? ओरडून काही होणारे का ?" आवरा ! कसला ultimate प्रश्न आहे. वेदना झाल्यावर माणूस का ओरडतो याचा मी कधी विचारच केला नव्हता. हे स्वाभाविक असले तरी काहीतरी कारण असणारच ना यामागे. हा विचार करण्यात थोडा वेळ गेला. तेवढ्यात त्यांनी पिचकारीसारखे काहीतरी उपकरण काढले आणि त्यात पाणी भरून कानात जोरात फवारले. त्या पाण्याच्या प्रेशरने मळ काढण्याचा त्यांचा हेतू होतो. पाण्याचा तो जोरदार प्रवाह कानाच्या पडद्यावर आदळल्यावर मी परत ओरडलो. "अरे ओरडतोस काय ? नुसते पाणी तर आहे." इति डॉक्टर.

शेवटी हा प्रकार संपल्यावर शुक्रवारी येण्यास सांगितल्यावर मी घरी आलो. पण घरी आल्यावर एका कानाचा त्रास जास्तच वाढला. संध्याकाळी परत डॉक्टरांकडे गेलो. त्यांना बघितल्यावर मी स्मितहास्य केले.
त्यांनी अजिबात ओळख न दाखवता विचारले, "काय झालाय ?"
"मी सकाळी तुमच्याकडे आलो होतो. कानाचा त्रास वाढली अजून." मी म्हणालो.
"माझ्याकडे आला होतात. कधी ? "- डॉ.
मी - (मनात) -आवरा ! यांना लक्षात पण राहत नाही असे दिसतंय. मग हे औषधे तरी कशी काय देतात ?
(उघडपणे) सकाळी आलो होतो. तुम्ही वहीत लिहून ठेवलाय बघा.

सकाळी माझी चौकशी करून त्यांनी वहीत लिहून माझ्याबद्दल लिहून ठेवले होते. आजाराच्या वर्णनासोबतच "was swimming in the well in shriwardhan" हे सुद्धा लिहिले होते. साहजिकच आहे ! लक्षात न राहणारा माणूस अजून काय करणार ? त्यांच्या वहीवरून समजले कि दिवसभरात त्यांनी तपासलेला रुग्ण मी एकटाच होतो. पुन्हा एकदा औषध घेवून मी निघालो. फीचे पैसे देताना मी १०-१० च्या जरा जुन्या, मळलेल्या नोटा दिल्या. "मारवाड्याकडून नोटा आणल्या का ह्या ? साधारणपणे मारवाड्याकडे किंवा किराणामालाच्या दुकानात अश्या नोटा मिळतात" डॉक्टरांनी अजून १ डायलॉग टाकला. काय म्हणणार मी आता यावर. "हं हं" करून मी निघालो.

डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा गुण नंतर मात्र आलाय. आता परत शुक्रवारी बोलावलंय. बघूया, काय घडतं तेंव्हा !
10

Random Thoughts - 10

१) आता फ्लेक्स/होर्डींग्स हि काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. रस्त्याने जाताना जाहिरातींचे फ्लेक्स सारखे नजरेस पडतात. ज्या फ्लेक्सवर जाहिराती नसतात त्यांवर संबंधित जाहिरात कंपनीचे नाव आणि फोन नंबर असतो. मग या जाहिरात कंपन्या स्वत:ची जाहिरात कशी करतात ? रिकाम्या फ्लेक्सवरील कंपनीची माहिती आणि कंपनीची जाहिरात यातील फरक कसा ओळखायचा ?यात दोघांत काही फरक असतो का ?
समजा तुम्हाला एकाद्या फ्लेक्सवर स्वत:च्या उत्पादनाची जाहिरात करायची आहे. तुम्ही त्या फ्लेक्सवर लिहिलेल्या नंबरवर फोन केलात आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले, "अहो तो फ्लेक्स आमचा नाहीये. तिथे फक्त आमच्या कंपनीची जाहिरात आहे. आमच्या कंपनीचे फ्लेक्स दुसऱ्या ठिकाणी आहेत. त्याबद्दल माहिती सांगू का ?" तर तुम्हाला कसे वाटेल ?

२) प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध जाणे जर चांगले असते तर वन-वे मध्ये चुकीच्या बाजूने येणारे वाहनचालक भारी असतात का ?

३) पुण्यात पी.एम. टी. गणपती, रक्षाबंधन, नवरात्र इत्यादी सणांच्या निमित्ताने जादा बसगाड्या सोडते आणि मग या जादा गाड्यांमुळे किती नफा झाले ते काही दिवसांनी वर्तमानपत्रात येते. त्यावेळी मला असा प्रश्न पडतो कि या जादा गाड्या आणतात कुठून ? आणि रोज लोक बसमधून प्रचंड गर्दीमधून जात असताना यातल्या काही गाड्या का सोडत नाहीत ?

४) हा PICT बद्दलचा माझा एक चांगला अनुभव आहे. कॉलेजात असताना मी एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता पण मिळण्याची फारशी अपेक्षा नव्हती. आता तर मी त्याबद्दल विसरूनही गेलो होतो. पण काही दिवसांपूर्वी कॉलेजातील एका कार्यालयीन कर्मचार्याने मला चक्क फेसबुक शोधून add केले आणि शिष्यवृत्तीचा धनादेश आला आहे, तो घेवून जा असे सांगितले. माझा तर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. त्या कर्मचार्याच्या wall वर जाऊन बघितले असता बहुतांश नोंदी कॉलेजशी संबंधित होत्या.(अमुक-तमुक फोर्म आलेत, धनादेशासंदर्भात भेटा इत्यादी, इत्यादी.) कॉलेजने फेसबुक वर असे official account उघडायला काय हरकत आहे ? किंवा कॉलेजची स्वत:ची वेबसाईट आहेच कि. त्यावर द्या कि हि माहिती ! तसेही सगळे जग एका क्लिकच्या अंतरावर आले आहेच. :P

५) परवाच 80-20 rule चा कुठेतरी उल्लेख वाचला. माझ्या आयुष्यात आता बऱ्याच ठिकाणी apply होतो. माझी gtalk list, facebook friend list, कार्यालयातील कर्मचारी ई. ई.

६) कोणी कसली जाहिरात करावी हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सचिनची कपडे धुण्याच्या पावडरची जाहिरात, किरण बेदींची No-Marks ची जाहिरात बघून कसेतरीच वाटते. या जाहिराती स्वीकारण्यापूर्वी ते काय विचार करत असतील ?

७) मी वेगाने दुचाकी चालवत असताना जेवढा comfortable असतो तेवढा वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर मागे बसल्यावर नसतो. समोरच्यावर विश्वास नाही म्हणा किंवा माझ्या हातात कंट्रोल नसल्याची भावना म्हणा, पण जरा वेगळे वाटते. मी अशीच गाडी चालवत असताना मागे बसणाऱ्याला असेच वाटत असेल का असा विचार येतो. तर असेच एका मागे बसून जाताना double seat bike racing ची कल्पना मला आली. साधी bike race आता जुनी झाली आहे (अर्थात, त्यातले धोके अजूनही आहेत !). माझ्या मते, साध्या बाईक रेस पेक्षा double seat bike race जास्त आव्हानात्मक असेल कारण त्यात दोघांचे को-ओर्डीनेशन लागेल. असल्या रेसचा विचार आधी कोणी केलाय कि नाही ?
4

ध्यासपर्व

ध्यासपर्व : रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनकार्यावर आधारलेला चित्रपट.
अमोल पालेकारांचे उत्कृष्ट दिग्दर्शन. रघुनाथरावांच्या भूमिकेतील किशोर कदम आणि मालतीबाईंच्या भूमिकेतील सीमा विश्वास यांचा सहजसुंदर अभिनय !

संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक असलेल्या रघुनाथरावांच्या जीवन संघर्षाचे नेमके चित्रीकरण चित्रपटात केले आहे. सततच्या बाळंतपणामुळेच तत्कालीन समाजात स्त्रियांचे वाढते मृत्यू होत असल्याचे जाणून सर्व समाजच रोष पत्करून पत्नी मालतीबाईंच्या मदतीने संतती नियमनाचा प्रसार सुरु केला. paris ला जाऊन या संबंधीची सर्व शास्त्रीय ज्ञान प्राप्त केले. परत इकडे येवून "समाज स्वास्थ्य " या मासिकाद्वारे समाजातील लैंगिक अंधश्रद्धा, संतती नियमनाची गरज. लैंगिक रोग या विषयीच्या प्रश्नांना वाचा फोडली.

दुर्दैवाने आजही परिस्थिती परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे असे वाटत नाही. आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या नेतृत्वाखाली कुटुंबनियोजनाची जबरदस्ती झाल्यावर सरकार आता हा प्रश्न हाताळण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसत नाही. या विषयावर बोलणे अजूनही taboo मानले जाते.

र.धों. कर्वे यांच्या कार्याची माहिती करून घेण्यासाठी हा चित्रपट बघणे मस्ट आहे.
3

जाहिराती : आज - कल

हल्ली जाहिरातींचा सुद्धा रटाळ होवू लागल्या आहेत. अर्थात जाहीरांतीचा उद्देश एकच असला तरी innovative जाहिराती हल्ली कमी झाल्या आहेत.( At least मी ज्या वेळी बघतो तेंव्हा तरी त्या फारश्या नसतात.) मागे मी एकदा चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या साच्याबद्दल लिहिले होते. असाच जाहिरातींचा साचा सुद्धा बनला आहे असे मला वाटते. तर अश्या साच्यातील जाहिराती बनवण्याची कृती खालीप्रमाणे -

१) तुम्हाला ज्या वस्तूची जाहिरात करायची आहे त्याच्याशी संबधित समस्या घ्या. तुमचे पूर्ण जीवनाची त्या समस्येमुळे वाट लागली आहे (आय.टी. वाल्यांच्या भाषेत P1 blocker bug ) असे सांगा.

२) तुमचे सगळे मित्र या समस्येमुळे तुमची हेटाळणी करत आहेत असे दाखवा. (उदा, कमी उंची, लहान केस, केसात कोंडा, काळा चेहरा, पूर्ण साफ न धुतलेले कपडे, डाग पडलेली लादी इत्यादी इत्यादी )

3) तुम्ही सगळी उत्पादने वापरून बघितली तरी कसलाच उपाय होत नाही.

4) मग एक डॉक्टरचा कोट घालून चष्मा लावलेला माणूस (ज्याचे जाहिरातीतील आडनाव कपूर, कुमार असे काहीतरी असते !) एक उत्पादन दाखवतो आणि एक ग्राफ दाखवतो. त्यावर २ उत्पादनांची तुलना केलेली असते. ज्यानुसार "सामान्य" उत्पादनाच्या तुलनेत ज्याची जाहिरात आहे ते उत्पादन दुप्पट/तिप्पट चांगले असते. हे उत्पादन म्हणे science आणि nature चे perfect combination असते. आणि हा डॉक्टर कोणत्यातरी संस्थेत या उत्पादनावर रिसर्च करत असतो.

5) हे उत्पादन वापरल्यावर तुमचे अवघे जीवनच बदलून जाते. तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळतो. सुंदर तरुण/तरुणी तुमच्या मागे लागतात, नवरा/बायको खुश होते इत्यादी इत्यादी.

दूरदर्शनवर बघण्यासारखे कार्यक्रम फारसे नसतात म्हणून म्हणून मी जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले होते पण आता जाहिरातीसुद्धा बघणेबल राहिल्या नाहीत. आणि सारखा India TV बघून सुद्धा आता त्याचा कंटाळा येवू लागला आहे. या वाहिनीला प्रतिस्पर्धी वाहिनी का निघत नाहीये अजून ?
5

Random Thoughts - 9

या वेळचे Random Thoughts जरा वेगळे आहेत. हल्ली एखादा विचार आला कि तो लगेच बझवर टाकून मी मोकळा होतो. त्यामुळे बरयाच दिवसात असा लेख लिहिला नव्हता. खाली दिलेले विचार हे खरे म्हणजे वेगवेगळ्या लेखांच्या कल्पना आहेत. कधीकाळी ड्राफ्ट्समध्ये साठवलेले लेख आज वाचत होतो. कधीतरी त्यावर विचार केलेला असल्यामुळे ते डिलीट करणे जीवावर आले आणि त्यांचे पूर्ण लेख बनवणे जास्तच जीवावर आले होते. तेंव्हा असे लेख खाली लिहित आहेत.

1) मध्यंतरी मजीद माजिदीचे चित्रपट पाहण्याचा योग आला. त्याने दिग्दर्शित केलेले The Willow Tree, Baran, The Color of Paradise, Children of Heaven, Pedar, Avaze gonjeshk-ha असे सहा चित्रपट पाहिल्यावर माजिदीमय झालो होतो. छोट्या छोट्या गोष्टींतून नेमका आशय मांडणे, मुलगा-बाप यांचे नाते, इराणचा सुंदर निसर्ग(इराण मध्ये एवढा सुंदर निसर्ग आहे, असे मला वाटले पण नव्हते !), पाण्याच्या वेगवेगळ्या रूपांचा कल्पकतेने केलेला वापर - त्याच्या चित्रपटाची वैशिष्ठे सांगावी तितकी कमीच आहेत. नेहमीच्या हॉलीवूड, बॉलीवूडच्या चित्रपटांपेक्षा हे चित्रपट पाहणे हा एक सुखद अनुभव होता.

2) मला GF नाही याबद्दल बरयाच टिप्पण्या ऐकावया लागतात.
a) तू काय, मुलगी पटवलीच असशील, छुपा रुस्तुम आहेस तु !
b) तू काय पुण्याला आहेस, मुलींची काही कमी नाही तिथे !
c) तू काय IT मध्ये आहेस, मुली नुसत्या मागे लागत असतील तुझ्या !
d) तू एवढा ब्लॉग लिहितोस, मुली फुल फिदा असतील तुझ्यावर !
यांची आता सवय झाली आहे मला. पण मागच्या आठवड्यात आत्तापर्यंत न ऐकलेली अजून एक comment ऐकली. -

"तु पुरुष आहेस, मुलगी पटवण्यासाठी अजून काय लागते ? " - आवरा ! GF नाही म्हणून काहीही ऐकून घायचे का ?

3) पुण्यातील पादचाऱ्यांचे आणि मुख्यत: समोरच्या वाहनांना हिरवा सिग्नल लागल्यावरच रस्ता ओलांडायला सुरुवात करणार्यांचे मला नवल वाटते. स्वारगेटच्या चौकात मला रोज असे लोक दिसतात. तिथे आधीच सिग्नलला प्रचंड गर्दी असते. सगळे वाहनचालक सिग्नलकडे डोळे लावून बसलेले असतात. Matirx Revolution मध्ये machine army ने zion ला ड्रील पाडल्यावर ज्या वेगाने छोट्याश्या भोकातून tiny machines आतमध्ये येतात तसेच काहीतरी हिरवा सिग्नल लागल्यावर पुण्यात होते. आणि त्याचवेळेस काही लोक समोरून रस्ता ओलांडायला घेतात. अर्थात ते पण जीव मुठीत धरूनच चाललेले असतात. पण मी तेंव्हा गाडीवर असतो. त्यामुळे माझा दृष्टीकोन वेगळा असतो.

2

कुठे जातो तुमचा आयकर ? - ३

निकृष्ठ दर्जाची स्टेडियम बांधण्यासाठी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या स्टेडियमच्या छतावरील पाणी साठून ते झिरपत आहे, छतावरील टाइल अचानक खाली पडत आहेत. काही ठिकाणी छताचे, भिंतीचे पोपडे उडाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. उच्च दाबाच्या वायरी ठिकठिकाणी लोंबकळत आहेत. उद्‌घाटनासाठी स्टेडियम तयार करण्याच्या प्रयत्नात सर्व काही ड्रेनेजमध्ये ढकलले जात आहे. सिमेंट तसेच अन्य गोष्टी ड्रेनेजमध्ये गेल्या आहेत. आत्तापर्यंत विविध स्टेडियमवर झालेल्या खर्चाबाबतची अधिकृत आकडेवारी लक्षात घेतल्यास त्यासाठी तब्बल 10 हजार 550 कोटी खर्च केले आहेत.


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला जेमतेम सव्वादोन महिने बाकी असताना स्टेडियमची अवस्था अचानक सुधारण्याची चिन्हे नाहीत. मला आधी वाटले होते कि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सगळे शेवटच्या सेकंदाला करणार आहेत काय हे लोक ? पण अभियांत्रिकीच्या exam/submission ला जे चालते ते सगळीकडे चालत नाही. माझ्या मते या स्पर्धेचे आयोजन फक्त सुरेश कलमाडी यांच्या हट्टापायी करण्यात येत आहे. उगीच कुठेही "जागतिक दर्जाच्या सुविधा" देण्याच्या घोषणा करायच्या (गेली कित्येक वर्षे पुण्यात हेच चालले आहे.) कि झाले.

इथे तर फक्त स्टेडियमवरचा खर्च दिला आहे. पूर्ण स्पर्धेच्या आयोजांसाठी, प्रसिद्धीसाठी, उद्घाटन समारंभात बॉलीवूडच्या नट-नट्यांना नाचवण्यासाठी(भारताची संस्कृती जगाला दाखवायला नको का ?) अजून किती खर्च होणार कोणास ठाऊक ?
9

चित्रपटगृहात राष्ट्रगीत - योग्य कि अयोग्य ?

हल्ली चित्रपटगृहात चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येते. एका ठिकाणी वाचलेल्या माहितीनुसार ६५ सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळेपासून चित्रपटगृहात चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येत असे. तेंव्हा वातावरण राष्ट्रभक्तीने भरलेले होते. पुढे पुढे, चित्रपट संपल्यावर प्रेक्षक लगेच बाहेर पडू लागत किंवा जागेवर बसून राहत, त्यामुळे राष्ट्रागेताचा अपमान होत असे. त्यामुळे हि प्रथा बंद करण्यात आली होती. दोन दशकांपूर्वी बंद करण्यात आलेल्या या पध्दतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शासनाने या प्रकारचा कायदा केला आहे कि नाही या बद्दल मला अधिक माहिती कळली नाही.

या पद्धतीविषयी लोकांच्या मनात संमिश्र भावना आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे -

पाठींबा देणाऱ्या -
१) हि फार चांगली पद्धत आहे. हल्ली राष्ट्रगीत फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीलाच टी.व्ही. वर बघण्यास मिळते .
२) मोठ्या पडद्यावर राष्ट्रगीत चालू पाहून देशभक्तीने मन एकदम भरून येते. नाहीतरी हि भावना हल्ली फारशी मनात येत नाहीच.
३) राष्ट्रगीत चालू असताना पडद्यावर जो व्हीडीओ दाखवतात तो बघताना एकदम भारी वाटते.

विरोध करणाऱ्या -
१) राष्ट्रगीताला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण चित्रपटगृह हि काय राष्ट्रगीत लावण्याची जागा आहे का ? लोक तिथे मनोरंजनासाठी आलेले असतात. राष्ट्रगीत ऐकण्यासाठी नाही.
२) चित्रपटगृहात प्रवेश करताना एका हातात कोकची बाटली, एका हातात पोपकोर्न असतात. मग समोर अचानक राष्ट्रगीत सुरु झाले कि काय करावे ते सुचत नाही.
३) चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे म्हणजे सक्तीची देशभक्ती आहे. आणि राष्ट्रगीत चालू असताना उभे राहण्याची सक्ती कशाला ? जागेवर बसून मला देशाभिमान व्यक्त करता येत नाही का ?
४) जर राष्ट्रगीत लावायचेच आहे तर मग फक्त चित्रपटगृहातच का ? कार्यालये, महाविद्यालये, संसद आणि इतर सर्व ठिकाणी का नाही ?

याबाबत आपले मत काय ?
3

Inception - Reviewक्रिस्टोफर नोलन लिखित, दिग्दर्शिक, निर्मित "इंसेप्शन" या चित्रपटाची सुरुवातीपासूनच हवा निर्माण झाली होती. सामान्यपणे, असे over-hyped चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करतो.

चित्रपटाची कथा थोडक्यात, साध्या शब्दांत, spoilers न देता सांगणे जरा कठीण आहे. पण तरी प्रयत्न केला आहे.

चित्रपटातील इंसेप्शन म्हणजे एखादी कल्पना दुसऱ्या व्यक्तीच्या मनात अश्या पध्दतीने भरवणे कि त्या व्यक्तीला हा विचार आपल्यालाच सुचला आहे वाटले पाहिजे. हे संमोहन नाही. हा त्यापेक्षा फारच वेगळा प्रकार आहे. चित्रपटातील प्रमुख पात्र Cobb (Leonardo DiCaprio) हा लोकांची गुपिते चोरणाऱ्या टोळीचा प्रमुख आहे. एका विशिष्ठ तंत्राचा वापर करून तो एखाद्या व्यक्तीला झोपवून त्याचे स्वप्नाचे जग निर्माण करतो, त्यात घुसून व्यक्तीची रहस्ये मिळवतो आणि आपले विचार त्या व्यक्तीच्या मनात घुसवतो. कथेतील मुख्य plan हा Robert Fischer Jr या एका प्रसिद्ध उद्यापतीच्या मुलाच्या मनात एक विचार पेरण्यापासून होतो आणि मग सुरु होतो स्वप्नाच्या जगातील एक थरारक खेळ. स्वप्नात स्वप्न, त्यात स्वप्न, त्यात अजून एक स्वप्न अश्या स्वप्नाच्या layers मध्ये आपण गुंगून जातो.आणि स्वप्न आणि वास्तवातील फरक धूसर होत जातो.

Leonardo DiCaprio चा अभिनाय नेहमीप्रमाणेच वाखाणण्याजोगा आहे. त्याचे त्याच्या पत्नीशी असलेले नाते, मुलांवरचे प्रेम हा चित्रपटाच्या कथेतील महत्वाचा भाग आहे.

चित्रपटातील actions scenes, animated scenes तर उत्तमच, शून्य गुरुत्वाकर्शणातील मारामारी कहरच आहे. कथेला वेग असल्यामुळे चित्रपटाची लांबी जरी नेहमीच्या इंग्रजी चित्रपटांच्या तुलनेत जास्त असली तरी ते जाणवत नाही. Hans Zimmer च्या पार्श्वसंगीतामुळे अजून मजा येते.हा लेख वाचून चित्रपटाची कथा जरा कठीण वाटत असली तरी सोप्या शब्दात सांगायचे तर हा वर्षातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. नक्की बघा.

(फोटो - आंतरजालावरून साभार )
6

पुणेरी वेटर

तिरसटपणाबद्दल पुणेकर प्रसिद्ध आहेतच. नुकताच विद्याधरने पुण्याबद्दल लेख लिहिला आहे. तो वाचून मला पुण्यातील काही तिरसट उत्तरांची आठवण झाली. जरी येथील दुकानदारांच्या तिरसटपणाचे बरेच किस्से आहेत तरी इथल्या हॉटेलातील वेटरसुद्धा काही कमी नाही. मला किंवा माझ्या मित्रांना आलेले पुणेरी वेटरांचे काही अनुभव सांगत आहे.

१) स्थळ : Up & Above - मागवलेली रोटी एकदम गार आली. त्याबद्दल विचारले असता वेटरचे उत्तर - "साहेब, इकडे खूप गार हवा आहे ना, त्यामुळे किचनमधून इथपर्यंत येताना गार झाली."

२)स्थळ : जाधवगड - या जुन्या गढीचे विठ्ठल कामतांनी resort मध्ये रुपांतर केले आहे. तिथे मागवलेला चहा कोमट होता. तो गरम का नाही याबद्दल विचारले असता उत्तर आले- "आम्ही मायक्रोव्हेव मध्ये चहा गरम करतो, त्यामुळे नीट गरम झाला नसेल"

३) स्थळ : हॉटेल समुद्र - ऑर्डर देऊन बराच वेळ झाला तर मागवलेले पदार्थ येत नव्हते म्हणून आमच्या टेबलजवळच उभ्या असलेल्या वेटरला अजून किती वेळ लागेल असे विचारले. "तुम्ही मला ऑर्डर दिली आहे का ? " त्याने बाणेदारपणे विचारले. मी नाही म्हणाल्यावर ''हा माणूस उगीच का त्रास देतोय ?" असा भाव चेहऱ्यावर आणून तो चक्क तिथून निघून गेला.

४) स्थळ : Hotel Oasis - veg clear सूप मागवलेले असताना cream of tomato सूप आले. ते परत घेवून जाण्यास सांगितल्यावर तो उत्तरला, "साहेब, घ्या कि हेच. तसेही सगळे सेमच असते"

५) स्थळ : गुड लक - इथले वेटर तर इथे वर्षानुवर्षे काम करून एकदम तयार झाले आहेत. मी बघितलेला १ किस्सा. एक बाई आणि तिची मुलगी हॉटेलात आली होती. त्यांनी कोणतीतरी डिश मागवली होती. ती डिश apparently गोड असते पण इथे तिखट बनून आली.
बाई - अहो, हि डिश गोड असते. तुम्ही तिखट केलीये.
वेटर - आमच्या इथे आम्ही अशीच बनवतो. आधी विचारायला हवे होते तुम्ही.
बाई - जाऊदे, डिश cancel करा मग.
वेटर - (चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव) इथे डिश cancel पण होत नाही. पाहिजे तर दुसरी डिश करा अजून ऑर्डर.

६) स्थळ : हॉटेल रुतू'ज गार्डन - हे हॉटेल लहान असल्यामुळे मालकच बरेचदा वेटरचे काम करतो. तर या हॉटेलचे त्याने ठरवलेले काही अलिखित नियम खालीलप्रमाणे-
अ) जर एक-दोन माणसे आली असतील आणि अख्खे हॉटेल जरी रिकामे असेल तरी त्यांनी ६ लोकांच्या टेबलवर बसायचे नाही.
ब) बसल्यावर ५ मिनिटांच्या आत ऑर्डर द्यायची.
क) सगळी ऑर्डर एकदम द्यायची. आत्ता थोडी, नंतर थोडी, असे चालणार नाही. फक्त जीरा राईस आणि दाल फ्रायची ऑर्डर नंतर दिली तरी चालेल.
ड) लिंबू सरबताची ऑर्डर पण आधीच द्यावी लागते. कमीत कमी ४ ग्लास हवे असेल तरच ऑर्डर स्वीकारली जाते.
यापैकी कोणताही नियम पाळला नाही किंवा मालकाच्या मनात आले तर तो लगेच तुम्हाला बाहेर काढू शकतो.
4

हैसियत

हिंदी चित्रपटांच्या वैशिष्ठ्यांपैकी एक वैशिष्ठ्य म्हणजे हैसियत. या हैसियतीबद्दल बोलताना "माझी फिल्लमबाजी" मध्ये कणेकर म्हणतात,

हिंदी चित्रपटात प्रत्येक व्यक्तीला किमान २ हैसियती असतात. "शक्ती" चित्रपटात दिलीप कुमारचा संवाद आहे, "इस वक्त, में तुम्हारे सामने बाप के हैसियत से नही. बल्की एक पुलिस अफसर के हैसियत से खडा हुं !" तूच न तो ? तोच ना तू ? अरे फरक काय पडतो आम्हाला ?


हे हैसियतीचे प्रकरण फक्त चित्रपटापुरते मर्यादित असते असेल मला वाटत होते. पण हे खऱ्या जीवनात पण असते हे हल्लीच कळले. काल आयबीन-लोकमत वर अनिरुद्ध देशपांडेची मुलाखत चालू होती. आय.पी.एल. मध्ये पुण्याच्या संघासाठी लावलेली बोली वैयक्तिक असून तिचा पवारांचे समभाग असलेल्या कंपनीशी काहीही संबंध नाही हे तो सारखे सांगत होता. बोलीसाठी सदर केलेले कागदपत्र कंपनीच्या नावाने असले तरी बोली मात्र एक सच्चा पुणेरी या नात्याने लावली होती हे तो सांगत होता. (अर्थात पवारांचा याच्याशी काहीही संबंध नाही हे सांगणे ओघाने आलेच !) "मैने ये बोली कंपनी manager के हैसियत से नाही बल्की एक पुणेकर के हैसियत से लगाई है ! " असे तो कधी बोलतोय याची मी वाट बघत होतो. पण तो कदाचित हिंदी चित्रपटप्रेमी नसेल म्हणून तो हे वाक्य म्हणाला नाही.

आता यात त्याची काय चूक ? आणि लोक लगेच पवार साहेबांना दोषी ठरवून मोकळे झाले.
7

हाउसफूल - एक विचार

काल हाउसफूल नावाचा चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला. कसली symbolic सुरुवात आहे त्याची. (Lost पहिल्यापासून काहीही symbolic वाटायला लागले आहे. :P)

एका casino मध्ये आलेले सगळे लोक जिंकत असतात. प्रत्येक टेबलावरील प्रत्येकजण फुल उड्या मारून आनंद व्यक्त करताना दाखवला आहे. मग मालक अजून नुकसान होण्यासाठी "कुलर" ला बोलावतो(अक्षय कुमार). अक्षय हा apparently "पनवती मॅन" आहे.(कसली भारी कल्पना आहे :P) त्याचे नशीब एवढे वाईट आहे कि तो ज्याच्या जवळ जातो त्याचे नशीब पण काही काळापुरता वाईट होते. तो casino मध्ये आल्यावर लगेच लोक हरू लागतात.

मी विचार केला कि असा माणूस खरोखर असू शकतो का ? सुरवातीला माझा यावर विश्वास बसला नाही पण थोडा विचार केल्यावर कळले हा खरच "पनवती मॅन"असू शकतो. मी आत्ताच याला पहिले आणि आता मला ३ तास हा भंगार, डोक्यात जाणारा चित्रपट बघावा लागणारे ! माझे नशीब हा समोर आल्यावर थोड्यावेळा साठी का होईना, वाईट झाले आहे.
2

Random thoughts - 8

१) काईट्स प्रदर्शित होईपर्यंत चित्रपटाबद्दल कोणतेही वाद निर्माण झाले नव्हते. या एकाच कारणामुळे चित्रपट चांगला असण्याची थोडीशी आशा मला वाटत होती. पण अर्थातच माझ्या अपेक्षेप्रमाणेच चित्रपट वाईट निघाला. चित्रपटाच्या कथेचा आणि नावाचा काहीतरी संबंध असतो यावर हल्ली लोकांचा फारसा विश्वास राहिलेला नाही. एकमेकांची भाषा समजणाऱ्या दोन प्रेमी जीवांची ही कहाणी आहे. आणि या "कथेची गरज" म्हणून मेक्सिकन बार्बरा मोरीला चित्रपटात घेतले आहे. हे लॉजिक ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला कि यासाठी मेक्सिकन मुलीची गरज काय ? भारतातच एवढ्या भाषा बोलल्या जातात. एखादी दक्षिण भारतीय अभिनेत्री घेतली असती तरी चालले असते कि. कमी बजेटमध्ये झाला असता चित्रपट. कमी बजेट = कमी तोटा :P


) बझवर टाकलेल्या एका सी. आय. डी. पुणेरी पाटीलला मिळालेला प्रतिसाद पाहून ती
आणि अजून पाट्या इकडे टाकत आहे.
अ) घराच्या दारावर लिहिलेली पाटी -
) घराची किल्ली शेजारी ठेवली आहे. सी. आय. डी. च्या लोकांनी आपले ओळखपत्र दाखवून किल्ली घ्यावी. ताकद आहे म्हणून उगाच आमच्या घराचा दरवाजा तोडू नये
.
२) सी. आय. डी. चे ऑफिस वरच्या मजल्यावर आहे. ऑफिस बंद असेल किंवा ऑफिसात कोणी नसेल तर तक्रार सांगण्यासाठी इकडे येवू नये.
ब ) एका Pathology testing lab च्या बाहेर लावलेली पाटी -
आमच्या येथे कोणत्याही टेस्टचा निष्कर्ष कळण्यासाठी किमान २४ तास लागतील. २ मिनिटांत कोणताही निष्कर्ष सांगणारे Dr. साळुंखे फक्त सी. आय. डी. मध्ये काम करतात.

) "कपड्यांचा नवीन स्टॉक" ही काय भानगड आहे हे मला कधीच कळलेले नाहीये. बायका दुकानात गेल्यावर आधी "नवीन स्टॉक दाखवा" असे म्हणतात आणि तो जो स्टॉक दाखवेल तो बघतात. त्यांना नवीन आणि जुन्या स्टॉक मधला फरक कळतो का ? आणि कळत असेल तर कसा ?

४) इंडिअन आयडॉल चा नवीन सिझन सुरु झाला आहे. त्यात अभिजीत सावंत सूत्रसंचालक आहे. वास्तविक त्याला बघून तरी स्पर्धकांनी स्पर्धेतून बाहेर पडायला पाहिजे होते. अभिजीत सावंत हा इंडिअन आयडॉल चा सगळ्यात प्रसिद्ध पावलेला विजेता. बाकीच्या विजेत्यांची नावे पण कोणाच्या लक्षात नाहीत. आणि तोच जर आता हे काम करत असेल तरया स्पर्धेतील विजेत्यांच्या भविष्याबद्दल बोलायलाच नको.

५) बहुतेक वेळा सकाळी ऑफिस मध्ये जाताना विमानांचा आवाज ऐकू येतो. वायुदलातील विमानाचा सराव चालू असतो. पण गाडी चालवत असल्यामुळे वरती बघत बसता येत नाही. अश्याच एका सकाळी मला हा विचार सुचला -
रस्त्यावरून
गाडी चालवत असताना विमानाचा आवाज ऐकू आला तर आकाशात बघत बसू नये. तसे केल्यास आपण (विमानापेक्षाही खूप) वर जाण्याची शक्यता असते
.
11

तारीफ पे तारीफ

कॉलेजनंतर लगेच नोकरी पकडल्याचा एक फायदा म्हणजे बहुतेक प्रत्येक विकांतामध्ये आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटण्याच्या निमित्ताने एकाद्या हॉटेलात जाऊन मनसोक्त हादडतो. त्यामुळे महाराष्ट्रीयन, कोल्हापुरी, थाई, Mexican, चायनीज, इटालियन खाद्यपदार्थ मिळणाऱ्या सगळ्या बहुतेक सगळ्या हॉटेलांची वारी झाली आहे. अश्याच प्रकारे नवीन हॉटेलांचा शोध घेताना मागच्या वर्षी "तारीफ" या हॉटेल बद्दल कळले आणि तेंव्हापासून तारीफ हे आमच्या "Best hotels for chicken" च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

औंधमध्ये सर्जा हॉटेलच्या जरा पुढे Naturals आईस्क्रीम पार्लरच्या शेजारी तारीफ आहे. हॉटेल तसे लहान आणि मागच्या बाजुला असल्यामुळे तेथे हॉटेल आहे हे आधी कळतच नाही. हॉटेलात ४-४ लोकांसाठीची फक्त ८-१० टेबले आहेत. त्यामुळे जर मोठा ग्रुप असेल तर थांबावे लागते. हि जागा जुन्या राजस्थानी पद्धतीने सजवली आहे. टेबलावर बसल्यावरच किचनचा काही भाग दिसतो आणि आपली भूक चाळवते.

तारीफ हे मुख्यत: मुघलाई जेवण, कबाब, बिर्याणीसाठी प्रसिद्ध असले तर तिकडची प्रत्येक डिश उत्तम असते. चिकन तंदुरी, चिकन बिर्याणी या आमच्या तिथल्या ठरलेल्या डिशेस आहेत. प्रत्येक वेळी आम्ही एक नवीन कबाब चाखून बघतो. एखादी डिश चांगली असेल कि नाही नाही हा प्रश्नच तिकडे पडत नाही. ऑर्डर केलेल्या डिशमध्ये वेगळे काय असेल हाच प्रश्न असतो ! तिथले कबाब हे पुण्यात सर्वोत्कृष्ट आहेत असे आमचे मत आहे. चिकनप्रमाणाचे तिकडे असणारे माशांच्या डिश पण अप्रतिम असतात.

सामन्यात: अश्या प्रकारच्या हॉटेलमध्ये शाकाहारी मेनू फक्त नावाला असतो. पण इकडे शाकाहारी पदार्थ पण उत्तम असतात. नुसते शाकाहारी खाण्यासाठी पण इकडे येता येईल. (अर्थात, मी तिकडे शाकाहारी खाल्लेले नाही. माझ्या एका घासफूस खाणाऱ्या मित्राचे हे certificate आहे.) तिकडचे desserts विशेषत: "शाही तुकडा" खरोखरच शाही असतो.

तारीफबद्दल सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे हॉटेलचा मालक. प्रसन्न स्वभावाचा, गप्पिष्ट माणूस आहे हा ! बाहेर वाट बघताना किंवा आत बसून खाताना मधून मधून येऊन गप्पा मारत बसतो तो. आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या गप्पांचा कंटाळा येत नाही. :P

मनसोक्त चिकन हादडल्यावर तिथेच शेवटी दिले जाणारे पान खाऊन शेजारी असलेल्या Naturals मध्ये जाऊन आईस्क्रीम खाणे मस्ट असते.

जर तुम्ही औंध मध्ये असाल किंवा चांगले कबाब खाण्याची इच्छा झाली तर मुद्दाम वाट वाकडी करून तारीफ ला भेट द्या.


----------

हि माझी पहिलीच खादाडीची पोस्ट आहे. आणि तरीही मी तिथले फोटो टाकले नाहीयेत. कारण तारीफच्या एवढ्या सुंदर डिशेस समोर असताना त्याचे फोटो काढत बसणे मला जमले नसते. दगडातून नग्नसुंदरीचे शिल्प तयार करताना शिल्पकार समोर नग्न सुंदरी असताना दगडावर हातोडी मारत बसतो, तसा मनोनिग्रह माझ्याकडे नाही. ;)


------

अपडेट : आत्ताच चिन्मयने सांगितलेल्या माहितीनुसार टेस्टी खाना ने कालपासून home delivery च्या लिस्ट मध्ये तारीफचा समावेश केला आहे.
2

श्वान हॉस्टेल

कुत्र्यांबद्दल आणि विशेषत: त्यांच्या मालकांबद्दल पु.लं.नी एवढे लिहून ठेवले आहे कि अजून कोणी काही लिहायची गरजच नाहीये. तरीपण कुत्र्यांबद्दल आणि त्यांच्या मालकांबद्दल ऐकलेले काही लेटेस्ट किस्से इकडे लिहित आहे.

------

कुत्र्यांचे हॉस्टेल हि कल्पना मी जेंव्हा ऐकली तेंव्हा मी उडालोच होतो. कुत्र्यांचे पाळणाघर (मला नक्की शब्द माहित नाही !) ही कल्पना आता नवीन नाही. ती आता गरजही बनली आहे. काही दिवसांसाठी बाहेर जायचे असेल तर पाळीव प्राण्यांना कोठे ठेवायचे हा प्रश्न नेहमीच पडतो. कुत्र्यांच्या पाळणाघरात कुत्र्यांना काही दिवसासाठी सांभाळले जाते. काही दिवसांपूर्वी अक्षयने मला त्याच्या शेजाऱ्यांची सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकवली.

हे शेजारी वर्षातील बराचसा काळ देशाबाहेरच फिरतीवर असायचे. कधीतरी त्यांच्या पुण्यातील घरी १५-२० दिवस राहायचे. त्यांनी एक कुत्रा पाळला होता. ते जेंव्हा घरी राहायचे तेंव्हाच त्याचे पालन करणे त्यांना जमत होते. मग त्यांनी कुत्र्याला चक्क हॉस्टेलमध्ये ठेवले. वर्षभर कुत्रा तिथे राहायचा आणि सुट्टीत थोडे दिवस मालकांकडे यायचा.
शेजारी कुत्र्याचा वाढदिवस केक, फुगे, पार्टीने जल्लोषात साजरे करायचे. अर्थात या पार्टीसाठी आजूबाजूच्या कुत्र्यांना बोलावयाचे का नाही ते मात्र माहित नाही. नाहीतर "आज आमच्या कुत्र्याचा (येथे त्याचे नाव असते. कुत्र्याला त्याच्या नावानेच हाक मारतात. नुसते "कुत्रा" म्हणत नाहीत.) Happy birthday आहे तर तुम्ही तुमच्या कुत्र्याला(येथे कुत्र्याचे नाव टाकावे) घेवून यावे" अशी चिठ्ठी शेजारी आली असती.

असेच चालू राहिले तर अप्पासाहेबांना शुभेच्छा देणाऱ्या या पाटीत sarcasm राहणार नाही नाही. हौशी श्वान मालक खरोखर अश्या पाट्या लावतील.


(फोटो पुणेरी पाट्या वरून साभार)
--------

आमच्या नवीन शेजाऱ्यांकडे कुत्रा आहे. त्याला सगळे येते हे मी विनायकला सांगत होतो. माझे जरा वेळ ऐकून घेतल्यावर तो शांतपणे म्हणाला, "सगळे, सगळे म्हणजे काय ? इकडे ये, तिकडे जा, खाली बस, उभा राहा, भुंकू नकोस, हे आण एवढ्या ५-६ क्रियाच त्याच्याकडून अपेक्षित असतात, आणि जर त्याला एवढे पण जमत नसेल तर कुत्रा काय पाळता ? गाढवच पाळा ना. "
5

Random thoughts - 7

१) खजुराच्या लोणच्याचा शोध कसा लागला असेल ?

एकदा एका सुनेने चुकून २ किलो खजूर एकदम आणला. ते पाहून तिची सासू चिडली आणि तिला म्हणाली, "एवढ्या खजुराचे काय लोणचे घालायचे आहे का ?" सुनेच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. "आंब्याचे लोणचे करतात तर खजुराचे लोणचे करून का बघू नये" असा विचार तिने केला आणि अश्या रीतीने खजुराच्या लोणच्याचा जन्म झाला.

२) परवाचीच गोष्ट आहे !
ऑफिसातून घरी येताना माझ्या पुढे एक काकू "बायकांच्या नॉर्मल स्पीड"ने activa चालवत होत्या. त्यांच्या मागच्या सीटवर त्यांचा कुत्रा तोल सांभाळून बसला होता. मागच्या सीटवर कुत्रा न बांधता नुसताच बसलेला बघितला नव्हता मी अजून कधी ! गाडी चालवणाऱ्या काकू आणि तो कुत्रा दोघांचेही कौतुक वाटले मला.


३) "कुस्ती" चित्रपटाचा प्रोमो बघितला. पैलवान खली अभिनय करतो आहे या चित्रपटात. हिंदी चित्रपटातील नाच-गाण्याचा अट्टाहास डोक्यात जातो बरेचदा. खलीला काय नाचवता अरे ! नाचताना (आणि एकूणच सगळीकडे) तो थर्ड क्लास animated movie मधले बेढब पात्र वाटतो. अजून किती गाण्यांत नाचणार आहे तो कोणास ठाऊक !


४) काल पहिल्यांदाच घुंगरू न लावलेले उसाचा रस काढणारे यंत्र बघितले. व्यवस्थित चालते कि ते पण :P

५) हा फारच वेगळ्या प्रकारचा विचार आहे.
फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्ब कसा फोडायचा ?
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या परिसरात बॉम्ब असलेली दुचाकी फारसा विचार न करता पार्क करा. फार विचार न करता या विभागात गाडी लावली तर ती खात्रीने "No Parking" विभागातच लावली जाते. ५-१० मिनिटांमध्ये वाहतूक पोलिसांचा ट्रक येवून तुमची गाडी घेवून फरासखाना पोलीस स्टेशनात घेवून जाईल. झाले तुमचे काम !

आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या परिसरातच बॉम्ब फोडायचा असेल तर ?
जरा विचार करून, बरोबर पार्किंग विभागातच गाडी पार्क करा.६) कधी कधी मला वाटते कि आपल्या देशाचे "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य बदलून "All iz well" ठेवावे कि काय ? एवढ्या depressing घटना घडत आहेत आजूबाजूला, अश्या खोट्या आशेची तरी गरज आहे आपल्याला.

७) माझ्या सेलफोनचा display बंद पडल्यापासून आंधळा माणूस जसा मोबाईल वापरेल तसा मी वापरतोय. कोणाचा call आल्यावर आवाज ओळखला नाही तर उगीच फोन बिघडल्याची टेप वाजवावी लागते. जर येणाऱ्या call ला शझाम software वापरून फक्त "hello" शब्द ऐकून call कोणाचा आहे ते कळले असते तर किती बरे झाले असते !
त्याच्या पुढे जाऊन, भेटणाऱ्या लोकांवर त्याचा उपयोग करून "ओळखलस का ? मागच्या वेळी भेटलो होतो तेंव्हा एवढासा होतास !" असे विचारून बुचकळ्यात टाकणाऱ्या लोकांना याचा उपयोग करून ओळखता आले तर किती बरे होईल !
6

प्रिन्स - देशी सुपरहिरो

प्रिन्स चित्रपटाच्या जाहिरातीवरून हा चित्रपट फक्त बोर्न सिरीज वरून ढापला असेल वाटले होते. मजीद माजिदीचे सहा चित्रपट ओळीने बघितल्यानंतर जरा बदल म्हणून एक विनोदी चित्रपट पाहावा म्हणून प्रिन्स बघण्याचे धाडस केले. आणि हा चित्रपट अपेक्षेप्रमाणेच विनोदी निघाला. या चित्रपटाची जाहिरात "from the makers of Race" अशी केली जाते. आता ही काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का ? या चित्रपटाबद्दल आणि एकूणच अश्या प्रकारच्या चित्रपटांबद्दलची माझी काही निरीक्षणे -

१) चित्रपटाची सुरुवात प्रिन्सने केलेल्या एका तथाकथित फंडू चोरीने होते. प्रिन्स किती भारी चोर आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असावा. हिंदी चित्रपटातील असली चोरीची दृश्ये मला अशी विनोदी का वाटतात ते समजत नाही. उगीच काळे कपडे घालून, संगणकावरील २-४ बटणे दाबून काहीही करणारे हे चोर हे सगळे शिकतात कुठे ? crash course असतो का कुठे याचा ? धूम, किडनॅप व अश्या अनेक चित्रपटांमध्ये असे दाखवले आहे.

२) प्रिन्स हा जगातील फार मोठ्या गुन्हेगारासाठी काम करत असतो. आता हे अतिमोठे गुन्हेगार सगळी कामे स्वत:च का करतात ? कोणत्याही मामुली माणसाला मारायला पण हे स्वत:च का जातात ? ओसामा ने स्वत: हत्यार हातात घेतल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

३) हल्ली चित्रपटाची कथा परदेशात घडते. गुन्हा घडला कि त्याचा तपास करणारा पोलीस अधिकारी भारतीय असतो आणि त्याच्या हाताखाली गोरे लोक असतात. प्रिन्स मध्ये तर सी.बी.आय.ची आख्खी ब्रांच आफ्रिकेत असते. आणि ते लोक तिकडे पूर्ण अधिकाराने काहीही करत फिरत असतात. खरे म्हणजे सी.बी.आय भारतात काय काम करते हाच प्रश्न आहे. कोणतेही प्रकरण सी.बी.आय कडे सोपवेपर्यंत त्याचा गाजावाजा होतो नंतर काही बातमी येत नाही. इथे जर अशी स्थिती आहे तर आफ्रिकेत ते जातीलच कशाला?

४) चित्रपटात प्रिन्सची स्मरणशक्ती निघून गेल्यावर थोड्या वेळाच्या अंतरात ३ वेगवेगळ्या मुली येवून त्या त्याची प्रेयसी असल्याचे आणि त्याच्यावर प्रेम करत असल्याचे सांगतात. हे बघून "प्रिन्स दुल्हनिया ले जायेगा" हा कार्यक्रम तर मी बघत नाहीये ना अशी शंका मला आली.

५) प्रिन्स फक्त बोर्न सिरीज वरून ढापला असेल मला वाटले होते. पण पुढे पुढे बघताना अनेक प्रसंग वेगवेगळ्या चित्रपटातून उचलल्याचे वाटत होते. याला म्हणतात अभ्यास ! एवढे चित्रपट बघायचे आणि त्यातील चांगले प्रसंग निवडून एका चित्रपटात आणण्याचा प्रयत्न करायचा. याबद्दल तरी चित्रपट निर्मात्यांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्याचा पाहिजेत.

६) चित्रपटात दाखवलेला मेमरी चीप चा शोध तर अप्रतिमच आहे.या चीपच्या सहाय्याने माणसाच्या सर्व आठवणी पडद्यावर चित्रपटाच्या स्वरुपात दिसतात आणि त्या बदलता सुद्धा येतात. अगदी खोडता सुद्धा येतात. आणि हे बदल माणूस झोपेपर्यंत अस्तित्वात येत नाही. आपण झोपल्यावर आपली मेमरी म्हणे reboot होते आणि मग हे स्मरणशक्तीमधील बदल दिसून येतात. काय सुंदर कल्पना आहे ! अर्थातच आता या चीप च्या मागे सगळे लोक लागलेले असतात. आणि प्रिन्सची स्मरणशक्ती या चीपचा वापर करून पूर्णपणे खोडलेली असते. सगळ्या चित्रपटात जे घडते तेच शेवटी इकडे पण घडते. प्रिन्सची स्मरणशक्ती परत येते, चीप योग्य हातांत पडते, प्रेमाचा विजय होतो इत्यादी इत्यादी.

प्रिन्सचे scene by scene विनोदी परीक्षण तुम्हाला इथे वाचता येईल.
3

चिल्ड्रेन ऑफ हेवन

कालच चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहीला. खूप ऐकलं होतं, आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावर केलेले नाटकही बघितले होते. काल प्रत्यक्ष चित्रपट पाहण्याचा योग आला. खरच नितांत सुंदर चित्रपट आहे हा.

चित्रपटाची कथा बहुतेकांना माहित असेलच. नेहमीच्या बॉलीवूड, हॉलीवूड चित्रपटांपेक्षा हा चित्रपट बघणे म्हणजे एक सुखद अनुभव होता. साध्या साध्या प्रसंगातून दिग्दर्शक माजिद माजिदी यांची ताकद कळते. झाराचे बूट हरवल्यावर अलीचे ते शोधणे, घरी येवून झाराला आपले बूट घालण्यासाठी विनवणे, वडिलांची गरिबी पाहून त्यांना बूट हरवल्याचे न सांगणे, अलीचे जुने बूट धुताना पाण्याचे फुगे करून खेळणे, अलीचे बूट घालून धावत घरी येताना १ बूट गटारात पडल्यावर झाराची बूट मिळवण्यासाठी चाललेली धडपड, धावण्याच्या शर्यतीत अलीचे तिसऱ्या क्रमांकासाठी धावणे, स्पर्धेत पहिले आल्यावर अलीचा रडवेला चेहरा अश्या अनेक प्रसंगात आपण चित्रपटाशी एकदम समरस होवून जातो. चित्रपटाचे कास्टिंग एकदम परफेक्ट आहे. विशेषत: अली आणि झारा यांचा अभिनय, त्यांच्या चेहरयाचे expressions तर लाजवाब आहेत.

मला वाटते, "हा चित्रपट नक्की बघा" हे सांगण्यासाठी एवढे पाल्हाळ पुरेसे आहे. तेंव्हा मी आता थांबतो. हा चित्रपट गूगल व्हिडिओवर पण उपलब्ध आहे. भाग आणि भाग या २ भागांत तो पाहता येईल.
15

सि.आय.डी. शायरी

सि.आय.डी. मालिकेला मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या दूरदर्शन इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालू असलेली ही मालिका आता बहुतेक सगळ्यांनाच माहित असेल. हल्ली तर सोनी टि.व्ही वर बघावे तेंव्हा सि.आय.डी. च चालू असते. अनिकेत ने सि.आय.डी. वर लेखसुद्धा लिहिला आहे. मी पण सि.आय.डी. विनोदी कार्यक्रम म्हणूनच बघतो. प्रत्येक भागात काही ठरलेल्या घटना आणि संवाद घडतातच.


सध्या अश्या सि.आय.डी.मधील ठरलेल्या वाक्यांचा उपयोग करून शेरो-शायरी करण्याची लाट आली आहे. यातील बहुतांश शेरचा निर्माता माहित नाही. पण सगळ्या शायरीमध्ये एक गोष्ट समान आहे. सि.आय.डी. मधले एखादे ठराविक वाक्य घ्यायचे, आणि त्याच्याशी rhyme असणारे (आणि काहीही संबंध नसणारे !) दुसरे वाक्य बनवायचे. त्यातलेच काही शेर खाली देत आहे.

१) तू ही मेरे दिल की आरजू, तू ही मेरे जीवन की तलाश ,
तू ही मेरे दिल की आरजू, तू ही मेरे जीवन की तलाश ,
O my god ! दया, एक और लाश !

२) English में गाय को कहते हैं cow,
English में गाय को कहते हैं cow,
दया, कुछ तो बात है, जरा पता तो लगाओ !

३) mango का बनता है आचार, tomato का बनता हैं sauce,
mango का बनता है आचार, tomato का बनता हैं sauce,
Dr. सालुंखे ने कहा, खाने में जहर मिला हैं Boss !

४) रात के पहलु में , चाँद सितारे छाए है ,
रात के पहलु में , चाँद सितारे छाए है,
Madam , दरवाजा खोलिए, हम CID से ए हैं !

५) ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ,
ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ,
दया, हमें उस जगह वापस जाना चाहिए !

६) आसमान में दिखनेवाला sun नहीं moon है,
आसमान में दिखनेवाला sun नहीं moon है,
Dr. सालुंखे ने कहा, ये आत्महत्या नहीं, खून है !

7) मेरे घर के पीछे एक नाला है,
मेरे घर के पीछे एक नाला है,
अभिजीत, दाल में जरूर कुछ कला है !

८) अब तो ज़िन्दगी से यही गिला है,
अब तो ज़िन्दगी से यही गिला है,
Boss इधर तो आना, मुजे कुछ मिला है !

९) अपने प्यार का इजहार उसे करू कैसे ?
अपने प्यार का इजहार उसे करू कैसे ?
दया, जरा पता लगाओ की ये हुवा कैसे ?

१०) देवदास से मिलाने गयी पारो,
देवदास से मिलाने गयी पारो,
फ्रेडरिक्स, तुम प्लीज जोके मत मारो !

११) अपनी मेहनत का पसीना इस तऱ्ह मत पोचो,
अपनी मेहनत का पसीना इस तऱ्ह मत पोचो,
ACP ने कहा, "सोचो दया, सोचो "

१२) तुमसे मिलके बातें करना बड़ा अच्छा लगता है,
तुमसे मिलके बातें करना बड़ा अच्छा लगता है,
दया, कातिल काफी शातिर दिमाग लगता है

१३) आज मजा नहीं आया सुखी भेल मैं
आज मजा नहीं आया सुखी भेल मै,
ACP ने कहा, "अब पूरी जिंदगी सड़ते रहना जेल मैं"

आणि सगळ्यात शेवटी,

१४) ५ रुपये का एक समोसा , १० रुपये के दो,
५ रुपये का एक समोसा , १० रुपये के दो,
दया, दरवाजा तोड़ दो !
5

Random thoughts - 6

१) सचिनला भारतरत्न देण्याची मागणी आता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्याला भारतरत्न मिळणार यात शंका नाही, फक्त कधी मिळतोय हाच प्रश्न आहे. सचिनला भारतरत्न देण्याची मागणी सर्वच पक्षांनी केल्यामुळे त्याला तो मिळाल्यावर "आम्ही मागणी केल्यामुळे सचिनला आत्ता लगेच पुरस्कार मिळाला" अश्या आशयाचे फलक सगळीकडे सगळीकडे लागणार का अशी शंका मला येत आहे.

२) पु. ल. देशपांडे यांचे लेखन आवडत नसणारी माणसे या जगात आहेत याचा मला आत्ताच शोध लागला. मला त्यांचे लेखन न वाचलेली/ऐकलेली माणसे आहेत, मला आंबा न आवडणारी माणसे माहित आहेत. पण पु.लं. चे लेखन न आवडणारी आणि हे अभिमानाने सांगणारी माणसे मी पहिल्यांदाच बघितली. "पु. ल. आवडत नाहीत, तर मग काय आवडते ?" हा प्रश्न विचारण्याचे धाडस मला झाले नाही.

३) "माय नेम इज खान" हा चित्रपट काही काळापूर्वी बघितला. मला वाटते की हा चित्रपट बकवास आहे हे शिवसेनेला आधीच माहित होते आणि असा चित्रपट बघण्यापासून लोकांना रोखणे हाच त्यांच्या आंदोलनाचा खरा हेतू होता. चित्रपटात शाहरुख खान फार मोठा, ऐतिहासिक(??) प्रवास करून अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटतो आणि आपण अतिरेकी नसल्याचे सांगतो. हे पाहून माझ्या मनात एक प्रश्न आला कि एवढा मोठा प्रवास करण्यापेक्षा तो ओबामांना tweet करून हे का सांगत नाही ? तसेही ते twitter वर आहेत.

४) मध्यंतरी राहुल गांधी मुंबईत आलेले असताना रमेश बागवेंनी त्यांचे जोडे उचलून आपल्या लाचारीचे प्रदर्शन घडवले. त्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली. इतर सर्व पक्षांनीसुद्धा त्याचा निषेध केला. हे पाहून माझ्या मनात विचार आला की आजच्या घडीला असा कोणता राजकारणी आहे जो आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचे जोडे उचलणार नाही. मला तरी असे कोणते नाव सुचले नाही. कोणाला असा नेता माहित आहे का ?

५) हॉकी विश्वचषक स्पर्धा सध्या सुरु आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी इतर क्षेत्रातील व्यक्तीचा वापर हिरो होंडाने त्यांच्या जाहिरातीमध्ये केला. त्यावरून हॉकीची परिस्थिती कळते. सेहवाग, प्रियांका चोप्रा, राज्यवर्धन राठोड यांच्या जाहिराती बघून ते एकाद्या सामन्याला तरी येईल असे मला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. ते सामन्याला आले असते तर सामन्यातील अर्धा वेळ camera त्यांच्यावरच असता याची मला खात्री आहे.

६) हल्ली २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या असल्यामुळे बातम्यांचा सुळसुळात झाला आहे. या बातम्यांत एक दृश्य हमखास दिसते की पोलीस गुन्हेगाराचा चेहरा झाकून त्याला नेत आहेत. गुन्हेगाराचा चेहरा असा का झाकतात ते मला कळत नाही. जर मला गुन्हेगाराचा चेहरा माहित असेल तर मी त्याच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करीन. तसेही ब~याच गुन्हेगारांना जामीन मिळत असल्यामुळे ते लगेच समाजात मिसळतात. तेंव्हा जर लोकांना त्याच्याबद्दल माहिती असेल तर ते सावध राहू शकतील.

७) राम गोपाल वर्माने त्याच्या नवीन चित्रपटाच्या जाहिरातीसाठी चित्रपटगृहात एकट्याने चित्रपट पाहिला तर कितीतरी हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. ते ऐकून मला माझ्याच चित्रपट प्रदर्शन - आज कल या लेखाची आठवण झाली.
7

ऑफिसातील मायक्रोव्हेव ओव्हन

मी ऑफिसमध्ये डबा घेवून जातो हे कळल्यावर माझी दूरच्या नात्यातील एक काकू branded आणि महागातला जेवणाचा डबा घ्यावा म्हणून माझ्या मागे अडून बसली. अर्थातच तिच्याकडे त्या डब्यांची agency आहे. (असले कोणत्यातरी agency असलेले नातेवाईक सगळ्यांनाच असतात का ? :P) मी तिला माझा डबा चांगला असल्याचे नाना परीने पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी तिने तिचे राखीव हत्यार काढले.

काकू - " तुझा डबा स्टेनलेस स्टीलचा असल्यामुळे त्यातील जेवण गार होते. माझ्याकडील डब्यात अन्न गरम राहते."
मी - "आमच्या ऑफिसात मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्यात जेवण गरम करता येते."
काकू - "पण त्यासाठी काचेची भांडी लागणार ना मग ? मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये स्टील कसे चालणार ? "
मी - "आमच्या मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये चालते सगळे"
काकू - "तुला घ्यायचा नसेल डबा तर सरळ सांगून टाक ना तसे. उगीच थापा का मारतोस ?"
मी - "डबा मला घ्यायचा नाहीये. पण मी थापा मारत नाहीये. आमच्या ऑफिसमधील मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये खरच काहीही ठेवलेले चालते"

खरच ! ज्यांना-ज्यांना मी हे सांगतो त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये high frequency radio waves असतात जे अन्नातील रेणुंवर आदळून त्यांना आपल्या जागेवरून हलवतात. रेणू एकमेकांवर आदळून उष्णता तयार होते नि पदार्थ तापतो. धातू सामान्यपणे विद्युत सुवाहक असल्यामुळे जर धातू ओव्हन मधेय ठेवले तर या waves च्या मार्गात अडथळा येतो. त्यामुळे मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये धातू वापरू नये अशी सूचना असते.

अर्थात घराच्या ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. पण हा ओव्हन ऑफिसचा असल्यामुळे एवढा विचार कोणी केला नसावा. जेवणाच्या वेळेस अन्न गरम करण्यासाठी आमचे जेष्ठ सहकारी त्यात स्टीलची भांडी ठेवताना बघून आम्ही पण सर्रासपणे हे करण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे ओव्हनला काही त्रास झाला नाही. अन्न व्यवस्थित गरम होते. ओव्हनचा स्फोट वगैरे काही होत नाही.

आमच्या ओव्हनमध्ये स्टील ठेवलेले का चालते याची काही गमतीशीर कारणे आम्ही शोधली आहेत -
१) हा खरा ओव्हन नाहीये. तिकडे खालती gas शेगडी आहे.
२) या ओव्हन ला patch मारला आहे.
३) ओव्हनमध्ये स्टीलला काचेमध्ये tyepcast केले जाते.

आपल्याला आयुष्यात असे बरेचदा सांगण्यात येते की एखादी गोष्ट करू नका नाहीतर मोठे नुकसान होईल आणि आपण भीतीने ती गोष्ट करत नाही. पण शेवटी एखादेवेळेस चुकून आपण ती गोष्ट करतो आणि आपल्याला कळते की ती गोष्ट केली तर काही नुकसान होत नाही तर फायदाच होतो.

[नोंद :ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवा हे सांगण्यास हा लेख लिहिलेला नाही. मी फक्त माझा अनुभव सांगितला आहे. तुमच्या ओव्हनमध्ये स्टीलची भांडी ठेवल्यावर तुमचे काही नुकसान झाले तर त्याला मी जबाबदार नाही. ]4

TEDx @ पुणे

TEDx चा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यासाठी स्वयंसेवकांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. जागतिक दर्जाचा कार्यक्रम करण्यसाठी आम्हांस स्वयंसेवकांची गरज आहे. कृपया TEDx च्या mailing list चे सदस्य होवून आम्हाला मदत करा. प्रकल्प आरंभाची सभा शानिवारी २७ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत SICSR (Symbiosis Institute of Computer Studies and Research, Model Colony. नकाशा ) होईल . कृपया सभेस या. सभेस कोणीही हजर राहू शकतो. सभा नि:शुल्क आहे.

TEDx बद्दल थोडेसे :सेन्धील मुल्लैनाथान यांचा हा TED वरील व्याख्यानाचा हा video आहे. "आपण साध्या समस्या उपाय माहीत असूनदेखील कश्या सोडवू शकत नाही ?" या विषयावरचे हे भाषण बघून आपणांस TED वरील भाषणांची कल्पना येईल. प्रणव मिस्त्रीचा हा Sixth sense technology चा video तर आपण बघितलाच असेल.

TEDx हि TED ची स्थानिक पातळीवरील आवृत्ती आहे. तुम्हाला TED बद्दल माहिती असेल किंवा TED चे काही videos आपण बघितलेही असतील. TED हि ना-नफा तत्वावर काम करणारी एक संघटना आहे. प्रेरणादायी कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटनेतर्फे जगभरात विविध ठिकाणी व्याखानसत्रे आयोजित केली जातात. एखाद्या कल्पनेत असणाऱ्या जग बदलण्याच्या शक्तीवर TED चा विश्वास आहे. म्हणूनच TED उत्कृष्ठ विचार असलेल्या कल्पना भाषणांच्या स्वरुपात एकत्र करत आहे. आणि या भाषणांचे video सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. TED हे "Technology, Entertainment and Design" चे लघुरूप आहे. पण आता जगाला बदलून टाकणारी कोणतीही कल्पना TED मध्ये समाविष्ट होते.

TEDx हे TED च्या मानांकनानुसार भरणारे स्थानिक पातळीवरील व्याखानसत्र आहे. अर्ध्या किवा पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात निमंत्रित, काळजीपूर्वक निवडलेल्या लोकांची व्याखाने होतात. कोणतेही व्याखान १८ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचे नसते. विषय वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात. कार्यक्रमात फक्त व्याखाने असतात. इतर काही नाही. आणि ही व्याखाने खरोखर सुंदर असावीत आमची इच्छा आहे. व्याखाने जी श्रोत्यांना विचारमग्न किंवा अचंबित करतील !

माझी खात्री आहे कि पुण्यात अश्या बऱ्याच व्यक्ती आहेत. त्यांना शोधण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. जयंत नारळीकर, अरविंद गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती संभावित वक्त्यांच्या यादीत आहेत. यांना बोलावण्याचा प्रयत्न आम्हीच करूच, पण याच बरोबर, तरुण, फारश्या प्रसिद्ध नसलेल्या पण पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरू शकतील अश्या कल्पना असणाऱ्या वक्त्यांची आम्हाला गरज आहे.

असे वक्ते शोधण्यास आम्हास मदत करणार ना ? तर मग, २७ तारखेच्या सभेला या. आणि TEDxPune group चे सदस्य व्हा. (किंवा TEDxPune ला Twitter वर follow करा.)


[Punetech वरील या लेखाचा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे . आहे. एकाद्या इंग्रजी लेखाचे मराठीत भाषंतर करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.]
9

अमेरिकेचे अध्यक्ष अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज संध्याकाळी अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार झाले. ओसामा नावाच्या अतिरेक्याने केलेल्या बेछुट गोळीबारीत ते जागच्या जागी मरण पावले. "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

ओसामा गेल्या महिन्यापासूनच चर्चेत होता. अमेरिकेच्या विमानतळावर उतरल्यापासूनच त्याचे वागणे वेगळे होते. समोरचा माणूस अस्वस्थ होईपर्यंत त्याच्याकडे एकटक बघण्याचा विचित्र आजार त्याला होता. अमेरिकन विमानांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यात आई मरण पावल्यावर तो आपल्या मोठ्या भावाकडे राहण्यासाठी आला होता. विमानतळावर तपासणी चालू असतानाच त्याने अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याचे मनसुबे जाहीर केले होते. "माझे नाव ओसामा आहे आणि मी अतिरेकी आहे." हा निरोप त्याला अध्यक्षांना सांगायचा होता. हातात मशीनगन घेवून तो मधून मधून "शुटींग" करत असे. "सगळे मुसलमान अतिरेकी नसतात" असे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांवर तर तो फारच चिडत असे.

"मी अतिरेकी आहे" अशी कबुली दिल्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. पण ही घटना अभूतपूर्व असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. खरा अतिरेकी कधी अशी कबुली देत नाही असे वारंवार सांगून त्यांनी सरकारवर त्याला सोडण्यासाठी दबाव आणला होता. "ओसामा खरच अतिरेकी आहे का ?" यावर एक sms contest सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ९० % लोकांनी तो अतिरेकी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याची सुटका झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने sms पाठवणा~यांचे आभार मानून अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या अतिरेक्यांविरुद्ध अमेरिका लढत आहे ते अतिरेकी नक्की आहेत तरी कसे हे जाणून घेण्यासाठी अध्यक्षांनी आपल्यासोबत एखादी बियर पार्टी आयोजित करावी अशी सूचना त्याने केली होती. "I can screw up almost anything" असा बोर्ड घेवून तो दारोदार भटकत होता.

अखेरीस ओबामांनी त्याला भेटायचे मान्य केले. आज संध्याकाळी त्यांची भेट एका पटांगणात झाली. दोघांचेही समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. हातमिळवणी आणि बियरची १-१ बाटली झाल्यावर ओबामांनी "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" अशी घोषणा केली. त्यावर प्रतिकिया म्हणून ओसामाने हातातल्या बंदुकीने ओबामांवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बियरमध्ये काहीतरी मिसळलेले असावे असा अंदाज विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.

"मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर अतिरेक्यांसोबतचेच नव्हे तर सर्वच ठिकाणाचे युद्ध संपवीन आणि मगच नोबेल पारितोषिक स्वीकारीन" अशी घोषणा ओसामाने केली आहे. त्याला हंगामी अध्यक्ष बनवण्याच्या जोरदार हालचाली चालू आहेत.

ओबामांचा अंत्यसंस्कारविधी उद्या पार पडेल.

[संपूर्ण काल्पनिक ]

3

समुद्रापारचे समाज

"शाळा"चे लेखक म्हणून मिलिंद बोकील आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांची "झेन गार्डन" वगळता इतर पुस्तके मी वाचली नव्हती. काही दिवसापूर्वीच त्यांचे समुद्रापारचे समाज हे पुस्तक वाचले आणि मी भारावून गेलो.

देशोदेशीच्या वेगवेगळ्या समाजांवर लिहिलेले हे लेख आहेत. पण हे नुसतेच प्रवासवर्णन नाही. तर विकास, समृद्धी, संस्कृती, जागतिकीकरण, जातीव्यवस्था या विषयांवरचे आपले पूर्वग्रह हलवण्याचे काम हे लेख करतात.

उत्तर फिलिपीन्सच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी, बैरॉईटमधील एक समाजकार्य करणारा समूह, कोस्टा रिका मधील जंगल पर्यटन, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे, जपानमधले दलित, नैसर्गिक शेती करणारे ब्राझील मधील शेतकरी असे अनेक विषय मिलिद बोकील यांनी हाताळले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या व्यवस्थेची आपल्या समाजव्यवस्थेची तुलनाही केली आहे.

"माबुहाय इफ़ुगाओ" या लेखात तथाकथित मागासलेल्या आदिवासींच्या समृद्ध जीवनपद्धतीबद्दल ते सांगतात. निसर्गाचा कमीत कमी नाश करून, परस्परांस मदत करून, पाश्चिमात्य विकासवाद्यांच्या आक्रमणाला तोंड देत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्यांनी मांडला आहे.
"बैरॉईटचे मित्र" या लेखात बोकीलांनी बैरॉईटमधील एका समाजकार्य करणाऱ्या समूहाची ओळख करून दिली आहे. त्यांच्यातील एका सोबत झालेले बोकीलांचे तात्विक संभाषण त्यांनी दिले आहे. ते अंतर्मुख करणारे आहे.
"कोस्टा रिका" मध्ये कोस्टा रिकातील जंगल पर्यटन, परराष्ट्रीय कंपन्याच्या हाती असलेला तिथला कारभार आणि त्याचा निसर्गावर, तिथल्या स्थानिक लोकांवर होणारा परिणाम यावर बोकील भाष्य करतात.
"ऍमस्टरडॅम" आणि "अमेझिंग थायलंड" या लेखात लैंगिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असेलेल्या ऍमस्टरडॅम आणि थायलंड या ठिकाणच्या लैंगिक शोषणाबद्दल लिहिले आहे. बाजारीकरण, जागतिकीकरण याच्या नावाखाली प्रस्थापित होणाऱ्या उपभोगवादी बाजारू व्यवस्थाचे दर्शन आपल्याला घडते.
"झिम्बाब्वे : गोरा आणि काळा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. वसाहतवादामुळे झिम्बाब्वेतील काळ्या लोकांची, तसेच जपान मधील "बुराकू" समुदायाची स्थिती त्यांनी मांडली आहे. एकाद्या घटकाला हीन ठरवणे, त्याच्या प्रगतीच्या वाट बंद करणे हे सर्वत्र कसे सारखे आहे हे या लेखांत विस्ताराने सागितले आहे.
"जागे झाले ब्राझिलचे शेतकरी" या शेवटच्या लेखात नैसर्गिक शेतीकडे वळलेल्या ब्राझील मधील शेतकऱ्यांची कथा आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बोध घेण्यासारखीच त्यांची कथा आहे.

प्रत्येक लेख हा अभ्यापूर्ण आहेच तसेच तो वाचकालाही विचार करण्यास लावणारा आहे. प्रत्येक गोष्टींवरची बोकिलांची निरिक्षणे आणि टिपणे आपल्याला पूर्ण पटतात. वसंत पळशीकर यांनी पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना तर पुस्तकातील अजून एक लेख होऊ शकेल. प्रत्येक लेखाचे मार्मिक परिक्षण प्रस्तावनेत केले आहे.


खूपच उत्तम पुस्तक आहे. नक्की मिळवून वाचा. मला हे पुस्तक वाचण्यास दिल्याबद्दल सलील चे आभार !
7

झेंडा

अवधूत गुप्ते चित्रपट काढणार हे ऐकून माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. तो राजकारणावर चित्रपट काढणार आहे हे कळल्यावर आणि चित्रपटातील "विठ्ठला" आणि "पत्रास कारण की" ही गाणी ऐकून तर उत्सुकता अजून वाढली होती. पण झेंडा बघून माझ्या अपेक्षा साफ धुळीस मिळाल्या.

शिवसेना-मनसे च्या कलहाच्या पार्श्वभूमीवर समाजातील ४ वेगवेगळ्या स्तरावरील तरुणांची ही कथा आहे. कथेला सुरुवात होते तेंव्हा काकासाहेब सरपोतदार आपल्या "जनसेना" या पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून मुलगा उमेश याची निवड करतात. यामुळे निराश होवून त्यांचा पुतण्या राजेश सरपोतदार "महाराष्ट्र साम्राज्य सेना" या नावाचा स्वत:चा वेगळा पक्ष काढतो.

आदित्य महाजन हा एका event management कंपनीतील तरुण. नितीमुल्ये वगैरे फारसे न मानणारा. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने तो त्यांच्या संपर्कात येतो आणि मग हळूहळू त्यांच्याकडून अधिकृत, अनधिकृत कामे करून शेवटी सर्वच पक्षाच्या नेत्याची सर्व प्रकारची कामे करणारा दलाल बनतो.
उमेश जगताप हा हिंदुत्ववादी तरुण राजेश सरपोतदार यांच्या सोबत त्यांच्या नवीन पक्षात जातो. राजेश सरपोतदार यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी बघून व्यथित होवून शेवटी अमेरिकेला जातो.
संतोष शिंदे हा उमेशचा मित्र. काकासाहेबांशी एकनिष्ठ राहून तो जनसेनेतच राहतो. पण उमेश सरपोतदार यांनी पक्ष टिकवून ठेवण्यासाठी आखलेल्या नवीन धोरणांनी निराश होतो.
अविनाश मोहिते या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनिष्ठ घराण्यात वाढलेला तरुण. सत्तेसाठी तो जनसेनेतून साम्राज्य सेनेत येतो. जिल्हा परिषद, आमदार, खासदार असा मार्ग मनाशी पक्का असलेला तरुण. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षातुन आलेल्या एका पैसेवाल्या उद्योगपतीला तिकीट दिल्यावर चिडून तो राजकारण सोडतो.

मग मला हा चित्रपट का आवडला नाही ?

चित्रपटातील बहुतांश व्यक्तिरेखा मला अवास्तव, उथळ वाटल्या. चित्रपटात नेते स्वत:च्या स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतात(हे खरे आहे !) आणि कार्यकर्ते अजिबात विचार न करणारे, नेत्याच्या एका निर्णयावर टोकाचे पाऊल उचलणारे दाखवले आहेत.

आदित्य महाजन हे पात्र जरा वास्तववादी आहे. अश्या प्रकारचे दलाल राजकारणात आधीपासून आहेत आणि राहतील. वास्तव जीवनात नेत्यांची कामे करण्याबरोबरच हे लोक बिल्डर बनून कंत्राटे सुद्धा घेतात. तेवढीच जास्त कमाई !
उमेशला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचे असते. पैसा, राजकारणाची अक्कल, अनुयायी यापैकी काही नसताना तो राजेश सरपोतदार यांच्या एवढ्या जवळ कसा असतो हे शेवटपर्यंत कळत नाही. राजेशने सत्तेसाठी मुस्लिमांचे साहाय्य घेण्याचे ठरवल्यावर तो बिथरतो आणि थेट अमेरिका गाठतो. अमेरिकेत त्याच्या मामाचा मित्र त्याला काम देणार असतो म्हणे. मुंबईत काम देतो म्हणाले असते तर एक वेळ ठीक होते. आणि देश सोडून का जावे ? राजकारण सोडून दुसरे काही करता येत नाही महाराष्ट्रासाठी ?

संतोष हा जनसेनेसाठी मारामारी करणार शाखाप्रमुख. तो स्वत:ची वडापाव ची गाडी टाकतो, ते सुद्धा कोणतीही परवानगी न घेता. आणि मग ती गाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेताना तो आईसोबत रडतो, शिपायांच्या पाया पडतो."मराठी माणसांचा धंदा बंद करू नका" असे गयावया करतो. पोलीस स्टेशनात त्याला हवालदार पण हाकलून देतो. अरे ? पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलिसाची त्याची एवढी मैत्री असते तर गाडी उचलल्यावर सगळ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलतो ? पुण्यात अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यावर २ तासांच्या आत पुन्हा त्याच जागेवर तात्पुरत्या टपऱ्या उभ्या राहताना मी बघीतल्या आहेत आणि माझी खात्री आहे कि सगळीकडे असेच होत असणार. आणि ती गाडी अधिकृतपणे २ दिवसांनी मिळणार असते. मग ती मिळाल्यावर तो रीतसर परवानगी (परवानगी देणारे त्याच्या खास ओळखीचेच असतात) का काढत नाही ? सगळे राजकारण सोडून देण्याच्या गोष्टी करतो. शेवटी तो रिक्षा चालवताना दाखवला आहे. आणि त्याची बहिण एक टपरी चालवत असते. (ही टपरी तरी अधिकृत आहे का ?) या टपरीवर तो उभा असताना राडा चालू झाल्याचे कळते आणि तो काठ्या घेवून मारामारीला निघतो पण बहिणीच्या भाषणानंतर त्याचे मतपरिवर्तन होते आणि तो काठ्या घेवून भांडणे थांबवायला निघतो.

अविनाश हा साम्राज्य सेनेचा जिल्हाप्रमुख असतो. पण तसे वागताना तो कुठे दिसत नाही. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आदित्यच्या कंपनीतील इतर सहकारी येतात. त्यातील एका मुलीसमोर तो १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलतो आणि ती प्रचंड impress होते. मग त्यांची मैत्री होते. ती त्याला राजकारणापेक्षा नोकरी चांगली कशी हे पटवून देते. पण त्या वेळी त्याचा राजकारणाचा मार्ग पक्का असतो. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्याला तिकीट मिळाल्यावर हा माणूस राजकारण सोडून नोकरी धरतो आणि ६ महिन्यांत त्या मैत्रिणीचा बॉस बनतो. माझ्या माहितीत तरी एकवेळचे तिकीट मिळाले नाही म्हणून राजकारण सोडणारा माणूस नाही. आणि "माझा राजकारणाचा मार्ग पक्का आहे" वैगेरे बात करणाऱ्या तरुणाकडून हे अपेक्षित नाही.

चित्रपटातून "राजकारण वगैरे काही करू नका. ते वाईट असते. त्यापेक्षा फक्त स्वत:ची नोकरी करा" हा जो संदेश मिळतो तो चुकीचा आहे. राजकारण एवढेही वाईट नाही. आणि स्वत:चा धंदा/नोकरी सांभाळून सुद्धा राजकारण करता येतेच की !


चित्रपटातील मला विनोदी वाटलेले काही प्रसंग/संवाद -
१) " Friends ?" - अविनाशने १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलल्यावर त्या मुलीने " Friends ?" असे म्हणून त्याच्यासमोर पुढे केलेला हात.
२) "जर तू पदवीधर आहेस तर तू राजकारण का करतोस ? शहरात जावून नोकरी का करत नाहीस ?" अविनाशला त्या मुलीने विचारलेला प्रश्न.
३) सभेच्या आयोजनासाठी आलेल्या मुलींपैकी एक मुलगी उन्हामुळे बेशुद्ध पडते तेंव्हा आकाशात सर्वत्र ढग दिसत असतात.
४) शेवटच्या प्रसंगामध्ये, उमेश अमेरिकेत असताना त्याच्या खिडकी बाहेर दिसणारा स्वातंत्रदेवीचा पुतळा.
५) Rock style ने काळे कपडे घालून नाचणारा, गाणारा अवधूत गुप्ते. स्वत:चा चित्रपट आहे म्हणून हे शक्य झाले असावे.

संपूर्ण चित्रपटात "विठ्ठला" हे गाणेच आवडले फक्त मला. "चालतं चालतं , चित्रपट आहे !" असे म्हणून चित्रपट पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही चित्रपटात घडणाऱ्या गोष्टी पटल्या नाहीत.
8

सुर पुन्हा जुळलेच नाहीत

"मिले सुर मेरा तुम्हारा" हे गाणे माहित नसलेला अणि ते आवडत नसलेला भारतीय माणूस सापडणे विरळाच ! १९८८ साली तयार केलेले हे गाणे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळाच्या विषय आहे. भारतीय परंपरा, एकात्मता यांचे सुंदर दर्शन या गाण्यातून घडते.

आणि आता २२ वर्षानंतर आरती आणि कैलाश सुरेंद्रनाथ (हो, या नावाची दोन माणसे आहेत ! ) यांनी हे गाणे "फिर मिले सुर मेरा तुम्हारा" या नावाने remix केले आहे. कालच या गाण्याचे उद्घाटन झाले. हे गाणे परत चित्रित करण्यामागचा हेतूच मला कळला नाहीये. ज्याप्रमाणे सध्याच्या संगीत क्षेत्रातील कोणतेही remix मूळ गाण्यापेक्षा वाईट असते, त्याचप्रमाणे हे नवीन गाणे पण मूळ गाण्याच्या तुलनेत फारच वाईट आहे. १६ मिनिटांच्या या गाण्यात २२ अभिनेते/अभिनेत्री, १८ संगीतकार/गायक आणि इतर १५ प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती आहेत. गाण्यातील संगीतकारांचा थोडासा चांगला भाग वगळला तर हे गाणे पूर्णपणे बॉलीवूडमय आहे. नवीन भारतच जर दाखवायचा असेल तर कितीतरी चांगले लोक आहेत आपल्याकडे. सचिन तेंडूलकर, अब्दुल कलाम, मेधा पाटकर, अरविंद केजरीवाल अशी बरीच नावे घेता येतील. करण जोहर, शामक डावर, भूपेन हजारीया, उघडे पाय दाखवणारी दीपिका पदुकोण, बनियन घातलेला सलमान खान दाखवण्याची काय गरज आहे ? फक्त बॉलीवूड म्हणजे भारत नाही.

खरे तर नवीन हे गाणे नवीन चित्रित करण्याची पण गरज नाही. जुनेच गाणे एवढे चांगले आहे की तेच पुन्हा पुन्हा दाखवले तरी आम्ही आनंदाने बघू.


जुने मिले सुर मेरा तुम्हाराफिर मिले सुर मेरा तुम्हारा - १फिर मिले सुर मेरा तुम्हारा - २

7

Random thoughts - 5

१) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बघायचा आहे का ? Paid Preview वगैरे विसरा. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी १ आठवडा आधी चित्रपटावर काहीतरी आक्षेप घ्या. TV channels अश्या बातम्यांच्या शोधात असतातच. मग दिग्दर्शक तुमच्याकडे स्वत: चित्रपटाची डीव्हीडी घेवून येईल. ती आरामात बघा आणि मग "उदार मनाने" दिग्दर्शकाला माफ करा.

२) मध्यंतरी पुण्याला नळाद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यात येणार असे वाचले होते. म्हणजे आता पुढच्या निवडणुकांत (म्हणजे हि योजना कार्यान्वित झाली तर) "२४ तास गॅस, पूर्ण दाबाने गॅस पुरवठा " अश्या घोषणा असणार का ? रात्री फक्त २ तास गॅस असतो म्हणून बायका रात्रीच स्वयंपाक करणार का ?

३) राजमल लखीचंद ज्वेलर्स त्यांच्या नावाचा short form "R. L." असा करतात. हे ठीक आहे. आता हे "R. L." ते मराठीत "आर. एल." असे लिहितात. हे पण ठीक आहे. पण परत या मराठीतल्या "आर. एल." चे परत इंग्रजीमध्ये "Aarel" असे रुपांतर मी बघितले आहे. हे मात्र जास्तच होतंय. आता ते या "Aar el" चे ते मराठीत रुपांतर का करत नाहीत ? असे करत बसले तर ते infinite loop मध्ये जातील.

४) काही दिवसांपूर्वीच खोटी वैद्यकीय बिले सदर केल्याबद्दल आमदारंवर कारवाई करावी असा कोर्टाने आदेश दिला. आता हे आमदार खोटी बिले सदर का करतात ? त्यांच्याकडे पैसा कमी आहे का ? का आपण सामान्यांसारखे आहोत हे कुठेतरी दाखवण्यासाठी ?

५) सेन्सॉर बोर्ड नेमके काय काम करते हा प्रश्न हल्ली मला सारखा पडू लागला आहे. सेक्स हा शब्द असलेले संवाद आणि हि क्रिया असलेली दृश्ये वगळणे एवढेच त्यांचे काम असते का ? लोकांवर वाईट परिणाम होवू नये म्हणून ते स्वत: जातीने हि सर्व दृष्ये बघतात आणि सामान्य माणसांना बघू देत नाहीत. हेच जर त्यांचे काम असेल तर सामान्य लोकांच्या भल्यासाठी हे काम करायला मी तयार आहे. :P

६) गिनीसबुकचे लोकांना एवढे आकर्षण का असते ? या आठवड्यात पुण्यात "अंतर्नाद" नावाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम नक्की काय आहे या बद्दल कोणीच काही बोलत नव्हते. सुमारे ३००० लोक एका मंचावरून गाणार आणि जागतिक विक्रम करणार याचीच चर्चा चालू होती.

७) "बहुत जाहले पब्लिसिटी स्टंट" असे म्हणायची वेळ आता आली आहे. बघावे त्या चित्रपटाच्या निमित्ताने, बघाव्या त्या मालिकेमध्ये काहीतरी पब्लिसिटी स्टंट चालू आहेत. या स्टंटचा माझ्या बालमनावर फारच विपरीत परिणाम झाला आहे. कोणीही काहीही केले तरी मला आता तो पब्लिसिटी स्टंटच वाटतो. गेल्या आठवड्यात सवाईला गेलो असतानाचा एक प्रसंग आहे. पंडित जसराजांचे गायन होते, गायनाच्या सुरुवातीला तबलजीचा सूर पंडितजींच्या मनासारखा लागत नव्हता म्हणून ते त्याला मधून मधून ओरडत होते. एवढी साधी घटना. पण एक क्षणभर, मला तो पब्लिसिटी स्टंटच वाटला. मला वाटले कि आता तबलजी उठेल आणि त्याच्या असंख्य चाहत्यांचा अपमान केल्याबद्दल काहीतरी बोलेल आणि तरातरा निघून जाईल. पण तसे काही झाले नाही आणि मी भानावर आलो. या पब्लिसिटी स्टंटनी तर माझी फारच वाट लावली आहे.या पासून वाचण्याचा काही उपाय आहे का ?
1

कुठे जातो तुमचा आयकर ? - २

मंत्र्यांची दालने चकाचक करण्यासाठी

२१ मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काही मंत्र्यांच्या दालनातील उंची सोफे व फर्निचर मंत्रालयामागील मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले आहे. यापूर्वीही मंत्र्यांच्या दालनाचे सर्वार्थाने नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र नव्याने आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी आपल्या दालनाचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असताना, महागाई वाढत असताना मंत्री दालनाच्या सुशोभीकरणात व्यग्र आहेत असे दिसते. सुशोभीकरण केल्यावर ते जास्त चांगल्या प्रकारे कामे करणार आहेत का ? बऱ्याच मंत्र्याची दालने चांगली असूनही वास्तुशात्राच्या, फेंगशुईच्या नियमांनुसार दालनांचे सुशोभीकरण चालू आहे असे ऐकले आहे. प्रत्येक वेळी मंत्री कार्यभार स्वीकारल्यावर एक काम सर्वप्रथम करतो ते म्हणजे दालनाचे सुशोभीकरण.

निवडणुकीच्या आधी सोनिया गांधीनी कॉंग्रेसजनांना साधी राहणी स्वीकारण्यास सांगितले होते. त्याचा बराच गाजावाजा झाला. आता निवडणूक संपल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचाव्वन
8

तो राणे नव्हेच !

नारायण राणे यांनी झेंडाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दाखवल्यावर अखेरीस या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. झेंडा प्रदर्शनाच्या या घटना म्हणजे WTF story of the week होत्या.

पहिल्यांदा अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेकडून आणि मनसेकडून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळवला.पण या गडबडीत राणेंची परवानगी राहून गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठे ठाकरे(हिंदू ह्रुदयसम्राट), राज ठाकरे(युवा ह्रुदयसम्राट) आणि नारायण राणे(कोकणाचे भाग्यविधाते(म्हणजे नक्की काय ?)) हि तीन शक्तीपीठे झाली आहेत. तिघांपैकी कोणीतरी आडवा येतोच. या वेळी राणे आले.

या चित्रपटात सदा मालवणकर नावाची मालवणी भाषेत बोलणारी व्यक्तिरेखा आहे. ती नारायण राणेंवर आधारित आहे आणि त्यामुळे तमाम कोकणवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे विधान नितेश राणे यांनी केले. कुठली कोकणी माणसे ? मी पण कोकणीच आहे. मला काही वाटले नाही. आणि माझ्या माहितीच्या कोणत्याच कोकणी माणसाला काही वाटले नाही. अर्थात आता राणे कुटुंबीय स्वत:ला "कोकणाचे भाग्यविधाते" म्हणवून घेत असल्यामुळे तमाम कोकणी जनतेच्या भावनांचे कंत्राट त्यांनी घेतले असावे . अर्थात हल्ली लोकांच्या भावना कशामुळेही दुखावतात म्हणा. अवधूत गुप्ते यांनी चित्रपट काढल्यामुळे अजूनतरी कोणाच्या भावना दुखावल्याचे ऐकिवात नाही.

मग अवधूत गुप्तेंनी एक युक्ती केली. सदा मालवणकर या व्यक्तिरेखेचे नाव सदा पानवलकर असे ठेवले. आणि त्याची बोलायची पद्धत मालवणी न ठेवता साधी ठेवली. बस ! बाकी काही नाही. आणि आता नारायण राणेंनी चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली. नाव बदल्यामुळे लोकांना ती व्यक्तिरेखा कोण आहे हे कळणार नाही असे राणेंना वाटते का ? आता सदा मालवणकरचे नाव बदलून सदा पानवलकर ठेवले आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि ती व्यक्तिरेखा बघूनच ती राणेंवर आहेत हे लगेच समजते.

समजा या चित्रपटात सदा मालवणकरने काही कृष्णकृत्ये(खून, बलात्कार, लाच ईत्यादी) केल्यामुळे राणेंना (आणि तमाम कोकणवासीयांना ) वाईट वाटले असेल तर आता वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कारण सदा मालवणकरचे नाव आता सदा पानवलकर आहे. तो राणे नव्हेच !
5

फलकचोर

पुण्यात अणि इतर सगळ्याच शहरात फ्लेक्सच्या फलकांचे लोण आता चांगलेच पसरू लागले आहे. कुठल्याही निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स अणि त्यावरचे फोटो आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. हे फ्लेक्स लावणारे लोक ते काढण्याचे भानगडीत मात्र पडत नाहीत. सगळेच राजकीय पक्ष यात सामील असल्यामुळे महानगरपालिकासुद्धा हे फलक हटवण्याच्या फंदात फारशी पडत नाही.

मागच्याच आठवड्यात एका वेगळ्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले. दांडेकर पूल वस्तीजवळ हा फलक लावला होता. त्या विभागातील गुंड, घरफोडे, चोर, खंडणी बहाद्दर, खुनी, पाकीटमार यांचे फोटो या फलकावर होते. त्या विभागातील पोलीस आणि सजग नागरिक मंच यांनी मिळून तो फलक लावला होता. १-२ दिवसांनंतर बघितले तर त्यातला एक फोटो नावासकट कापला होता. अजून ३-४ दिवसांत अजून २-३ फोटो कापले गेले. आणि शेवटी तो फलकच गायब झाला. त्या फलकावर ज्यांचे फोटो होते त्यांनीच तो फलक चोराला असावा.

आता एक फ्लेक्स कमी झाला म्हणून आनंद मानायचा की तो फ्लेक्स चोरीला गेला म्हणून दु:ख व्यक्त करायचे याचा विचार मी करतोय. आता जेंव्हा तिथले लोक असा फलक पुन्हा लावतील तेंव्हा या चोरांच्या फोटोसमोर फलकचोर असेसुद्धा लिहितील का ?
13

पुणेरी नजरेने पुण्यातील वाहतूक

एका पुणेकराची "पुण्यातील वाहतूक" या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

१) तुम्ही कोणते वाहन चालवता ?
पुणेकर - कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे.

२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
पुणेकर - आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास !

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, "बापाच्या पैशावर मजा मारतात साले", तरुणी/बाई असेल तर, "या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.". म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, "या वयात झेपत नसताना गाडी चालवायची कशाला ?" असा शेरा तयार असतो.

४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात. करू दे.

५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?
पुणेकर - महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ?

५) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ?
पुणेकर - तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका.

६) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?
पुणेकर - ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात. दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही. पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते.

७) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ?
पुणेकर - पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला कळते.

८) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ?
पुणेकर - पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. "२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात एवढे काय" असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

९) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ?
पुणेकर - आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील.

१० ) या नवीन वर्षात तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ?
पुणेकर - काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच.

हि मुलाखत पूर्णपणे काल्पनिक आहे. हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.