6

Random thoughts of the week - 4

१) दैनिक सकाळ साम वाहिनीच्या साहाय्याने एक Reality show सुरु करत आहेत. "सध्याच्या Reality show पेक्षा वेगळा, " ई. ई. वर्णन त्यांनी केले आहे. अर्थातच सकाळतर्फे असे अपेक्षितच आहे. मी सहजच या स्पर्धेत भाग घ्यावयाचा अर्ज बघितला. आणि त्यातल्या शेवटच्या एका वाक्याने चाट पडलो. त्यात लिहिले होते की या अर्जासोबत Rexona किंवा Lux साबणाची ३ वेष्टने (wrappers) पण पाठवायचे आहेत. Rexona या स्पर्धेचा प्रायोजक आहे मान्य, पण मग लोकांना वेष्टने गोळा करून पाठवायला का सांगता ? अर्थातच नियम सकाळचे असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. अर्थात या स्पर्धेकडून माझ्या काही अपेक्षा नाहीत. पण या स्पर्धा बघणारयांनी खालील २ अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
अ) स्पर्धेचे परिक्षक/ मार्गदर्शक बालाजी तांबे नको.
ब) स्पर्धेचा विजेता बारामतीचा नको. विजेता खरच चांगला असला तरी उगीच fixing झाल्यासारखे वाटेल.

२) पुण्यातील बर्याच चौकांमध्ये काही काळापूर्वी गाजावाजा करून कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माक्ष ठेवण्यासाठी बसवले होते ते. पण त्यांचा वापर करून कोणावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. उगीचच थोड्या थोड्या वेळाने flash मारत असतात ते. "Bird watching " साठी याचा उपयोग होत असावा असा आमचा फार संशय आहे. :P

३) "Don't take it personally" हे वाक्य हल्ली मी बरेचदा मित्रांसमोर बोलतो. त्याचे काय होते की, मित्रांची खिल्ली उडवल्यावर, ते हिरमुसले झाले की त्यांना मी म्हणतो की, "Don't take it personally. मी प्रत्येकाचीच खिल्ली उडवतो." आता हे वाक्य वापरून मी एक काल्पनिक प्रसंग उभा केला आहे.

अशी कल्पना करा की मी कोणत्यातरी मुलीकडे वाईट नजरेने बघत आहे. ती चिडून फणकाय्राने मला काहीतरी बोलते. मी तिला शांतपणे म्हणतो, "Don't take it personally. मी प्रत्येक मुलीकडे असाच बघतो." आता यावर तिची logical प्रतिक्रिया काय असेल याचा मात्र मला अंदाज येत नाहीये.

4) रिक्षांना चांगला horn, indicator का नसतो, हे मला न सुटलेले कोडे आहे, पुण्यातील रिक्षाचालकसुद्धा वळताना नीट हात दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कधीतरी मागच्या माणसावर उगीच कृपा म्हणून धुम्रपान करताना सिगारेटची राख झटकण्यासाठी हाताची २-३ बोटे भर काढावीत तसे काहीतरी रिक्षा वळवताना करतात .

५) "किस्सा पिछले जनम का" असला काहीतरी reality show चालू झाला आहे. तसलाच संमोहनशास्त्रीय कार्यक्रम मी स्वत: बघितला आहे. संमोहनतज्ञ माणूस एका माणसाला संमोहित करतो. आणि मागच्या जन्मात नेतो. येथपर्यंत ठीक आहे. पण मग तो नंतर त्या माणसाला मागच्या जन्मात कोण आहेस असे विचारतो. आणि समोरच्या माणसाकडून मोर, ससा, मांजर ई. उत्तर येते. मला एक गोष्ट करत नाही की, जर तो माणूस आत्ता मोर, ससा, मांजर आहे तर तो बोलू कसा शकतो ?

६) लोक चालताना किंवा एकाद्या कार्यक्रमात असताना चुकून कोणाचा धक्का लागला तर लगेच माफी मागतात. पण हेच लोक जेंव्हा दुचाकी चालवत असतात, तेंव्हा दुसर्या गाडीचा जरासा धक्का लागला तर लगेच का चिडतात ?

७) पु. ल. नी सांगितलेल्या जालीम शत्रूंच्या यादीत लग्नाचे चलचित्रण(video recording) दाखवणारे लोक आता समाविष्ट केले पाहिजेत. लग्नाचे चलचित्रण करायला माझा काहीच विरोध नाही, जो पर्यंत ते चलचित्रण मला बघायला लावत नाहीत तो पर्यंत.


8) राजू परुळेकरांनी या वेळच्या लोकप्रभामध्ये सचिनवर परत लेख लिहिला आहे. मागच्या लेखपेक्षा हा जास्त वाईट आहे. या माणसाचा problem काय आहे, हे मला समजत नाही.

6 प्रतिक्रिया:

Salil said...

"स्पर्धेचा विजेता बारामतीचा नको. विजेता खरच चांगला असला तरी उगीच fixing झाल्यासारखे वाटेल." LOLZZZZZZZ
ekdum sahi!

Sandeep said...

Baramati :) barobar.. changla asla tari lokancha vishwas basat nahi.. :)

Potter said...

२)signal तोडल्यावर माला flash बसला होता ....अजिबात कारवाई वगरे झाली नाही.So yes it is for Bird Watching.पण पुण्यात ९०% मुली अतिरेकी सारखा फडके गुंडाळून गाडी चालवतात . मग कॅमेरा लावून तरी काय दिसणार हे कळत नाही

३)अश्या गोष्टी blog वरच टाकत आहेस ठीक आहे...खरंच बोललास तर ladies चप्पल चा दुकान टाकायला लागेल तुला :-D

माझ्या बाबांचा एक मित्र रिक्षावाल्याचा हात दाखवणे प्रकरणी रिक्षाला जाऊन धडकला.
रिक्षावाला : हात दाखवला दिसत नाही का ?
पक्का पुणेरी बाबांचा मित्र म्हणाला : कोणाला दाखवला ?मागे रिक्षात बसलाय त्याला का ?
LOL

७)अतिशय खरं आहे ! ह्या विषयावर final week झाला कि लिहायचा विचार आहे माझा
मी आणि माझा शत्रुपक्ष : काही नवीन शत्रू
पण तुला कोणी लग्नाची कॅसेट बघायला लावली रे ? :-)

८) राजू परालेकर हा माणूस बिनडोक आहे हे नक्की

Praj ~ said...

kami random thoughts ya veli :)
porga kaam karayla lagla jara tari..

Rao said...

vaidya evadhya frequnectly post takat jau naka... lokana vatel azingo madye kahich kam nasata.....lai random thought yetat hyala :P

आशा जोगळेकर said...

रेक्सोना उगीच नाहीये स्पॉन्सर करत, प्रत्येक स्पर्धकानी तीन साबण विकत घ्यायचे व त्यांची विक्री वाढवायची ।