8

Random thoughts of the week - 3

१) हिंदी/मराठी मधले भयपट, भयमालिका या नेहमी विनोदी का असतात ? मी हिंदी/मराठी मधला एकही खराखुरा भयपट पहिला नाही. कोणी पाहिलंय का ?

२) कार्यालयात जाताना मी लष्कराच्या हद्दीतून जातो. तिथे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूस लष्करातील उच्चपदस्थ लोकांचे बंगले आहेत. या रस्त्यावर horn वाजवायला बंदी आहे. आणि येथे कायम २-३ जवान बंदूक घेवून गस्त घालत असतात. आता ते horn वाजवणारयाला गोळी घालतात का ते माहित नाही. मी तरी अजून horn वाजवून बघितला नाही. :P

3) CAT च्या परीक्षेत virus मुळे गोंधळ झाल्याने IIM-A आता प्रत्येक परीक्षार्थ्याला स्वत: anti virus आणायला सांगणार का असा प्रश्न पडलाय ! परीक्षेच्या आधी २ तास येवून आपापल्या संगणकावरील virus मुलांना काढायला लागेल असे वाटतंय !

४) Killer App ची नवीन व्याख्या : जे App चालू केल्यावर मोबाईल बंद पडतो / hang होतो / restart होतो.

५) पुण्यातील बसमधील आख्खी अर्धी बाजू स्त्रियांसाठी राखीव केली आहे. हे करताना माझ्या माहितीनुसार हेतू हाच होता कि, बसमध्ये चढताना लोक रांगेत चढत नाहीत. गर्दी करून चढतात. तेंव्हा स्त्रियांना जागा मिळत नाही. हे बर्याच अंशी बरोबर पण आहे. पण मी आता बस सुटण्याचा जागी बघतो तेंव्हा लोक रांगेत उभे असतात. स्त्री-पुरुषांसाठी एकाच रांग असते. मग या राखीव जागेचा फायदा काय ? आणि जेव्हा या रांगेतून स्त्रिया बसमध्ये चढतात, तेंव्हा त्यांनी राखीव जागेवर बसावे एवढीच पुरुषांची अपेक्षा अडते. पण असे घडत नाही.बऱ्याच स्त्रिया राखीव नसलेल्या जागेवर बसतात. आता या जागा सर्वांसाठी खुल्या असल्यामुळे त्यांना काही बोलताही येत नाही.

६) पुण्यातील लोक गाडी चालवताना आपल्याला हिरवा सिग्नल लागला आहे कि नाही ते बघत नाहीत तर दुसऱ्याला पिवळा सिग्नल लागला आहे का ते बघतात आणि लगेच निघतात. आणि तुमचे जर या पिवळ्या दिव्याकडे लक्ष नसेल तर मागून horn वाजवणारे लगेच याची जाणीव करून देतातच.

७) पुण्यात trafficorp नावाच्या नवीन यंत्रणेचे वाजत गाजत स्वागत झाले आहे. यात वाहतूक पोलीसाडील blackberry मोबाईलमध्ये गाडीचा नंबर टाकला की लगेच गाडीची माहिती, आणि मालकाचा पत्ता ई. गोष्टी कळतात. पण मुख म्हणजे हा पत्ता खरा असणारे का ? बरेचदा हा पत्ता फारच जुना असतो आणि अस्तित्वातही नसतो.पण याकडे कोणी बघणार नाही. नवीन blackberry घेण्यात यांना जास्त फायदा आहे.

८) मी पुण्यात आल्यापासून (७+ वर्षे ) सिंहगड रस्त्याचे काम चालू असलेले बघतोय. सिंहगड रस्त्यावर काम चालू नाही, असे एक दिवसही घडले नाही. नेहमी कुठेतरी खोदलेले असतो रस्ता. याला कारण काय ?

९) मराठी वाहिन्यावरील अशुद्ध मराठी लेखन, इंग्रजीचा अतिवापर हल्ली फारच डोक्यात जावू लागला आहे. ज्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द आहेत त्यावेळी पण मराठी शब्द का वापरत नाहीत हे लोक ?

१० ) पेरू खाताना बी पुन्हा एकदा दातात अडकली. पेरूची बी आणि दातातील फट नेहमी एकाच आकाराची का असते ? (हा विचार माझा नाहीये.पण तो प्रत्येक वेळी दातात बी अडकल्यावर माझ्या मनात येतो.)

जाता जाता, मला हल्लीच शोध लागला आहे कि माझ्या मनात random विचार फारच येतात.

8 प्रतिक्रिया:

Praj ~ said...

"कार्यालायालात जाताना" haha.. mothanda hastoy (lol)

पुण्यातील बसमधील आख्खी अर्धी बाजू स्त्रियांसाठी राखीव केली आहे
he bangalore warun dhaplela distay..

hmm last one.. swatacha quote nasel tar -Anonymous lihawa :)


n btw method kaye tuzi..
randome thought ala ki eka draft post madhe append karaycha.. ka ajun kahitari.. :)

Abhijit said...

@Praj,

१) होतात चुका कधी कधी. चालतं चालतं!

२) शेवटचा विचार माझा नाहीये हे खरे . पण तो प्रत्येक वेळी दातात बी अडकल्यावर माझ्या मनात येतो.

३) माझी पद्धत बरोबर ओळखली आहेस तू . जर Draft मध्ये save करेपर्यंत लक्षात राहिला, तर save करतो !

Jitesh Shah said...

@CAT chi pariksha.. Linux varprayla sanga rao lokanna :D

@hindi bhaypat.. arre ramsay brothers! bhayane aangavar shahara yeto :D

@traficorp .. kuthe s/w engg zalo. traffic police vhayla pahije hota :-)

Pratik said...

6 aani 7 bhaari aahet... Very true... Ummm, random vichar yet aahet hii amchyasaathi nakkich chaangli goshta aahe... It's fun reading...

Anonymous said...

या प्रश्रांची उत्तरे मिळण्याजोगी आहेत पण स्वतःलाच शोधावी लागतील.

Priygun said...

I am a fan of your random thoughts ... many of them we can easily relate to ... Nice going Abhi.:)
Only problem is reading in marathi ... can you have a hindi/english version also ?

भानस said...

अभिजीत तुझे Random thoughts मस्त आहेत. U know आत्ता हा Random thoughts मराठीतून लिहीला होता आधी पण एकदम कोणी थोटे-तुटलेले समोर आले...गपचूप इंग्लीशला हाताशी धरले.हा..हा... ब्लॊग-विचार आवडले.:)

Abhijit said...

@ प्रियगुण,
माझ्या मनात हे विचार येतात ते मराठीतच. त्यामुळे इतर भाषेत रुपांतर करण्यापेक्षा मी मराठीमध्येच लिहितो. मराठीमध्ये हे विचार मांडण्यात जेवढी मजा येते तेवढी बाकी भाषांमध्ये येणार नाही असे मला वाटते.

@ भानस
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !