3

Plan 9 from outer space - The Classic

काही चित्रपट वाईट असतात. पण काही चित्रपट एवढे वाईट असतात की ते खरोखर चांगले वाटू लागतात. एडवर्ड डी. वूड याचा "Plan 9 from outer space" हा १९५९ सालातला चित्रपट हा असाच एक वाईट-सुंदर चित्रपट आहे.

कथा :
या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर हे परग्रहवासी आणि पृथ्वीवासी यांच्यातील युद्ध(??) आहे. परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांना नष्ट करण्याचे ८ प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. हा नववा प्रयत्न म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसांना जिवंत करून पृथ्वीवासीयांना मारणे आणि पृथ्वीवासीयांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणे असा आहे. पृथ्वीवासी सूर्यकिरणांपासून एक बॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण असा बॉम्ब वापरल्यामुळे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जेथे पोहोचतो असे सर्व ग्रह नष्ट होतील. ते थांबवण्यासाठी मूर्ख पृथ्वीवासीयांना थांबवण्याचा प्रांजळ प्रयत्न परग्रहवासी करत आहेत.

सर्वात वाईट चित्रपट ? -
हा चित्रपट जगातील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. (म्हणूनच मी हा चित्रपट बघितला :P ). वाईट कथा. वाईट पटकथा, वाईट छायाचित्रण, वाईट संवाद, रामसे बंधूंच्या चित्रपटातील special effects पेक्ष हास्यास्पद special effects अशा सगळ्या वाईट गोष्टी या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे बजेट कमी होते. त्यामुळे चुकीचे संवाद, चुकीचे छायाचित्रण अश्या गोष्टी सुधारण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडला नाहीये. मध्येच दिवस, मध्येच रात्र, काहीही घडत असते. दिग्दर्शकच्या एका मित्राला त्याने चित्रपटात घेतले होते. दुर्दैवाने तो मध्येच मरण पावला. मग त्याच्या ऐवजी दुसरयाच एका उंच माणसाला घेतले आहे. तो माणूस मग चित्रपटभर dracula सारखा तोंडावर पडदा घेतो. चित्रपटाचे बजेट कमी आहे म्हणून चित्रपटातील खलनायकाचे बजेट पण मध्येच कमी केले आहे. खलनायक ३ उडत्या तबकड्या घेवून एका स्मशानभूमीत येतो आणि ३ मृतांना जिवंत करतो. आणि या मृत माणसांना ते एका electrode gun च्या सहाय्याने नियंत्रित करतात. एका प्रसंगात हि gun चालत नाही तेंव्हा मृत माणूस परग्रहवासीयाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्याकडील २ तबकड्या काढून घेण्यात येतात.(नोकरशाही तिकडे पण आहे :P) आणि एका तबकडीवर त्याला भागवण्यास सांगितले जाते. चित्रपटातील परग्रहवासी हे पूर्णपणे पृथ्वीवासीयांसारखे दिसतात. आपल्यासारखेच कपडे घालतात. आपल्यासारखीच मारामारी करतात. त्यांच्या तबकडीमध्ये पण आपल्याकडे असतात तशी यांत्रिक उपकरणे असतात, जी गोळी मारल्यावर जळतात आणि तबकाडीला आग लागते. "सोलारोनाईट" (सूर्यकिरणांपासून आपण बनवत असलेला बॉम्ब) मुळे सर्व कसे नष्ट होईल हे सांगताना तर तो परग्रहवासी उदाहरण देतो. "समजा की, एका पेट्रोल च्या टाकीतून आपण पेट्रोल नळीद्वारे एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत. आता आपण जर भांड्याला आग लावली तर भ्न्द्याचा स्फोट होईलच पण नळीद्वारे टाकीत आग लागून टाकीचा पण स्फोट होईल.सोलारोनाईट हा या भांड्यासारखा आहे. त्याचा स्फोट झाला की टाकीचा म्हणजेच सूर्याचा आणि जिथे जिथे सूर्यकिरण पोहोचतात अश्या सर्व ठिकाणांचा स्फोट होईल."

या चित्रपटामध्ये काही विनोदी संवाद पण आहेत -

1) "Everyone is interested in the future, because that is where you and I are going to spend the rest of our lives."
2) "One thing's for sure, Inspector Clay is dead! Murdered! And somebody's responsible!"
3) "You humans and your stupid minds! Stupid! Stupid!" (एक परग्रहवासी मुलगी हा संवाद म्हणते.)

थोडक्यात, तुम्हाला असले चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही बघितलाच पाहिजे.

(या चित्रपटाचे IMDB चे rating ३.६ आहे. आणि IMDB च्या Bottom 100 च्या यादीत हा चित्रपट नाही. )

3 प्रतिक्रिया:

chetan said...

Tula December madhe kahi changale udyog nahi milale vatate (Ha blog lihine sodale tar)..
mala ya picture cha IMDB ranking chukun kalala tar nakki sang...

Jitesh Shah said...

hehehehh!
mala baghaychay ha! darjaa chitrapat vattoy ekun ch

Anand said...

एड्वर्ड डी. वूड वर जॉनी डेप चा ’एड वूड’ बघण्यासारखा आहे ...