3

कायदा गाढव असतो का ?

पत्नी व मुलीचा खून करून तरुणाने आत्महत्या केल्याची हि बातमी आजच लोकसत्ता मध्ये वाचली. अमोल कांबळे याने आपल्या पत्नी व मुलीचा खून करून आत्महत्या केली. घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण या बातमीतील खालील वाक्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.

अमोल कांबळे यांच्यावर पत्नी वीणा व मुलगी आकृती या दोघींचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा तर स्वत: आत्महत्या केल्यामुळे ३०९ कलमान्वयेदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.


मला कायद्याच्या क्षेत्रातील फरसे ज्ञान नाही. पण मृत माणसावर गुन्हा दाखल करण्यामागचा उद्देश माझ्यासारखा साध्या माणसाला समजला नाही. जर तो जिवंत असता तर गुन्हा दाखल करून काहीतरी फायदा असता. पण आता या केसचे काय होणार ? ही केस बंद होणार का ? आणि मग जर केस दाखल करून लगेच बंदच करायची असेल तर मृत माणसावर गुन्हा तरी का दाखल केला ?

"कायदा गाढव असतो" असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. कदाचित हे त्याचेच एक उदाहरण असेल.

3 प्रतिक्रिया:

Abhishek said...

मयत व्यक्तीवर खुनाचा आणि आत्महत्येचा आरोप करुन त्याला शिक्षा देण्यात तसा काही अर्थ नाही, परंतु कायद्याच्या द्रुष्टीने त्यात बरेच तथ्य आहे...कारण म्रुत्युपश्यात होणारे विम्यासंबधीत दावे आणि जमिनजुमल्याचे वाद ह्याच्या द्रुष्टीने ही कारवाई समर्थक ठरते...
(माझ्या माहितीनुसार विमा काढल्याच्या एका वर्षा आत आत्महत्या केल्यास विम्याची रक्कम मिळत नाही )
चु.भु.द्या.घ्या.

Abhijit said...

तसेही असेल कदाचित. पण मग नुसती आत्महत्येची आणि खुनाची नोंद करून चालणार नाही का ? गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे का ?

Abhishek said...

गुन्हा झाल्यावर गुन्हा दाखल करणे हे कायद्याने बंधनकारक आहे.
आत्मघातकी हल्ल्यात अतिरेकी मरण पावला म्हणुन तपास कोणाचा करणार असे आपण म्हणु
शकत नाही.
:-)

एखादी कायदेपंडित व्यक्ती बरोबर माहिती देउ शकेल