3

कुठे जातो तुमचा आयकर ? - १

भोपाल दुर्घटनेच्या ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी

श्री. गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी सांगितले की राज्य सरकारने केंद्र सरकारकडून भोपाल दुर्घटनेतील पिडीतांसाठी स्मारक बांधण्यासाठी ११६ कोटी रु. मागितले आहेत. ६७ एकर जागेतील कारखान्याच्या जमिनीवर हे स्मारक बांधण्यात येणार आहे.

आपल्या देशात आधीच एवढे पुतळे आणि स्मारके झाली आहेत आणि त्यात हे अजून एक स्मारक बांधण्याचा विचार चालू आहे. खरे म्हणजे भोपाल दुर्घटनेतील पीडितांची याहून मोठी थट्टा नाही, असे मला वाटते. अजूनही बऱ्याचश्या पीडितांना भरपाई मिळाली नाहीये. ज्यांना मिळाली आहे ती पण अल्पशी आहे. एवढे असताना स्मारक बांधून नक्की फायदा कोणाचा होणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

( अमित वर्मा याच्या "Where your taxes go ?" या लेखमालेवरून प्रेरित होवून ही लेखमाला सुरु करत आहे. वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
मला मराठी पेपरातील बातमीची link द्यायची होती. पण ती सापडली नाही. कोणाला माहित असल्यास कृपया ती दयावी.)

3 प्रतिक्रिया:

Mahendra said...

कठिण प्रशन आहे. पण उत्त्तर खुप सोपं आहे...अशी स्मारकं बांधुन काही होणार नाही. त्यापेक्षा तिथली स्वच्छता जरी केली ( डीटॉक्सिंग) तरिही लोकं धन्यवाद देतिल. पण त्या गोष्टीला पोलिटीकल मायलेज नाही, म्हणुन तिकडे फार लक्ष दिलं जात नाही.

Anonymous said...

Hmm, Its bullshit to build a memorial for that accident. You should invest money in proper way.

But tragedy is how many people seriously pay taxes. And how many people have all "White" money

Abhijit said...

@ अनामिक

कदाचित काही लोक संपूर्ण आयकर भरतहि नसतील. पण याचा अर्थ सरकारने तो कसाही खर्च करावा असे नाही.