3

Plan 9 from outer space - The Classic

काही चित्रपट वाईट असतात. पण काही चित्रपट एवढे वाईट असतात की ते खरोखर चांगले वाटू लागतात. एडवर्ड डी. वूड याचा "Plan 9 from outer space" हा १९५९ सालातला चित्रपट हा असाच एक वाईट-सुंदर चित्रपट आहे.

कथा :
या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर हे परग्रहवासी आणि पृथ्वीवासी यांच्यातील युद्ध(??) आहे. परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांना नष्ट करण्याचे ८ प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. हा नववा प्रयत्न म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसांना जिवंत करून पृथ्वीवासीयांना मारणे आणि पृथ्वीवासीयांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणे असा आहे. पृथ्वीवासी सूर्यकिरणांपासून एक बॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण असा बॉम्ब वापरल्यामुळे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जेथे पोहोचतो असे सर्व ग्रह नष्ट होतील. ते थांबवण्यासाठी मूर्ख पृथ्वीवासीयांना थांबवण्याचा प्रांजळ प्रयत्न परग्रहवासी करत आहेत.

सर्वात वाईट चित्रपट ? -
हा चित्रपट जगातील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. (म्हणूनच मी हा चित्रपट बघितला :P ). वाईट कथा. वाईट पटकथा, वाईट छायाचित्रण, वाईट संवाद, रामसे बंधूंच्या चित्रपटातील special effects पेक्ष हास्यास्पद special effects अशा सगळ्या वाईट गोष्टी या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे बजेट कमी होते. त्यामुळे चुकीचे संवाद, चुकीचे छायाचित्रण अश्या गोष्टी सुधारण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडला नाहीये. मध्येच दिवस, मध्येच रात्र, काहीही घडत असते. दिग्दर्शकच्या एका मित्राला त्याने चित्रपटात घेतले होते. दुर्दैवाने तो मध्येच मरण पावला. मग त्याच्या ऐवजी दुसरयाच एका उंच माणसाला घेतले आहे. तो माणूस मग चित्रपटभर dracula सारखा तोंडावर पडदा घेतो. चित्रपटाचे बजेट कमी आहे म्हणून चित्रपटातील खलनायकाचे बजेट पण मध्येच कमी केले आहे. खलनायक ३ उडत्या तबकड्या घेवून एका स्मशानभूमीत येतो आणि ३ मृतांना जिवंत करतो. आणि या मृत माणसांना ते एका electrode gun च्या सहाय्याने नियंत्रित करतात. एका प्रसंगात हि gun चालत नाही तेंव्हा मृत माणूस परग्रहवासीयाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्याकडील २ तबकड्या काढून घेण्यात येतात.(नोकरशाही तिकडे पण आहे :P) आणि एका तबकडीवर त्याला भागवण्यास सांगितले जाते. चित्रपटातील परग्रहवासी हे पूर्णपणे पृथ्वीवासीयांसारखे दिसतात. आपल्यासारखेच कपडे घालतात. आपल्यासारखीच मारामारी करतात. त्यांच्या तबकडीमध्ये पण आपल्याकडे असतात तशी यांत्रिक उपकरणे असतात, जी गोळी मारल्यावर जळतात आणि तबकाडीला आग लागते. "सोलारोनाईट" (सूर्यकिरणांपासून आपण बनवत असलेला बॉम्ब) मुळे सर्व कसे नष्ट होईल हे सांगताना तर तो परग्रहवासी उदाहरण देतो. "समजा की, एका पेट्रोल च्या टाकीतून आपण पेट्रोल नळीद्वारे एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत. आता आपण जर भांड्याला आग लावली तर भ्न्द्याचा स्फोट होईलच पण नळीद्वारे टाकीत आग लागून टाकीचा पण स्फोट होईल.सोलारोनाईट हा या भांड्यासारखा आहे. त्याचा स्फोट झाला की टाकीचा म्हणजेच सूर्याचा आणि जिथे जिथे सूर्यकिरण पोहोचतात अश्या सर्व ठिकाणांचा स्फोट होईल."

या चित्रपटामध्ये काही विनोदी संवाद पण आहेत -

1) "Everyone is interested in the future, because that is where you and I are going to spend the rest of our lives."
2) "One thing's for sure, Inspector Clay is dead! Murdered! And somebody's responsible!"
3) "You humans and your stupid minds! Stupid! Stupid!" (एक परग्रहवासी मुलगी हा संवाद म्हणते.)

थोडक्यात, तुम्हाला असले चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही बघितलाच पाहिजे.

(या चित्रपटाचे IMDB चे rating ३.६ आहे. आणि IMDB च्या Bottom 100 च्या यादीत हा चित्रपट नाही. )
6

Random thoughts of the week - 4

१) दैनिक सकाळ साम वाहिनीच्या साहाय्याने एक Reality show सुरु करत आहेत. "सध्याच्या Reality show पेक्षा वेगळा, " ई. ई. वर्णन त्यांनी केले आहे. अर्थातच सकाळतर्फे असे अपेक्षितच आहे. मी सहजच या स्पर्धेत भाग घ्यावयाचा अर्ज बघितला. आणि त्यातल्या शेवटच्या एका वाक्याने चाट पडलो. त्यात लिहिले होते की या अर्जासोबत Rexona किंवा Lux साबणाची ३ वेष्टने (wrappers) पण पाठवायचे आहेत. Rexona या स्पर्धेचा प्रायोजक आहे मान्य, पण मग लोकांना वेष्टने गोळा करून पाठवायला का सांगता ? अर्थातच नियम सकाळचे असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. अर्थात या स्पर्धेकडून माझ्या काही अपेक्षा नाहीत. पण या स्पर्धा बघणारयांनी खालील २ अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
अ) स्पर्धेचे परिक्षक/ मार्गदर्शक बालाजी तांबे नको.
ब) स्पर्धेचा विजेता बारामतीचा नको. विजेता खरच चांगला असला तरी उगीच fixing झाल्यासारखे वाटेल.

२) पुण्यातील बर्याच चौकांमध्ये काही काळापूर्वी गाजावाजा करून कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माक्ष ठेवण्यासाठी बसवले होते ते. पण त्यांचा वापर करून कोणावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. उगीचच थोड्या थोड्या वेळाने flash मारत असतात ते. "Bird watching " साठी याचा उपयोग होत असावा असा आमचा फार संशय आहे. :P

३) "Don't take it personally" हे वाक्य हल्ली मी बरेचदा मित्रांसमोर बोलतो. त्याचे काय होते की, मित्रांची खिल्ली उडवल्यावर, ते हिरमुसले झाले की त्यांना मी म्हणतो की, "Don't take it personally. मी प्रत्येकाचीच खिल्ली उडवतो." आता हे वाक्य वापरून मी एक काल्पनिक प्रसंग उभा केला आहे.

अशी कल्पना करा की मी कोणत्यातरी मुलीकडे वाईट नजरेने बघत आहे. ती चिडून फणकाय्राने मला काहीतरी बोलते. मी तिला शांतपणे म्हणतो, "Don't take it personally. मी प्रत्येक मुलीकडे असाच बघतो." आता यावर तिची logical प्रतिक्रिया काय असेल याचा मात्र मला अंदाज येत नाहीये.

4) रिक्षांना चांगला horn, indicator का नसतो, हे मला न सुटलेले कोडे आहे, पुण्यातील रिक्षाचालकसुद्धा वळताना नीट हात दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कधीतरी मागच्या माणसावर उगीच कृपा म्हणून धुम्रपान करताना सिगारेटची राख झटकण्यासाठी हाताची २-३ बोटे भर काढावीत तसे काहीतरी रिक्षा वळवताना करतात .

५) "किस्सा पिछले जनम का" असला काहीतरी reality show चालू झाला आहे. तसलाच संमोहनशास्त्रीय कार्यक्रम मी स्वत: बघितला आहे. संमोहनतज्ञ माणूस एका माणसाला संमोहित करतो. आणि मागच्या जन्मात नेतो. येथपर्यंत ठीक आहे. पण मग तो नंतर त्या माणसाला मागच्या जन्मात कोण आहेस असे विचारतो. आणि समोरच्या माणसाकडून मोर, ससा, मांजर ई. उत्तर येते. मला एक गोष्ट करत नाही की, जर तो माणूस आत्ता मोर, ससा, मांजर आहे तर तो बोलू कसा शकतो ?

६) लोक चालताना किंवा एकाद्या कार्यक्रमात असताना चुकून कोणाचा धक्का लागला तर लगेच माफी मागतात. पण हेच लोक जेंव्हा दुचाकी चालवत असतात, तेंव्हा दुसर्या गाडीचा जरासा धक्का लागला तर लगेच का चिडतात ?

७) पु. ल. नी सांगितलेल्या जालीम शत्रूंच्या यादीत लग्नाचे चलचित्रण(video recording) दाखवणारे लोक आता समाविष्ट केले पाहिजेत. लग्नाचे चलचित्रण करायला माझा काहीच विरोध नाही, जो पर्यंत ते चलचित्रण मला बघायला लावत नाहीत तो पर्यंत.


8) राजू परुळेकरांनी या वेळच्या लोकप्रभामध्ये सचिनवर परत लेख लिहिला आहे. मागच्या लेखपेक्षा हा जास्त वाईट आहे. या माणसाचा problem काय आहे, हे मला समजत नाही.
4

सुनिता कृष्णन @ TEDIndia

सुनिता कृष्णन यांनी TED India च्या परिषदेत दिलेले हे भाषण ! सुनिता कृष्णन या लैंगिक शोषण, मानवी तस्करी (sex slavery and human trafficking) या क्षेत्रातील कार्यकर्त्या आहेत. त्यांचे हे भाषण तुम्हाला नक्कीच अंतर्बाह्य हादरवून टाकेल.
Publish Post

सुनिता कृष्णन यांची या भाषणानंतर झालेली मुलाखत
सुनिता कृष्णन यांचे wiki page त्यांच्या कार्याबद्दल अजून माहिती देणाऱ्या लिंक्स या पानावर मिळतील.
3

कायदा गाढव असतो का ?

पत्नी व मुलीचा खून करून तरुणाने आत्महत्या केल्याची हि बातमी आजच लोकसत्ता मध्ये वाचली. अमोल कांबळे याने आपल्या पत्नी व मुलीचा खून करून आत्महत्या केली. घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण या बातमीतील खालील वाक्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.

अमोल कांबळे यांच्यावर पत्नी वीणा व मुलगी आकृती या दोघींचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा तर स्वत: आत्महत्या केल्यामुळे ३०९ कलमान्वयेदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.


मला कायद्याच्या क्षेत्रातील फरसे ज्ञान नाही. पण मृत माणसावर गुन्हा दाखल करण्यामागचा उद्देश माझ्यासारखा साध्या माणसाला समजला नाही. जर तो जिवंत असता तर गुन्हा दाखल करून काहीतरी फायदा असता. पण आता या केसचे काय होणार ? ही केस बंद होणार का ? आणि मग जर केस दाखल करून लगेच बंदच करायची असेल तर मृत माणसावर गुन्हा तरी का दाखल केला ?

"कायदा गाढव असतो" असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. कदाचित हे त्याचेच एक उदाहरण असेल.
8

Random thoughts of the week - 3

१) हिंदी/मराठी मधले भयपट, भयमालिका या नेहमी विनोदी का असतात ? मी हिंदी/मराठी मधला एकही खराखुरा भयपट पहिला नाही. कोणी पाहिलंय का ?

२) कार्यालयात जाताना मी लष्कराच्या हद्दीतून जातो. तिथे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूस लष्करातील उच्चपदस्थ लोकांचे बंगले आहेत. या रस्त्यावर horn वाजवायला बंदी आहे. आणि येथे कायम २-३ जवान बंदूक घेवून गस्त घालत असतात. आता ते horn वाजवणारयाला गोळी घालतात का ते माहित नाही. मी तरी अजून horn वाजवून बघितला नाही. :P

3) CAT च्या परीक्षेत virus मुळे गोंधळ झाल्याने IIM-A आता प्रत्येक परीक्षार्थ्याला स्वत: anti virus आणायला सांगणार का असा प्रश्न पडलाय ! परीक्षेच्या आधी २ तास येवून आपापल्या संगणकावरील virus मुलांना काढायला लागेल असे वाटतंय !

४) Killer App ची नवीन व्याख्या : जे App चालू केल्यावर मोबाईल बंद पडतो / hang होतो / restart होतो.

५) पुण्यातील बसमधील आख्खी अर्धी बाजू स्त्रियांसाठी राखीव केली आहे. हे करताना माझ्या माहितीनुसार हेतू हाच होता कि, बसमध्ये चढताना लोक रांगेत चढत नाहीत. गर्दी करून चढतात. तेंव्हा स्त्रियांना जागा मिळत नाही. हे बर्याच अंशी बरोबर पण आहे. पण मी आता बस सुटण्याचा जागी बघतो तेंव्हा लोक रांगेत उभे असतात. स्त्री-पुरुषांसाठी एकाच रांग असते. मग या राखीव जागेचा फायदा काय ? आणि जेव्हा या रांगेतून स्त्रिया बसमध्ये चढतात, तेंव्हा त्यांनी राखीव जागेवर बसावे एवढीच पुरुषांची अपेक्षा अडते. पण असे घडत नाही.बऱ्याच स्त्रिया राखीव नसलेल्या जागेवर बसतात. आता या जागा सर्वांसाठी खुल्या असल्यामुळे त्यांना काही बोलताही येत नाही.

६) पुण्यातील लोक गाडी चालवताना आपल्याला हिरवा सिग्नल लागला आहे कि नाही ते बघत नाहीत तर दुसऱ्याला पिवळा सिग्नल लागला आहे का ते बघतात आणि लगेच निघतात. आणि तुमचे जर या पिवळ्या दिव्याकडे लक्ष नसेल तर मागून horn वाजवणारे लगेच याची जाणीव करून देतातच.

७) पुण्यात trafficorp नावाच्या नवीन यंत्रणेचे वाजत गाजत स्वागत झाले आहे. यात वाहतूक पोलीसाडील blackberry मोबाईलमध्ये गाडीचा नंबर टाकला की लगेच गाडीची माहिती, आणि मालकाचा पत्ता ई. गोष्टी कळतात. पण मुख म्हणजे हा पत्ता खरा असणारे का ? बरेचदा हा पत्ता फारच जुना असतो आणि अस्तित्वातही नसतो.पण याकडे कोणी बघणार नाही. नवीन blackberry घेण्यात यांना जास्त फायदा आहे.

८) मी पुण्यात आल्यापासून (७+ वर्षे ) सिंहगड रस्त्याचे काम चालू असलेले बघतोय. सिंहगड रस्त्यावर काम चालू नाही, असे एक दिवसही घडले नाही. नेहमी कुठेतरी खोदलेले असतो रस्ता. याला कारण काय ?

९) मराठी वाहिन्यावरील अशुद्ध मराठी लेखन, इंग्रजीचा अतिवापर हल्ली फारच डोक्यात जावू लागला आहे. ज्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द आहेत त्यावेळी पण मराठी शब्द का वापरत नाहीत हे लोक ?

१० ) पेरू खाताना बी पुन्हा एकदा दातात अडकली. पेरूची बी आणि दातातील फट नेहमी एकाच आकाराची का असते ? (हा विचार माझा नाहीये.पण तो प्रत्येक वेळी दातात बी अडकल्यावर माझ्या मनात येतो.)

जाता जाता, मला हल्लीच शोध लागला आहे कि माझ्या मनात random विचार फारच येतात.
3

कुठे जातो तुमचा आयकर ? - १

भोपाल दुर्घटनेच्या ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी

श्री. गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी सांगितले की राज्य सरकारने केंद्र सरकारकडून भोपाल दुर्घटनेतील पिडीतांसाठी स्मारक बांधण्यासाठी ११६ कोटी रु. मागितले आहेत. ६७ एकर जागेतील कारखान्याच्या जमिनीवर हे स्मारक बांधण्यात येणार आहे.

आपल्या देशात आधीच एवढे पुतळे आणि स्मारके झाली आहेत आणि त्यात हे अजून एक स्मारक बांधण्याचा विचार चालू आहे. खरे म्हणजे भोपाल दुर्घटनेतील पीडितांची याहून मोठी थट्टा नाही, असे मला वाटते. अजूनही बऱ्याचश्या पीडितांना भरपाई मिळाली नाहीये. ज्यांना मिळाली आहे ती पण अल्पशी आहे. एवढे असताना स्मारक बांधून नक्की फायदा कोणाचा होणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

( अमित वर्मा याच्या "Where your taxes go ?" या लेखमालेवरून प्रेरित होवून ही लेखमाला सुरु करत आहे. वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
मला मराठी पेपरातील बातमीची link द्यायची होती. पण ती सापडली नाही. कोणाला माहित असल्यास कृपया ती दयावी.)