8

मला सचिन का आवडतो ?

सचिनच्या महानतेबद्दल आता वेगळे काही सांगण्याची गरज नाही. सलग २० वर्षे खेळून धावा करत राहणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. तो आता विक्रमांच्या शिखरावर जावून पोचला आहे. हल्ली तर त्याच्या प्रत्येक सामन्यात त्याचा काहीतरी नवीन विक्रम होतो.

पण मला सचिन का आवडतो ?
त्याच्या सततच्या धावा आहे महत्वाचे कारण आहेच . पण मुख्य म्हणजे सचिन मला "आपल्यातला" वाटतो. बाकी कोणत्याही celebrity मी असे ठामपणे म्हणू शकत नाही. सचिन म्हणजे कोणत्याही मध्यमवर्गीयासाठी एक आदर्श उदाहरण आहे. साध्या कुटुंबातला एक मुलगा, दिसायला फारसा चांगला नाही, क्रिकेटविश्वात कुठे godfather नाही, कुठल्याही नेत्याचा वरदहस्त नाही, असे असताना देखील सोळ्याव्या वर्षी केवळ गुणवत्तेच्या जोरावर भारतीय संघात निवड होवून पुढची २० वर्षे खेळतोय तो ! एवढी वर्षे करोडो चाहत्यांचा प्रचंड दबाव असताना त्याने डोके शांत ठेवून फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले आहे.
एवढी वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाहि तो कोणत्याही वादात पडलेला नाहीये. (अपवाद फेरारीचा). कुठल्याही बॉलीवूडच्या नायिकेसोबत एक दिवस सुद्धा त्याचे प्रेमप्रकरण नाही, फेरारीने त्याने पदपथावरच्या लोकांना चिरडले नाही, घरी AK-47 बाळगली नाही, कामवालीसोबत अतिप्रसंग केला नाही, हरीण मारले नाही, कमी कपड्यांत नाच केला नाही, match-fixing केले नाही, भगवे कपडे घालून प्रक्षोभक भाषणे केली नाही. तो फक्त धावा करतो. बास ! भारतीय संघाची नौका त्याने कित्येक वेळा किनाऱ्यावर सुखरूप आणली आहे. आणि एवढे असूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. म्हणूनच तो मला मला "आपल्यातला" वाटतो. माझे काही मित्र त्याला भेटलेले आहेत. त्यांच्याशी त्याने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. photos काढले आहेत. "I am a celebrity so I am different" असा attitude त्याने कधीही दाखवलेला नाही. हेच त्याचे वेगळेपण आहे.

[टीप : हा लेख आजच्या शिवसेना - सचिन वादाच्या आधी लिहिलेला आहे. या वादाबद्दल आणि एकूनच "मराठी"पणाच्या मुद्द्यावर मी लवकरच लेख लिहीन. ]

Update : सचीनवरच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणारी ही साईट चेतननी comments मध्ये दिली आहे. ती अवश्य बघा.

8 प्रतिक्रिया:

chetan said...

खूप छान आहे............
पुढला लेख वाचायला आवडेल............

Potter said...

Good one. Everyone has written why they like Sachin from cricketing point of view. One who doubts his skills on the field doesn't understand the game. I guess the reason why he has 1 Billion lovers for 20 years is because he is modest.
Never doubt the brilliance of the man.
Quote Matt Hayden
"I have seen god. He bats at number 4 for India." :-)

chetan said...

www.sachinandcritics.com
वाचला नसशील तर वाच

VishalShodh said...

लेख खूप खूप आवडला

akshay said...

कुठल्याही बॉलीवूडच्या नायिकेसोबत एक दिवस सुद्धा त्याचे प्रेमप्रकरण नाही, फेरारीने त्याने पदपथावरच्या लोकांना चिरडले नाही, घरी AK-47 बाळगली नाही, कामवालीसोबत अतिप्रसंग केला नाही, हरीण मारले नाही, कमी कपड्यांत नाच केला नाही, match-fixing केले नाही, भगवे कपडे घालून प्रक्षोभक भाषणे केली नाही. तो फक्त धावा करतो. बास !


atishay uttam..

Ashutosh said...

sachin ha ekmeva asa celebrity ahe jo kadhich tychya core competency vyatirikta dusrya kuthlyach goshtishi jodla gele nahi...

tyamule sachin aaplyala aaplyatla vatato...

aani ho.. kharach manatla bolalas..aavadla...!!

Jitesh Shah said...

eggjhatlyy!!
its not just the runs.. its the man himself!

रोहन चौधरी ... said...

आपला 'सच्चु' ग्रेटच आहे यार ... मस्त लेख.