8

Random thoughts of the week - 2

१) आपल्या देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. आणि तो आता शिष्टाचार बनला आहे. पण आपल्याकडे क्रिकेट मधला भ्रष्टाचार अजूनही मान्य नाही. एखादयावर क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप जरी असला तरी त्याच्याकडे खुन्यापेक्षा वाईट नजरेने बघितले जाते.

२) "One Google to rule them all" होतंय आता ! गुगल स्वत:चा HTTP ला पर्यायी protocol काढताय, गुगल ची OS आलीच आहे. गुगल आता स्वत:चा फोन पण काढणारे अशी बातमी आहे. कोरियामध्ये LG च्या toothpastes पण आहेत. गुगल पण असे करणार का ? :P

३) ऑफिसमध्ये vi editor वापरायची एवढी सवय झाली आहे आता की हा लेख लिहितानासुद्धा vi मधल्या i आणि :w या commands वापरतोय मी बरेचदा.

४) काल ऑफिसमध्ये गाडीवर जाताना मी एक प्रयोग केला. अशी कल्पना केली की आपल्याला कोणतीच गाडी दिसत नाहीये. फक्त चालवणारी माणसे दिसत आहेत. रस्त्यावरील सगळे लोक उडत जाताना दिसू लागले. मी पण ! तुम्ही पण प्रयत्न करून बघा. मजा येते. :P

५) रत्यावर एक विशेष जाड मुलगा दिसला. त्याला बघून प्रज्वलीत ने सांगितलेली एक comment आठवली "अरे तो एवढा जाड आहे की तो Google Earth वरून पण दिसतो "

६) अक्षयकुमार चा ब्लू चित्रपट आता TV वर दाखवणारेत आता कोणत्यातरी channel वर. ब्लू super flop झाल्याचे माहित होते पण लगेच TV वर दाखवण्याएवढा आपटला आहे हे माहित नव्हते.

७) २६/११ च्या निमित्ताने आयडियाने केलेली "Talk for India" ही जाहिरात जास्तच डोक्यात गेली. लोकांनी केलेल्या फोनच्या पैशापेक्षा या जाहिरातीवर जास्त खर्च झाला असेल.फक्त जाहिरातीचे पैसे पोलिसांना दिले असते तरी चालले असते आणि तरीही "* अटी लागू" होत्याच. माझ्या एका मित्राने मग Idea call center ला फोन केला आणि उगीच गप्पा मारत बसला थोडा वेळ ! फुकट ! आणि वर Talk for India पण झाले.

८) आपल्यापेक्षा हळू गाडी चालवणारा नेहमी मंद असतो आणि वेगाने चालवणारा उद्धट, show off करणारा असतो. असे का ?

९) परवाच केशवसुतांची तुतारी ही कविता परत वाचनात आली. त्यातील पहिले कडवे सगळ्यांच माहित असेल

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अत्यंत स्फूर्ती देणारी ही कविता आहेच. पण माझ्या मनात एका प्रश्न आला, (केशवसुतांची क्षमा मागून) की कवी जर एवढे भव्य दिव्य या तुतारीच्या साहाय्याने करणार आहेच तर तुतारीपण स्वत:च घ्यायला काय होते ? दुसरा कोणीतरी, कधीतरी तुतारी आणून देण्याची वाट का बघायची ?

१० ) आत्ताच प्रज्वलीतने Buttered cat paradox हा नविन लेख लिहिला. त्यावरून मला एक भारी कल्पना सुचली.

आपला गरीब नायक भारतात आहे. त्याला अमेरिकेला जायचे आहे. अणि त्याच्याकडे पैसे नाहीत. विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे तो. मग तो आपल्या पोटाला एक मांजर अणि पाठीवर बटर लावलेले ब्रेड बांधतो अणि एक उंच इमारतीवरून उडी मरतो. अर्थातच तो parachute पण घेतो सोबत. पण ते लगेच उघडत नाही. आता या Buttered cat paradox मुळे तो हवेत तरंगत राहतो. आणि १२ तासांनंतर तो मांजरीला सोडतो आणि parachute उघडतो. आणि काय ? तो अमेरिकेतल्या रस्त्यावर सुखरूप उतरतो.
9

The Giggle Loop

"गिगल लूप " ही BBC वरील Coupling या मालिकेतील जेफ या पात्राने वर्णन केलेली मनाची स्थिती आहे. ही फार सोपी आणि भारी कल्पना आहे. ही स्थिती बहुतेक वेळी मौन पाळण्याच्या वेळेस येते. कल्पना करा की, कोणाचा मृत्यू झाल्यावर किंवा इतर दुख:द प्रसंगी २ मिनिटे मौन पाळण्याचे ठरते. मौन सुरु होते. जसे जसे मौन पुढे सरकू लागते, तसा तसा गिगल लूप सुरु होतो. सगळे लोक एकदम शांत असतात. आणि याच वेळी तुमच्या मनात येते की आत्ता जर आपण हसलो तर तर ती सगळ्यात वाईट गोष्ट होईल. तुम्ही असा विचार केला रे केला की तुम्हाला हसू येण्यास सुरुवात होते. तुम्ही मोठ्या कष्टाने हसू दाबून ठेवता. स्वत:वर नियंत्रण मिळवता. पण तुमच्या मनात विचार येतो की आपण आत्ता हसलो असतो तर किती वाईट झाले असते. आणि तुम्हाला परत हसू येते. पण या वेळी, अजून जोरात ! तुम्ही परत मोठ्या कष्टाने स्वत:वर नियंत्रण मिळवता. मग तुम्ही विचार करता की या मोठ्या हसण्यामुळे अजून जास्त वाईट झाले असते. आणि तुम्हाला परत हसू येते. पण हे अजून जास्त मोठे असते. मनाच्या या स्थितीला गिगल लूप म्हणतात.

गिगल लूप आपण बरेचदा अनुभवतो. बरेचदा समोरील व्यक्ती काहीतरी सांगत असते आणि आपणांस हसायला येते पण आपण हसू शकत नाही. समोरील व्यक्ती काय म्हणते आहे याकडे सुद्धा लक्ष देवू शकत नाही आपण. मी अनुभवलेला सगळ्यात मोठा गिगल लूप मला चांगलाच आठवतो. काही महिन्यांपूर्वी मी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील प्रकल्प प्रायोजित करण्याबाबत एका मुलींच्या गटाची मुलाखत घेत होतो.(साध्या मराठीत "Final year BE project sponsorship साठी एका group चा interview घेत होतो.") मुलाखतीच्या शेवटी मी एका मुलीला project बद्दल काही ideas आहेत का विचारले. ती म्हणाली "हो. प्राण्यांसाठी संगणक". आणि तिने तिची कल्पना विस्तृतपणे सांगायला सुरुवात केली "आपण प्राणी पाळतो. पण आपण बरेचदा घराबाहेर असतो. तेंव्हा त्या प्राण्यांना कंटाळा येतो. आपण प्राण्यांसाठी संगणक बनवायचा जेणेकरून तेही संगणक वापरू शकतील. आपल्यासोबत chatting करू शकतील. आपण एखादे वेळी घराचे कुलूप लावायचे विसरलो तर त्यांना IM वर सांगायचे म्हणजे ते आतून दार लावून घेतील." मला कळले की मी गिगल लूप मध्ये फार वाईट रीतीने अडकलो आहे. मीच मुलाखत घेत असल्यामुळे मी या कल्पनेवर हसू पण शकत नव्हतो. आणि अचानक बाहेरही जावू शकत नव्हतो. शेवटी मी फार फार प्रयत्नाने स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि त्या गटाला नंतर कळवतो म्हणून घरी जायला सांगितले. आणि त्या गेल्यावर मी अक्षरश; फुटलो. (माझ्या नाटक करणाऱ्या मित्रांकासून घेतलेला हा शब्द. त्यांच्या भाषेत फुटणे म्हणजे प्रचंड हसणे.)या नंतर मी बराच वेळ हसत होतो.त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून या कल्पनेवर विचार केला आणि त्यावर आधारित बऱ्याच भारी कल्पना शोधून काढल्या. पण तूर्तास एवढे पुरे ! आमच्या कल्पना गिगल लूप मध्ये येत नाहीत.
2

Iss Baar Nahin

This is a poem by Prasoon Joshi on the aftermath of Mumbai terrorist attack.
Let us not forget and forgive this time .Let us not let the wound heal as always...


Is baar jab woh choti si bachchi mere
paas apni kharonch le kar aayegi
Main use phoo phoo kar nahin behlaoonga
Panpaney doonga uski tees ko

Is baar nahin

Is baar jab main chehron par dard likha dekhoonga
Nahin gaoonga geet peeda bhula dene wale
Dard ko risney doonga' utarney doonga andar gehrey

Is baar nahin

Is baar main na marham lagaoonga
Na hi uthaoonga ruee ke phohey
Aur na hi kahoonga ki tum aankhein band karlo,
gardan udhar kar lo main dawa lagata hoon
Dikhney doonga sabko, hum sabko khuley nangey ghaav

Is baar nahin

Is baar jab uljhaney dekhoonga, chatpatahat dekhoonga
Nahin daudoonga uljhee dor lapetney
Uljhaney doonga jab tak ulajh sake

Is baar nahin

Is baar karm ka hawala de kar nahin uthaoonga auzaar
Nahin karoonga phir se ek nayee shuruaat
Nahin banaoonga misaal ek karmyogi ki
Nahin aaney doonga zindagi ko aasani se patri par
Utarney doonga usey keechad main,
tedhey medhey raston pe
Nahin sookhney doonga deewaron par laga khoon
Halka nahin padneydoonga uska rang
Is baar nahin banney doonga usey itna laachaar
ki paan ki peek aur khoon ka fark hi khatm ho jaye

Is baar nahin

Is baar ghawon ko dekhna hai
Gaur se thoda lambe wakt tak
Kuch faisley
Aur uskey baad hausley
kahin toh shuruat karni hee hogi
Is baar yahi tay kiya hai...

--Prasoon Joshi

"Is baar nahin" Video in Prasoon Joshi's own voice.

No comments from my side.Lyrics says it all.
13

Random thoughts of the week

या लेखात या आठवड्यात माझ्या मनात आलेले काही random विचार लिहित आहे.

१) मागच्याच आठवड्यात "आओ विश करे" नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात एक लहान मुलगा मोठा बनण्याची इच्छा व्यक्त करतो आणि आफताफ शिवदासानी बनतो. आता कोणत्या मुलाला आफताफ शिवदासानी बनवेसे वाटेल ? स्वत: आफताफ शिवदासानीपण असे वाटणार नाही.

२) मनसेचे नेते राजकारण आणि खाजगी आयुष्य वेगळे ठेवतात. विधानसभेत मराठीच्या नावाने राडा घालणे आणि स्वत:च्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. खरे तर सगळ्याच नेत्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

३) लोक मनसेला नवीन पक्ष का म्हणतात ? आत्ता स्थापना झाली आहे म्हणून ? खरे तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या लोकांचा हा पक्ष आहे. शरद पवार यांनी जेंव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ची स्थापना केली तेंव्हा तर असे कोणी म्हणाले नाही. १९९९ च्या निवडणुकीत त्यांना ७०+ जागा मिळाल्या होत्या. आणि ते खरे किंगमेकर झाले होते. काहीही न बोलता.

४) पुण्यात काहीही गरज नसताना उगीच horn वाजवाण्यारा लोकांना horny का म्हणत नाहीत ? उगीच घाई लागलेली असते यांना.

५) पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता आता सामान्य वाहतुकीसाठी बंद केला आहे. एका बाजूने अर्ध्या रत्यावर barricades लावले आहेत आणि दुसया बाजूने तर पूर्ण रस्त्यावर barricades लावले आहेत. याचा अर्थ पोलिसांना हा रस्ता खरच वाहतुकीसाठी बंद करायचा आहे. नाहीतर नुसता No Entry चा फलक लावला असता.

६) No Entry चा फलक ज्या रस्त्याच्या सुरवातीला असतो त्या रस्त्याच्या शेवटी पोलीस हमखास असतोच.

७) कौस्तुभचा HTC चा android OS असलेला नविन मोबाईल बघत होतो. त्यात metal detector नावाचे एक App आहे. याचा उपयोग काय म्हणाल्यावर तो म्हणाला की हे App Iphone वर नाहीये. हे App घेताना त्यांनी सांगितले होते की "Iphone असणाऱ्या मित्रांना तुम्ही हे App दाखवून जळवू शकता" . मग या निरुपयोगी App वरून खऱ्या उपयोगी App ची चर्चा सुरु झाली (Azingo effect :P) आपण किती सिगारेट किंवा किती दारू प्यायली आहे हे मोजणारे App पाहिजे. आणि आपल्या घराचे लोक किती level पर्यंत आपले धुम्रपान, मद्यपान ओळखू शकतात याची एक threshold level ठरवली पाहिजे म्हणजे या threshold level पर्यंत धुम्रपान, मद्यपान करता येईल.

८) अभिजीत नाव असल्याचा एक दुष्परिणाम हल्ली जाणवू लागला आहे. अभिजीत नावामुळे माझा फोन नंबर बऱ्याच लोकांच्या contact list मध्ये पहिला आहे. आणि त्यातले काही लोक अजून मोबाईल शिकत आहेत. त्यामुळे कधीही sms, call , miscall, येत असतात. या आठवड्यात हे प्रमाण जास्तच वाढले आहे. आता हे लोक माझ्यापेक्षा बरेच मोठे असल्यामुळे मी त्यांना काही म्हणू पण शकत नाही. "चालतं चालत" म्हणायचे अजून काय करणार ?

९) काल कोरेगाव पार्कमधून येताना मिश्री बनवण्याचा तो प्रसिद्ध वास आला. हा वास मला कोरेगाव पार्कमधून अपेक्षित नव्हता. खरे म्हणजे हा वास माझ्या डोक्यात जातो. मग घराजवळ आल्यावर रातराणीचा वास आला. मन प्रसन्न झाले .

१० ) काल IBN लोकमत च्या कार्यालयावर हल्ला करून शिवसेनेने ते किती वैफल्यग्रस्त झाले आहेत हे दाखवून दिले आहेत. खरे म्हणजे शिवसेनेने आता वैचारिक दिवाळखोरीच जाहीर करायला हवी, मग काहीही करायला ते मोकळे ! पण गम्मत म्हणजे छगन भुजबळ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि नेहमीचे भाषण दिले. छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी झी मराठी च्या कार्यालयावर केलेला हल्ला ते विसरलेले दिसतात.

११ ) पुणेरी पाट्यांबद्दल आता अजून वेगळे बोलायची गरज नाही. पण काल एका रिक्षाच्या मागे असलेली एक पाटी बघून मी गार झालो। ती पाटी अशी "मार्बल नेम प्लेट आणि धबधब्याचे क्लासेस घेतले जातील. वास्तुशास्त्रानुसार बनवलेले वाहणारे धबधबे विकत आणि भाड्याने मिळतील" एक मिनिट तर मला मी काय वाचतोय हेच कळेना ! धबधबे भाड्याने घ्यायची कल्पना आवडली मला. हल्ली तर वास्तुशास्त्रानुसार काहीही बनवतात.

१२ ) जाता जाता : राजू परुळेकरांनी सचिन वर लिहिलेला हा लेख वाचा. WTF article of the month म्हणता येईल या लेखाला.

8

मला सचिन का आवडतो ?

सचिनच्या महानतेबद्दल आता वेगळे काही सांगण्याची गरज नाही. सलग २० वर्षे खेळून धावा करत राहणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. तो आता विक्रमांच्या शिखरावर जावून पोचला आहे. हल्ली तर त्याच्या प्रत्येक सामन्यात त्याचा काहीतरी नवीन विक्रम होतो.

पण मला सचिन का आवडतो ?
त्याच्या सततच्या धावा आहे महत्वाचे कारण आहेच . पण मुख्य म्हणजे सचिन मला "आपल्यातला" वाटतो. बाकी कोणत्याही celebrity मी असे ठामपणे म्हणू शकत नाही. सचिन म्हणजे कोणत्याही मध्यमवर्गीयासाठी एक आदर्श उदाहरण आहे. साध्या कुटुंबातला एक मुलगा, दिसायला फारसा चांगला नाही, क्रिकेटविश्वात कुठे godfather नाही, कुठल्याही नेत्याचा वरदहस्त नाही, असे असताना देखील सोळ्याव्या वर्षी केवळ गुणवत्तेच्या जोरावर भारतीय संघात निवड होवून पुढची २० वर्षे खेळतोय तो ! एवढी वर्षे करोडो चाहत्यांचा प्रचंड दबाव असताना त्याने डोके शांत ठेवून फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले आहे.
एवढी वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाहि तो कोणत्याही वादात पडलेला नाहीये. (अपवाद फेरारीचा). कुठल्याही बॉलीवूडच्या नायिकेसोबत एक दिवस सुद्धा त्याचे प्रेमप्रकरण नाही, फेरारीने त्याने पदपथावरच्या लोकांना चिरडले नाही, घरी AK-47 बाळगली नाही, कामवालीसोबत अतिप्रसंग केला नाही, हरीण मारले नाही, कमी कपड्यांत नाच केला नाही, match-fixing केले नाही, भगवे कपडे घालून प्रक्षोभक भाषणे केली नाही. तो फक्त धावा करतो. बास ! भारतीय संघाची नौका त्याने कित्येक वेळा किनाऱ्यावर सुखरूप आणली आहे. आणि एवढे असूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. म्हणूनच तो मला मला "आपल्यातला" वाटतो. माझे काही मित्र त्याला भेटलेले आहेत. त्यांच्याशी त्याने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. photos काढले आहेत. "I am a celebrity so I am different" असा attitude त्याने कधीही दाखवलेला नाही. हेच त्याचे वेगळेपण आहे.

[टीप : हा लेख आजच्या शिवसेना - सचिन वादाच्या आधी लिहिलेला आहे. या वादाबद्दल आणि एकूनच "मराठी"पणाच्या मुद्द्यावर मी लवकरच लेख लिहीन. ]

Update : सचीनवरच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणारी ही साईट चेतननी comments मध्ये दिली आहे. ती अवश्य बघा.