4

जोगवा

आजच "जोगवा" पाहिला. त्याआधी "गंध" हा चित्रपट पाहिला होता. हल्ली मराठी चित्रपट पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मराठी चित्रपट हल्ली फारच बदलू लागला आहे. "अलका कुबल style" चे चित्रपट हल्ली फार निघत नाहीत.(नसावेत.) वेगळ्या विषयाचे आणि धाटणीचे चित्रपट हल्ली निघू लागले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. सध्याच्या टुकार हिंदी चित्रपटांच्या तुलनेत तर हे मला जास्तच चांगले वाटतात.

जोगवा पण अश्याच वेगळ्या वाटेवरचा आहे. जोगते आणि जोगतीण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे . सुली च्या (मुक्ता बर्वे ) केसात जट निघते येल्लामा देवीच्या चरणी अर्पण करून जोगविण बनवण्यात येते . तायप्पाला (उपेंद्र लिमये) सुद्धा जोगता बनून साडी घालण्यास भाग पडते. अर्थातच दोघांनाही हे स्वीकारणं जड जातं. नव्या पंथामध्ये मिसळून जाताना होणारी त्यांची धडपड, तायाप्पाचे सुरुवातीचे सुलीवरचे अव्यक्त प्रेम, जोगत्यांबद्दल असलेला समाजाचा दृष्टीकोन, तायप्पाला आणि सुलीचे फुलात जाणारे प्रेमाचे नाते बघताना आपण खिळून जातो.

चित्रपटात आवडण्यासारख्या गोष्टी बर्याच आहेत. पहिले म्हणजे विषय. चित्रपट डॉ. राजन गवस यांच्या 'चोंडकं' आणि 'भंडारभोग' या कादंबऱ्यांवर व चारुता सागर यांच्या 'दर्शन' या कथेवर आधारित आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये, किशोर कदम, विनय आपटे यांनी आपापल्या भुमिका अतिशय उत्तम साकार केल्या आहेत. अजय-अतुल चे संगीत तर दर्जेदारच आहे.

चित्रपटात काही गोष्टी जाणवतात. उदा, तायप्पाला किंवा सुली गावातून पळून का जात नाहीत ? शेवटी त्यांनी केलेले बंड पण जरा फिल्मी वाटले. पण या गोष्टी मला फक्त जाणवल्या, खटकल्या नाहीत.

या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तब्बल साठ नामांकने आणि ३७ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (महाराष्ठ्र शासन, पिफ, झी गौरव, मटा सन्मान, संस्कृती कलादर्पण, व्ही शांताराम इत्यादी) पुरस्कार पटकावला आहे.

एवढे सगळे सांगून झाल्यावर "जोगवा पाहाच" असे वेगळे सांगण्याची गरज नाही.

4 प्रतिक्रिया:

Salil said...

khup awagadh aNi supposedly 'black listed' wishay - uttam patdhatini handle kelay - especially first half tar bhayanak aangawar yeto

2nd half jara excessively filmy ahe matra nakkich - to khatakala jari nahi tari thodasa 'wadheev' watala

vaidya guruji - parikshaN changala lihitay - jorat ahe :)

Mahendra said...

Got to see this.. :) Thanks.

kiran said...

Vaidya nchi likhan shaili mala nehmich avadate. Pan jya chitrapatane evadha avaghad vishay hatalala ahe tyache he varnan tevadhyach takatiche ahe.. mhanje ase varnan vachun kontya hi vyakti la pudhacha show baghaychi ichha honar...

Attuttam...

Suhas Zele said...

जोगवा एकदा बघायला हवाच...
http://suhasonline.wordpress.com/