17

साडी, दारू आणि खेळणी

Azingo चे canteen म्हणजे आमच्यासाठी एक भन्नाट जागा आहे. ऑफीसची coffee पिता पिता आमची कल्पनाशक्ती अगदी गगनात भराऱ्या मारत असते. "साडी, दारू आणि खेळणी " हि आमची आजची कल्पना !

साडी, दारू आणि खेळणी यांची दुकाने शेजारी शेजारी टाकायची. म्हणजे बायको साड्या खरेदी करत असताना नवरा शेजारच्या बार मध्ये जावून पेग मारत बसेल आणि लहान मुलगा खेळण्यांच्या दुकानात रमेल. दुसऱ्याला वेळ लागतोय म्हणून कोणी कंटाळणार नाही. संपूर्ण कुटुंबाचे हमखास मनोरंजन होण्याची खात्री ! (कुटुंबात आजी, आजोबा असतील तर ते घरी TV वर daily soap बघत असतील असे गृहीत धरण्यात आले आहे.)


फक्त दुकानाबाहेर आल्यावर ३ माणसे लागतील. एक बायकोनी खरेदी केलेल्या साड्या सांभाळण्यासाठी, एक मुलाला सांभाळण्यासाठी (हे काम मुलाची आईपण करू शकते.) आणि शेवटचा नवऱ्याला सांभाळण्यासाठी.

इथून कल्पनाशक्ती कितीही पुढे जाउ शकते. साडीवर १ पेग फ्री, quarter वर खेळणे फ्री अश्या अनेक ऑफर्स देता येतील. विजय मल्ल्याला ही कल्पना विकता येवू शकेल का यावर सध्या विचार करतोय.

Update : जर तुम्ही पोस्टवरील comments वाचत नसाल तर सलील ने या दुकानासाठी "अपाची'स शगुन खेळीया" असे नाव सुचवले आहे आणि नचिकेतने ह्या दुकानाच्या जाहिरातीचासुद्धा विचार केला आहे.

रेडियो वर अशी जाहिरात करता येइल (कुठली तरी weird tune ... may be "साहेब म्हणतो" वाली ...)
(टिंग टॉंग)
(टिकटिकीटिकटिक .. )
आई म्हणते साडी साडी,
छबू म्हणतो गाडीगाडी ..!
बाबा म्हणला ताडीताडी ...
......................
घाबरू नका, सादर आहे, नव्या युगाचा नवीन मॉल, "अपाची'स शगुन खेळीया",
जिथे साडी ही आहे, आणि साकी ही आहे,
पदर लुंगी ही आहे, आणि घसरगुंडी ही आहे,
जिथे डब्बल घोड़ा आहे आणि Royal Stag ही आहे ...

अनेक गरजा आणि एकच Absolute तोडगा !
........... "अप्पाचे शगुन खेळइया" !
५, कुमठेकर रोड, पुणे.

(टिंगटॉंग )
3

शिवरायांचे आग्र्याहून पलायन आणि आजचे राजकारणी

स्टार प्रवाह वरच्य़ा "राजा शिव छत्रपती" या मालिकेत सध्या शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग दाखवत आहेत. हा प्रसंग सर्वांनाच माहित असेल. शिवरायांना नजरकैदेत ठेवल्यावर त्यांनी आजारी पडल्य़ाचे नाटक केले. मग बरे होण्यासाठी त्यांनी साधुसंताना आणि मग पर्यायाने पहारेकर्य़ांनापण मिठाई वाटप सुरु केले.

आज तो प्रसंग बघताना मला अचानक लक्षात आले की आपल्य़ा तमाम राजकारण्यांनी शिवरायांच्य़ा या प्रसंगातून धडा घेतला आहे. जेंव्हा केंव्हा या नेत्यांना अटक होते किंवा अटकेची चिन्हे स्पष्ट दिसतात, तेंव्हा लगेचच हे नेते "आजारी पडतात". पद्मसिंह पाटील, स्वरुपसिंह नाईक यांची उदाहरणे ठळक आहेत. स्वरुपसिंह नाईक यांनी तर शिक्षेचा पुर्ण एका महिन्याचा कालावधी रुग्णालात व्यतीत केला. तिथे हे लोक मिठाई किंवा इतर गोष्टी वाटतात की नाही याचा पुरावा नाही. पण हल्ली अश्या गोष्टी वाटल्य़ावर स्वतःहून पळून जाण्य़ाची आवश्यकता नसते. कोर्टच तुमची सुटका करते. पक्ष बदलण्य़ाची सुरुवात जशी बिभीषणानी रामायणकाळात केली तशी ही आजारी पडण्य़ाची सुरुवात स्वतः शिवरायांनी सुरू केली आहे. आणि शिवरायांचे अनुकरण तर केलेच पाहिजे ना ! :-P