3

Plan 9 from outer space - The Classic

काही चित्रपट वाईट असतात. पण काही चित्रपट एवढे वाईट असतात की ते खरोखर चांगले वाटू लागतात. एडवर्ड डी. वूड याचा "Plan 9 from outer space" हा १९५९ सालातला चित्रपट हा असाच एक वाईट-सुंदर चित्रपट आहे.

कथा :
या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर हे परग्रहवासी आणि पृथ्वीवासी यांच्यातील युद्ध(??) आहे. परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांना नष्ट करण्याचे ८ प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. हा नववा प्रयत्न म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसांना जिवंत करून पृथ्वीवासीयांना मारणे आणि पृथ्वीवासीयांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणे असा आहे. पृथ्वीवासी सूर्यकिरणांपासून एक बॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण असा बॉम्ब वापरल्यामुळे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जेथे पोहोचतो असे सर्व ग्रह नष्ट होतील. ते थांबवण्यासाठी मूर्ख पृथ्वीवासीयांना थांबवण्याचा प्रांजळ प्रयत्न परग्रहवासी करत आहेत.

सर्वात वाईट चित्रपट ? -
हा चित्रपट जगातील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. (म्हणूनच मी हा चित्रपट बघितला :P ). वाईट कथा. वाईट पटकथा, वाईट छायाचित्रण, वाईट संवाद, रामसे बंधूंच्या चित्रपटातील special effects पेक्ष हास्यास्पद special effects अशा सगळ्या वाईट गोष्टी या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे बजेट कमी होते. त्यामुळे चुकीचे संवाद, चुकीचे छायाचित्रण अश्या गोष्टी सुधारण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडला नाहीये. मध्येच दिवस, मध्येच रात्र, काहीही घडत असते. दिग्दर्शकच्या एका मित्राला त्याने चित्रपटात घेतले होते. दुर्दैवाने तो मध्येच मरण पावला. मग त्याच्या ऐवजी दुसरयाच एका उंच माणसाला घेतले आहे. तो माणूस मग चित्रपटभर dracula सारखा तोंडावर पडदा घेतो. चित्रपटाचे बजेट कमी आहे म्हणून चित्रपटातील खलनायकाचे बजेट पण मध्येच कमी केले आहे. खलनायक ३ उडत्या तबकड्या घेवून एका स्मशानभूमीत येतो आणि ३ मृतांना जिवंत करतो. आणि या मृत माणसांना ते एका electrode gun च्या सहाय्याने नियंत्रित करतात. एका प्रसंगात हि gun चालत नाही तेंव्हा मृत माणूस परग्रहवासीयाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्याकडील २ तबकड्या काढून घेण्यात येतात.(नोकरशाही तिकडे पण आहे :P) आणि एका तबकडीवर त्याला भागवण्यास सांगितले जाते. चित्रपटातील परग्रहवासी हे पूर्णपणे पृथ्वीवासीयांसारखे दिसतात. आपल्यासारखेच कपडे घालतात. आपल्यासारखीच मारामारी करतात. त्यांच्या तबकडीमध्ये पण आपल्याकडे असतात तशी यांत्रिक उपकरणे असतात, जी गोळी मारल्यावर जळतात आणि तबकाडीला आग लागते. "सोलारोनाईट" (सूर्यकिरणांपासून आपण बनवत असलेला बॉम्ब) मुळे सर्व कसे नष्ट होईल हे सांगताना तर तो परग्रहवासी उदाहरण देतो. "समजा की, एका पेट्रोल च्या टाकीतून आपण पेट्रोल नळीद्वारे एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत. आता आपण जर भांड्याला आग लावली तर भ्न्द्याचा स्फोट होईलच पण नळीद्वारे टाकीत आग लागून टाकीचा पण स्फोट होईल.सोलारोनाईट हा या भांड्यासारखा आहे. त्याचा स्फोट झाला की टाकीचा म्हणजेच सूर्याचा आणि जिथे जिथे सूर्यकिरण पोहोचतात अश्या सर्व ठिकाणांचा स्फोट होईल."

या चित्रपटामध्ये काही विनोदी संवाद पण आहेत -

1) "Everyone is interested in the future, because that is where you and I are going to spend the rest of our lives."
2) "One thing's for sure, Inspector Clay is dead! Murdered! And somebody's responsible!"
3) "You humans and your stupid minds! Stupid! Stupid!" (एक परग्रहवासी मुलगी हा संवाद म्हणते.)

थोडक्यात, तुम्हाला असले चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही बघितलाच पाहिजे.

(या चित्रपटाचे IMDB चे rating ३.६ आहे. आणि IMDB च्या Bottom 100 च्या यादीत हा चित्रपट नाही. )
6

Random thoughts of the week - 4

१) दैनिक सकाळ साम वाहिनीच्या साहाय्याने एक Reality show सुरु करत आहेत. "सध्याच्या Reality show पेक्षा वेगळा, " ई. ई. वर्णन त्यांनी केले आहे. अर्थातच सकाळतर्फे असे अपेक्षितच आहे. मी सहजच या स्पर्धेत भाग घ्यावयाचा अर्ज बघितला. आणि त्यातल्या शेवटच्या एका वाक्याने चाट पडलो. त्यात लिहिले होते की या अर्जासोबत Rexona किंवा Lux साबणाची ३ वेष्टने (wrappers) पण पाठवायचे आहेत. Rexona या स्पर्धेचा प्रायोजक आहे मान्य, पण मग लोकांना वेष्टने गोळा करून पाठवायला का सांगता ? अर्थातच नियम सकाळचे असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. अर्थात या स्पर्धेकडून माझ्या काही अपेक्षा नाहीत. पण या स्पर्धा बघणारयांनी खालील २ अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
अ) स्पर्धेचे परिक्षक/ मार्गदर्शक बालाजी तांबे नको.
ब) स्पर्धेचा विजेता बारामतीचा नको. विजेता खरच चांगला असला तरी उगीच fixing झाल्यासारखे वाटेल.

२) पुण्यातील बर्याच चौकांमध्ये काही काळापूर्वी गाजावाजा करून कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माक्ष ठेवण्यासाठी बसवले होते ते. पण त्यांचा वापर करून कोणावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. उगीचच थोड्या थोड्या वेळाने flash मारत असतात ते. "Bird watching " साठी याचा उपयोग होत असावा असा आमचा फार संशय आहे. :P

३) "Don't take it personally" हे वाक्य हल्ली मी बरेचदा मित्रांसमोर बोलतो. त्याचे काय होते की, मित्रांची खिल्ली उडवल्यावर, ते हिरमुसले झाले की त्यांना मी म्हणतो की, "Don't take it personally. मी प्रत्येकाचीच खिल्ली उडवतो." आता हे वाक्य वापरून मी एक काल्पनिक प्रसंग उभा केला आहे.

अशी कल्पना करा की मी कोणत्यातरी मुलीकडे वाईट नजरेने बघत आहे. ती चिडून फणकाय्राने मला काहीतरी बोलते. मी तिला शांतपणे म्हणतो, "Don't take it personally. मी प्रत्येक मुलीकडे असाच बघतो." आता यावर तिची logical प्रतिक्रिया काय असेल याचा मात्र मला अंदाज येत नाहीये.

4) रिक्षांना चांगला horn, indicator का नसतो, हे मला न सुटलेले कोडे आहे, पुण्यातील रिक्षाचालकसुद्धा वळताना नीट हात दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कधीतरी मागच्या माणसावर उगीच कृपा म्हणून धुम्रपान करताना सिगारेटची राख झटकण्यासाठी हाताची २-३ बोटे भर काढावीत तसे काहीतरी रिक्षा वळवताना करतात .

५) "किस्सा पिछले जनम का" असला काहीतरी reality show चालू झाला आहे. तसलाच संमोहनशास्त्रीय कार्यक्रम मी स्वत: बघितला आहे. संमोहनतज्ञ माणूस एका माणसाला संमोहित करतो. आणि मागच्या जन्मात नेतो. येथपर्यंत ठीक आहे. पण मग तो नंतर त्या माणसाला मागच्या जन्मात कोण आहेस असे विचारतो. आणि समोरच्या माणसाकडून मोर, ससा, मांजर ई. उत्तर येते. मला एक गोष्ट करत नाही की, जर तो माणूस आत्ता मोर, ससा, मांजर आहे तर तो बोलू कसा शकतो ?

६) लोक चालताना किंवा एकाद्या कार्यक्रमात असताना चुकून कोणाचा धक्का लागला तर लगेच माफी मागतात. पण हेच लोक जेंव्हा दुचाकी चालवत असतात, तेंव्हा दुसर्या गाडीचा जरासा धक्का लागला तर लगेच का चिडतात ?

७) पु. ल. नी सांगितलेल्या जालीम शत्रूंच्या यादीत लग्नाचे चलचित्रण(video recording) दाखवणारे लोक आता समाविष्ट केले पाहिजेत. लग्नाचे चलचित्रण करायला माझा काहीच विरोध नाही, जो पर्यंत ते चलचित्रण मला बघायला लावत नाहीत तो पर्यंत.


8) राजू परुळेकरांनी या वेळच्या लोकप्रभामध्ये सचिनवर परत लेख लिहिला आहे. मागच्या लेखपेक्षा हा जास्त वाईट आहे. या माणसाचा problem काय आहे, हे मला समजत नाही.
4

सुनिता कृष्णन @ TEDIndia

सुनिता कृष्णन यांनी TED India च्या परिषदेत दिलेले हे भाषण ! सुनिता कृष्णन या लैंगिक शोषण, मानवी तस्करी (sex slavery and human trafficking) या क्षेत्रातील कार्यकर्त्या आहेत. त्यांचे हे भाषण तुम्हाला नक्कीच अंतर्बाह्य हादरवून टाकेल.
Publish Post

सुनिता कृष्णन यांची या भाषणानंतर झालेली मुलाखत
सुनिता कृष्णन यांचे wiki page त्यांच्या कार्याबद्दल अजून माहिती देणाऱ्या लिंक्स या पानावर मिळतील.
3

कायदा गाढव असतो का ?

पत्नी व मुलीचा खून करून तरुणाने आत्महत्या केल्याची हि बातमी आजच लोकसत्ता मध्ये वाचली. अमोल कांबळे याने आपल्या पत्नी व मुलीचा खून करून आत्महत्या केली. घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण या बातमीतील खालील वाक्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.

अमोल कांबळे यांच्यावर पत्नी वीणा व मुलगी आकृती या दोघींचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा तर स्वत: आत्महत्या केल्यामुळे ३०९ कलमान्वयेदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.


मला कायद्याच्या क्षेत्रातील फरसे ज्ञान नाही. पण मृत माणसावर गुन्हा दाखल करण्यामागचा उद्देश माझ्यासारखा साध्या माणसाला समजला नाही. जर तो जिवंत असता तर गुन्हा दाखल करून काहीतरी फायदा असता. पण आता या केसचे काय होणार ? ही केस बंद होणार का ? आणि मग जर केस दाखल करून लगेच बंदच करायची असेल तर मृत माणसावर गुन्हा तरी का दाखल केला ?

"कायदा गाढव असतो" असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. कदाचित हे त्याचेच एक उदाहरण असेल.
8

Random thoughts of the week - 3

१) हिंदी/मराठी मधले भयपट, भयमालिका या नेहमी विनोदी का असतात ? मी हिंदी/मराठी मधला एकही खराखुरा भयपट पहिला नाही. कोणी पाहिलंय का ?

२) कार्यालयात जाताना मी लष्कराच्या हद्दीतून जातो. तिथे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूस लष्करातील उच्चपदस्थ लोकांचे बंगले आहेत. या रस्त्यावर horn वाजवायला बंदी आहे. आणि येथे कायम २-३ जवान बंदूक घेवून गस्त घालत असतात. आता ते horn वाजवणारयाला गोळी घालतात का ते माहित नाही. मी तरी अजून horn वाजवून बघितला नाही. :P

3) CAT च्या परीक्षेत virus मुळे गोंधळ झाल्याने IIM-A आता प्रत्येक परीक्षार्थ्याला स्वत: anti virus आणायला सांगणार का असा प्रश्न पडलाय ! परीक्षेच्या आधी २ तास येवून आपापल्या संगणकावरील virus मुलांना काढायला लागेल असे वाटतंय !

४) Killer App ची नवीन व्याख्या : जे App चालू केल्यावर मोबाईल बंद पडतो / hang होतो / restart होतो.

५) पुण्यातील बसमधील आख्खी अर्धी बाजू स्त्रियांसाठी राखीव केली आहे. हे करताना माझ्या माहितीनुसार हेतू हाच होता कि, बसमध्ये चढताना लोक रांगेत चढत नाहीत. गर्दी करून चढतात. तेंव्हा स्त्रियांना जागा मिळत नाही. हे बर्याच अंशी बरोबर पण आहे. पण मी आता बस सुटण्याचा जागी बघतो तेंव्हा लोक रांगेत उभे असतात. स्त्री-पुरुषांसाठी एकाच रांग असते. मग या राखीव जागेचा फायदा काय ? आणि जेव्हा या रांगेतून स्त्रिया बसमध्ये चढतात, तेंव्हा त्यांनी राखीव जागेवर बसावे एवढीच पुरुषांची अपेक्षा अडते. पण असे घडत नाही.बऱ्याच स्त्रिया राखीव नसलेल्या जागेवर बसतात. आता या जागा सर्वांसाठी खुल्या असल्यामुळे त्यांना काही बोलताही येत नाही.

६) पुण्यातील लोक गाडी चालवताना आपल्याला हिरवा सिग्नल लागला आहे कि नाही ते बघत नाहीत तर दुसऱ्याला पिवळा सिग्नल लागला आहे का ते बघतात आणि लगेच निघतात. आणि तुमचे जर या पिवळ्या दिव्याकडे लक्ष नसेल तर मागून horn वाजवणारे लगेच याची जाणीव करून देतातच.

७) पुण्यात trafficorp नावाच्या नवीन यंत्रणेचे वाजत गाजत स्वागत झाले आहे. यात वाहतूक पोलीसाडील blackberry मोबाईलमध्ये गाडीचा नंबर टाकला की लगेच गाडीची माहिती, आणि मालकाचा पत्ता ई. गोष्टी कळतात. पण मुख म्हणजे हा पत्ता खरा असणारे का ? बरेचदा हा पत्ता फारच जुना असतो आणि अस्तित्वातही नसतो.पण याकडे कोणी बघणार नाही. नवीन blackberry घेण्यात यांना जास्त फायदा आहे.

८) मी पुण्यात आल्यापासून (७+ वर्षे ) सिंहगड रस्त्याचे काम चालू असलेले बघतोय. सिंहगड रस्त्यावर काम चालू नाही, असे एक दिवसही घडले नाही. नेहमी कुठेतरी खोदलेले असतो रस्ता. याला कारण काय ?

९) मराठी वाहिन्यावरील अशुद्ध मराठी लेखन, इंग्रजीचा अतिवापर हल्ली फारच डोक्यात जावू लागला आहे. ज्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द आहेत त्यावेळी पण मराठी शब्द का वापरत नाहीत हे लोक ?

१० ) पेरू खाताना बी पुन्हा एकदा दातात अडकली. पेरूची बी आणि दातातील फट नेहमी एकाच आकाराची का असते ? (हा विचार माझा नाहीये.पण तो प्रत्येक वेळी दातात बी अडकल्यावर माझ्या मनात येतो.)

जाता जाता, मला हल्लीच शोध लागला आहे कि माझ्या मनात random विचार फारच येतात.
3

कुठे जातो तुमचा आयकर ? - १

भोपाल दुर्घटनेच्या ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी

श्री. गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी सांगितले की राज्य सरकारने केंद्र सरकारकडून भोपाल दुर्घटनेतील पिडीतांसाठी स्मारक बांधण्यासाठी ११६ कोटी रु. मागितले आहेत. ६७ एकर जागेतील कारखान्याच्या जमिनीवर हे स्मारक बांधण्यात येणार आहे.

आपल्या देशात आधीच एवढे पुतळे आणि स्मारके झाली आहेत आणि त्यात हे अजून एक स्मारक बांधण्याचा विचार चालू आहे. खरे म्हणजे भोपाल दुर्घटनेतील पीडितांची याहून मोठी थट्टा नाही, असे मला वाटते. अजूनही बऱ्याचश्या पीडितांना भरपाई मिळाली नाहीये. ज्यांना मिळाली आहे ती पण अल्पशी आहे. एवढे असताना स्मारक बांधून नक्की फायदा कोणाचा होणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

( अमित वर्मा याच्या "Where your taxes go ?" या लेखमालेवरून प्रेरित होवून ही लेखमाला सुरु करत आहे. वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
मला मराठी पेपरातील बातमीची link द्यायची होती. पण ती सापडली नाही. कोणाला माहित असल्यास कृपया ती दयावी.)
8

Random thoughts of the week - 2

१) आपल्या देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. आणि तो आता शिष्टाचार बनला आहे. पण आपल्याकडे क्रिकेट मधला भ्रष्टाचार अजूनही मान्य नाही. एखादयावर क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप जरी असला तरी त्याच्याकडे खुन्यापेक्षा वाईट नजरेने बघितले जाते.

२) "One Google to rule them all" होतंय आता ! गुगल स्वत:चा HTTP ला पर्यायी protocol काढताय, गुगल ची OS आलीच आहे. गुगल आता स्वत:चा फोन पण काढणारे अशी बातमी आहे. कोरियामध्ये LG च्या toothpastes पण आहेत. गुगल पण असे करणार का ? :P

३) ऑफिसमध्ये vi editor वापरायची एवढी सवय झाली आहे आता की हा लेख लिहितानासुद्धा vi मधल्या i आणि :w या commands वापरतोय मी बरेचदा.

४) काल ऑफिसमध्ये गाडीवर जाताना मी एक प्रयोग केला. अशी कल्पना केली की आपल्याला कोणतीच गाडी दिसत नाहीये. फक्त चालवणारी माणसे दिसत आहेत. रस्त्यावरील सगळे लोक उडत जाताना दिसू लागले. मी पण ! तुम्ही पण प्रयत्न करून बघा. मजा येते. :P

५) रत्यावर एक विशेष जाड मुलगा दिसला. त्याला बघून प्रज्वलीत ने सांगितलेली एक comment आठवली "अरे तो एवढा जाड आहे की तो Google Earth वरून पण दिसतो "

६) अक्षयकुमार चा ब्लू चित्रपट आता TV वर दाखवणारेत आता कोणत्यातरी channel वर. ब्लू super flop झाल्याचे माहित होते पण लगेच TV वर दाखवण्याएवढा आपटला आहे हे माहित नव्हते.

७) २६/११ च्या निमित्ताने आयडियाने केलेली "Talk for India" ही जाहिरात जास्तच डोक्यात गेली. लोकांनी केलेल्या फोनच्या पैशापेक्षा या जाहिरातीवर जास्त खर्च झाला असेल.फक्त जाहिरातीचे पैसे पोलिसांना दिले असते तरी चालले असते आणि तरीही "* अटी लागू" होत्याच. माझ्या एका मित्राने मग Idea call center ला फोन केला आणि उगीच गप्पा मारत बसला थोडा वेळ ! फुकट ! आणि वर Talk for India पण झाले.

८) आपल्यापेक्षा हळू गाडी चालवणारा नेहमी मंद असतो आणि वेगाने चालवणारा उद्धट, show off करणारा असतो. असे का ?

९) परवाच केशवसुतांची तुतारी ही कविता परत वाचनात आली. त्यातील पहिले कडवे सगळ्यांच माहित असेल

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अत्यंत स्फूर्ती देणारी ही कविता आहेच. पण माझ्या मनात एका प्रश्न आला, (केशवसुतांची क्षमा मागून) की कवी जर एवढे भव्य दिव्य या तुतारीच्या साहाय्याने करणार आहेच तर तुतारीपण स्वत:च घ्यायला काय होते ? दुसरा कोणीतरी, कधीतरी तुतारी आणून देण्याची वाट का बघायची ?

१० ) आत्ताच प्रज्वलीतने Buttered cat paradox हा नविन लेख लिहिला. त्यावरून मला एक भारी कल्पना सुचली.

आपला गरीब नायक भारतात आहे. त्याला अमेरिकेला जायचे आहे. अणि त्याच्याकडे पैसे नाहीत. विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे तो. मग तो आपल्या पोटाला एक मांजर अणि पाठीवर बटर लावलेले ब्रेड बांधतो अणि एक उंच इमारतीवरून उडी मरतो. अर्थातच तो parachute पण घेतो सोबत. पण ते लगेच उघडत नाही. आता या Buttered cat paradox मुळे तो हवेत तरंगत राहतो. आणि १२ तासांनंतर तो मांजरीला सोडतो आणि parachute उघडतो. आणि काय ? तो अमेरिकेतल्या रस्त्यावर सुखरूप उतरतो.
9

The Giggle Loop

"गिगल लूप " ही BBC वरील Coupling या मालिकेतील जेफ या पात्राने वर्णन केलेली मनाची स्थिती आहे. ही फार सोपी आणि भारी कल्पना आहे. ही स्थिती बहुतेक वेळी मौन पाळण्याच्या वेळेस येते. कल्पना करा की, कोणाचा मृत्यू झाल्यावर किंवा इतर दुख:द प्रसंगी २ मिनिटे मौन पाळण्याचे ठरते. मौन सुरु होते. जसे जसे मौन पुढे सरकू लागते, तसा तसा गिगल लूप सुरु होतो. सगळे लोक एकदम शांत असतात. आणि याच वेळी तुमच्या मनात येते की आत्ता जर आपण हसलो तर तर ती सगळ्यात वाईट गोष्ट होईल. तुम्ही असा विचार केला रे केला की तुम्हाला हसू येण्यास सुरुवात होते. तुम्ही मोठ्या कष्टाने हसू दाबून ठेवता. स्वत:वर नियंत्रण मिळवता. पण तुमच्या मनात विचार येतो की आपण आत्ता हसलो असतो तर किती वाईट झाले असते. आणि तुम्हाला परत हसू येते. पण या वेळी, अजून जोरात ! तुम्ही परत मोठ्या कष्टाने स्वत:वर नियंत्रण मिळवता. मग तुम्ही विचार करता की या मोठ्या हसण्यामुळे अजून जास्त वाईट झाले असते. आणि तुम्हाला परत हसू येते. पण हे अजून जास्त मोठे असते. मनाच्या या स्थितीला गिगल लूप म्हणतात.

गिगल लूप आपण बरेचदा अनुभवतो. बरेचदा समोरील व्यक्ती काहीतरी सांगत असते आणि आपणांस हसायला येते पण आपण हसू शकत नाही. समोरील व्यक्ती काय म्हणते आहे याकडे सुद्धा लक्ष देवू शकत नाही आपण. मी अनुभवलेला सगळ्यात मोठा गिगल लूप मला चांगलाच आठवतो. काही महिन्यांपूर्वी मी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील प्रकल्प प्रायोजित करण्याबाबत एका मुलींच्या गटाची मुलाखत घेत होतो.(साध्या मराठीत "Final year BE project sponsorship साठी एका group चा interview घेत होतो.") मुलाखतीच्या शेवटी मी एका मुलीला project बद्दल काही ideas आहेत का विचारले. ती म्हणाली "हो. प्राण्यांसाठी संगणक". आणि तिने तिची कल्पना विस्तृतपणे सांगायला सुरुवात केली "आपण प्राणी पाळतो. पण आपण बरेचदा घराबाहेर असतो. तेंव्हा त्या प्राण्यांना कंटाळा येतो. आपण प्राण्यांसाठी संगणक बनवायचा जेणेकरून तेही संगणक वापरू शकतील. आपल्यासोबत chatting करू शकतील. आपण एखादे वेळी घराचे कुलूप लावायचे विसरलो तर त्यांना IM वर सांगायचे म्हणजे ते आतून दार लावून घेतील." मला कळले की मी गिगल लूप मध्ये फार वाईट रीतीने अडकलो आहे. मीच मुलाखत घेत असल्यामुळे मी या कल्पनेवर हसू पण शकत नव्हतो. आणि अचानक बाहेरही जावू शकत नव्हतो. शेवटी मी फार फार प्रयत्नाने स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि त्या गटाला नंतर कळवतो म्हणून घरी जायला सांगितले. आणि त्या गेल्यावर मी अक्षरश; फुटलो. (माझ्या नाटक करणाऱ्या मित्रांकासून घेतलेला हा शब्द. त्यांच्या भाषेत फुटणे म्हणजे प्रचंड हसणे.)या नंतर मी बराच वेळ हसत होतो.त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून या कल्पनेवर विचार केला आणि त्यावर आधारित बऱ्याच भारी कल्पना शोधून काढल्या. पण तूर्तास एवढे पुरे ! आमच्या कल्पना गिगल लूप मध्ये येत नाहीत.
2

Iss Baar Nahin

This is a poem by Prasoon Joshi on the aftermath of Mumbai terrorist attack.
Let us not forget and forgive this time .Let us not let the wound heal as always...


Is baar jab woh choti si bachchi mere
paas apni kharonch le kar aayegi
Main use phoo phoo kar nahin behlaoonga
Panpaney doonga uski tees ko

Is baar nahin

Is baar jab main chehron par dard likha dekhoonga
Nahin gaoonga geet peeda bhula dene wale
Dard ko risney doonga' utarney doonga andar gehrey

Is baar nahin

Is baar main na marham lagaoonga
Na hi uthaoonga ruee ke phohey
Aur na hi kahoonga ki tum aankhein band karlo,
gardan udhar kar lo main dawa lagata hoon
Dikhney doonga sabko, hum sabko khuley nangey ghaav

Is baar nahin

Is baar jab uljhaney dekhoonga, chatpatahat dekhoonga
Nahin daudoonga uljhee dor lapetney
Uljhaney doonga jab tak ulajh sake

Is baar nahin

Is baar karm ka hawala de kar nahin uthaoonga auzaar
Nahin karoonga phir se ek nayee shuruaat
Nahin banaoonga misaal ek karmyogi ki
Nahin aaney doonga zindagi ko aasani se patri par
Utarney doonga usey keechad main,
tedhey medhey raston pe
Nahin sookhney doonga deewaron par laga khoon
Halka nahin padneydoonga uska rang
Is baar nahin banney doonga usey itna laachaar
ki paan ki peek aur khoon ka fark hi khatm ho jaye

Is baar nahin

Is baar ghawon ko dekhna hai
Gaur se thoda lambe wakt tak
Kuch faisley
Aur uskey baad hausley
kahin toh shuruat karni hee hogi
Is baar yahi tay kiya hai...

--Prasoon Joshi

"Is baar nahin" Video in Prasoon Joshi's own voice.

No comments from my side.Lyrics says it all.
13

Random thoughts of the week

या लेखात या आठवड्यात माझ्या मनात आलेले काही random विचार लिहित आहे.

१) मागच्याच आठवड्यात "आओ विश करे" नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात एक लहान मुलगा मोठा बनण्याची इच्छा व्यक्त करतो आणि आफताफ शिवदासानी बनतो. आता कोणत्या मुलाला आफताफ शिवदासानी बनवेसे वाटेल ? स्वत: आफताफ शिवदासानीपण असे वाटणार नाही.

२) मनसेचे नेते राजकारण आणि खाजगी आयुष्य वेगळे ठेवतात. विधानसभेत मराठीच्या नावाने राडा घालणे आणि स्वत:च्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. खरे तर सगळ्याच नेत्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

३) लोक मनसेला नवीन पक्ष का म्हणतात ? आत्ता स्थापना झाली आहे म्हणून ? खरे तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या लोकांचा हा पक्ष आहे. शरद पवार यांनी जेंव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ची स्थापना केली तेंव्हा तर असे कोणी म्हणाले नाही. १९९९ च्या निवडणुकीत त्यांना ७०+ जागा मिळाल्या होत्या. आणि ते खरे किंगमेकर झाले होते. काहीही न बोलता.

४) पुण्यात काहीही गरज नसताना उगीच horn वाजवाण्यारा लोकांना horny का म्हणत नाहीत ? उगीच घाई लागलेली असते यांना.

५) पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता आता सामान्य वाहतुकीसाठी बंद केला आहे. एका बाजूने अर्ध्या रत्यावर barricades लावले आहेत आणि दुसया बाजूने तर पूर्ण रस्त्यावर barricades लावले आहेत. याचा अर्थ पोलिसांना हा रस्ता खरच वाहतुकीसाठी बंद करायचा आहे. नाहीतर नुसता No Entry चा फलक लावला असता.

६) No Entry चा फलक ज्या रस्त्याच्या सुरवातीला असतो त्या रस्त्याच्या शेवटी पोलीस हमखास असतोच.

७) कौस्तुभचा HTC चा android OS असलेला नविन मोबाईल बघत होतो. त्यात metal detector नावाचे एक App आहे. याचा उपयोग काय म्हणाल्यावर तो म्हणाला की हे App Iphone वर नाहीये. हे App घेताना त्यांनी सांगितले होते की "Iphone असणाऱ्या मित्रांना तुम्ही हे App दाखवून जळवू शकता" . मग या निरुपयोगी App वरून खऱ्या उपयोगी App ची चर्चा सुरु झाली (Azingo effect :P) आपण किती सिगारेट किंवा किती दारू प्यायली आहे हे मोजणारे App पाहिजे. आणि आपल्या घराचे लोक किती level पर्यंत आपले धुम्रपान, मद्यपान ओळखू शकतात याची एक threshold level ठरवली पाहिजे म्हणजे या threshold level पर्यंत धुम्रपान, मद्यपान करता येईल.

८) अभिजीत नाव असल्याचा एक दुष्परिणाम हल्ली जाणवू लागला आहे. अभिजीत नावामुळे माझा फोन नंबर बऱ्याच लोकांच्या contact list मध्ये पहिला आहे. आणि त्यातले काही लोक अजून मोबाईल शिकत आहेत. त्यामुळे कधीही sms, call , miscall, येत असतात. या आठवड्यात हे प्रमाण जास्तच वाढले आहे. आता हे लोक माझ्यापेक्षा बरेच मोठे असल्यामुळे मी त्यांना काही म्हणू पण शकत नाही. "चालतं चालत" म्हणायचे अजून काय करणार ?

९) काल कोरेगाव पार्कमधून येताना मिश्री बनवण्याचा तो प्रसिद्ध वास आला. हा वास मला कोरेगाव पार्कमधून अपेक्षित नव्हता. खरे म्हणजे हा वास माझ्या डोक्यात जातो. मग घराजवळ आल्यावर रातराणीचा वास आला. मन प्रसन्न झाले .

१० ) काल IBN लोकमत च्या कार्यालयावर हल्ला करून शिवसेनेने ते किती वैफल्यग्रस्त झाले आहेत हे दाखवून दिले आहेत. खरे म्हणजे शिवसेनेने आता वैचारिक दिवाळखोरीच जाहीर करायला हवी, मग काहीही करायला ते मोकळे ! पण गम्मत म्हणजे छगन भुजबळ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि नेहमीचे भाषण दिले. छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी झी मराठी च्या कार्यालयावर केलेला हल्ला ते विसरलेले दिसतात.

११ ) पुणेरी पाट्यांबद्दल आता अजून वेगळे बोलायची गरज नाही. पण काल एका रिक्षाच्या मागे असलेली एक पाटी बघून मी गार झालो। ती पाटी अशी "मार्बल नेम प्लेट आणि धबधब्याचे क्लासेस घेतले जातील. वास्तुशास्त्रानुसार बनवलेले वाहणारे धबधबे विकत आणि भाड्याने मिळतील" एक मिनिट तर मला मी काय वाचतोय हेच कळेना ! धबधबे भाड्याने घ्यायची कल्पना आवडली मला. हल्ली तर वास्तुशास्त्रानुसार काहीही बनवतात.

१२ ) जाता जाता : राजू परुळेकरांनी सचिन वर लिहिलेला हा लेख वाचा. WTF article of the month म्हणता येईल या लेखाला.

8

मला सचिन का आवडतो ?

सचिनच्या महानतेबद्दल आता वेगळे काही सांगण्याची गरज नाही. सलग २० वर्षे खेळून धावा करत राहणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. तो आता विक्रमांच्या शिखरावर जावून पोचला आहे. हल्ली तर त्याच्या प्रत्येक सामन्यात त्याचा काहीतरी नवीन विक्रम होतो.

पण मला सचिन का आवडतो ?
त्याच्या सततच्या धावा आहे महत्वाचे कारण आहेच . पण मुख्य म्हणजे सचिन मला "आपल्यातला" वाटतो. बाकी कोणत्याही celebrity मी असे ठामपणे म्हणू शकत नाही. सचिन म्हणजे कोणत्याही मध्यमवर्गीयासाठी एक आदर्श उदाहरण आहे. साध्या कुटुंबातला एक मुलगा, दिसायला फारसा चांगला नाही, क्रिकेटविश्वात कुठे godfather नाही, कुठल्याही नेत्याचा वरदहस्त नाही, असे असताना देखील सोळ्याव्या वर्षी केवळ गुणवत्तेच्या जोरावर भारतीय संघात निवड होवून पुढची २० वर्षे खेळतोय तो ! एवढी वर्षे करोडो चाहत्यांचा प्रचंड दबाव असताना त्याने डोके शांत ठेवून फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले आहे.
एवढी वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाहि तो कोणत्याही वादात पडलेला नाहीये. (अपवाद फेरारीचा). कुठल्याही बॉलीवूडच्या नायिकेसोबत एक दिवस सुद्धा त्याचे प्रेमप्रकरण नाही, फेरारीने त्याने पदपथावरच्या लोकांना चिरडले नाही, घरी AK-47 बाळगली नाही, कामवालीसोबत अतिप्रसंग केला नाही, हरीण मारले नाही, कमी कपड्यांत नाच केला नाही, match-fixing केले नाही, भगवे कपडे घालून प्रक्षोभक भाषणे केली नाही. तो फक्त धावा करतो. बास ! भारतीय संघाची नौका त्याने कित्येक वेळा किनाऱ्यावर सुखरूप आणली आहे. आणि एवढे असूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. म्हणूनच तो मला मला "आपल्यातला" वाटतो. माझे काही मित्र त्याला भेटलेले आहेत. त्यांच्याशी त्याने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. photos काढले आहेत. "I am a celebrity so I am different" असा attitude त्याने कधीही दाखवलेला नाही. हेच त्याचे वेगळेपण आहे.

[टीप : हा लेख आजच्या शिवसेना - सचिन वादाच्या आधी लिहिलेला आहे. या वादाबद्दल आणि एकूनच "मराठी"पणाच्या मुद्द्यावर मी लवकरच लेख लिहीन. ]

Update : सचीनवरच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणारी ही साईट चेतननी comments मध्ये दिली आहे. ती अवश्य बघा.

10

चित्रपट प्रदर्शन - आज कल

कालच "अजब प्रेम कि गजब कहानी" च्या जाहिरातीकरता कतरिना कैफ पुण्यात आली होती. त्याचा वृत्तांत आज एका मराठी वाहिनीवर बराच वेळ दाखवत होते. हल्ली कोणताही हिंदी आणि काही मराठी चित्रपट प्रदर्शित होताना जाहिरातीचा एक साचेबद्ध मार्ग तयार झाला आहे असे मला वाटते.

१) सर्वप्रथम चित्रपटाचा USP ठरून घेणे. मग तो काहीही असो - सर्वात जास्त खर्च झालेला चित्रपट, सगळ्यात जास्त कलाकार असलेला, सगळ्यात जास्त stunts असलेला, bikini scene, kiss scene असले काहीही तरी चालेल. मग त्यावर जाहिरात चालू करायची.
2) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जशी जवळ येत जाते तसे तसे जमेल त्या वाहिन्यांना मुलाखती देणे सुरु करायचे.हळू हळू तर त्याचा कहर होतो. आणि सगळ्या मुलाखतीत माहिती तर एकाच असते.यातील काही वाक्ये खालीलप्रमाणे -
a) चित्रपटातील अभिनेत्याचे/अभिनेत्रीचे काम हे त्याच्या/तिच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक असते.
b) त्याने/तिने सहकलाकरासोबत प्रचंड मजा, दंगामस्ती केलेल्या असतात.
c) त्याच्या/तिच्या कारकिर्दीतील ही भूमिका अत्यंत वेगळी असते. चित्रपटात जरी एक item dance केलेला असला तरी अभिनेत्री हेच सांगते.
d) चित्रपटाचे लेखक/निर्माते/दिग्दर्शक यांनी फार मेहनत करून चित्रपट बनवलेला असतो, आणि त्याला/तिला पूर्ण मदत केलेली असते.
e) त्याच्या/तिचा सहकलाकार हा/ही एक उत्तम अभिनेता असतो/असते. या दोघांची केमिस्ट्री जुळलेली असते( ??)
f) फक्त अभिनेता/अभिनेत्री म्हणून नव्हे तर हा चित्रपट खरच खूप चांगला, वेगळा असल्यामुळे तो बघावा अशी प्रेक्षकांना विनंती केली जाते.

३) मग जमेल तेवढ्या रियालिटी शोजला हजेरी लावली जाते, हल्ली तसेही कुत्राच्या छत्र्यांप्रमाणे रियालिटी शोज उगवले आहेत. तिथे जावून आपल्याला काहीही काळात नसले तरी स्पर्धकांना काहीतरी बोलून यायचे.

४) एखादी फालतू स्पर्धा सुरु करायची आणि sms, orkut, facebook, twitter वरून त्याचा प्रसार करायचा.

५) मुख्य म्हणजे एखादा वाद ओढवून घ्यायचा. लोकांच्या भावना तर काय, कधीही कशाही दुखावतात. निर्माते हा वाद सुरु करतात असे मी म्हणणार नाही कारण माझ्याकडे पुरावा नाही. :P

६) चित्रपट प्रदर्शनाच्या आधी काहीतरी publicity stunt करायचा. जेल मध्ये जावून एक रात्र काढणे, चित्रपटाचे नाव "wake up sid" आहे म्हणून सिद्धार्थ नावाच्या मुलांना फुकट तिकिटे वाटण्याची घोषणा, चित्रपटगृहात एकट्याने चित्रपट पाहिला तर ५ लाख रुपये देण्याची घोषणा आणि अश्याच इतर घोषणा.

७) आपल्याकडे पुस्तकावर चित्रपट काढायची पद्धत नाहीच. मग त्यामुळे पुस्तकावरून जाहिरातीचा मार्ग कोणी अवलंबत नाही.

८) अखेरीस चित्रपट एकदा प्रदर्शित झाला कि मग जाहिराती एकदम कमी होतात. आणि चित्रपटगृहात चित्रपटाचे House Full शोज चालू आहेत अशी पाटी प्रत्येक जाहिरातीत दिसते.

साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी जाण्यास लोक नाखूष असतात. पण चित्रपटगृह ही एकाच जागा अशी आहे की जिथे गर्दी असली की अजून जास्त लोक जावून अजून जास्त गर्दी करतात.
18

थेंब आणि ठिपका

थेंब आणि ठिपका हे दोन शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येतात ? तुमची कल्पनाशक्ती किती दूर जाउ शकते ? पाण्याचा/रक्ताचा थेंब, रंगाचा ठिपका, ठिपक्यांची रांगोळी याहून आपण जास्त विचार करत नाही.

कालच माझ्या बहिणीने मला एक भन्नाट बातमी दिली. तिच्या ओळखीच्या एका माणसाने आपल्या जुळ्या मुलांची नावे थेंब आणि ठिपका अशी ठेवली आहेत. कारण त्या माणसाला म्हणे पाणी आणि त्याची रूपे आवडतात. हे ऐकल्यावर मी ५ मिनिटे हसतच होतो. स्वत:च्या मुलांची नावे काय ठेवावी हा सर्वस्वी त्याच्या प्रश्न आहे. पण थेंब आणि ठिपका ? त्या मुलांना मोठे झाल्यावर स्वत:च्या नावाविषयी काय वाटेल ? वर्गात मुले त्यांना काय म्हणतील ? त्यांच्या लग्नात त्यांच्या होणाऱ्या बायका स्वत:चे नाव न बदलता त्यांना त्यांचे नाव बदलायला भाग पडतील का ? थेंब आपल्या मुलाचे नाव ठिपका आणि ठिपका आपल्या मुलाचे नाव थेंब ठेवेल का ? आवरा ! मी फारच पुढचा विचार करतो !
0

Time to show the middle finger

Have you always wanted to show politicians the middle finger? Tomorrow is your day. Tomorrow, you will be able to do this officially.

According to Election Commission's new guidelines, tomorrow, when you vote for Maharashtra assembly elections, the officer in charge will ink your middle finger.

As tomorrow is holiday and most of the malls, hotels, multiplexes will be closed , please spare some time to cast your vote wisely. Or for the next five years, your MLA will show you middle finger.

One more interesting observation : For the last Loksabha elections, I received many emails regarding Section 49-O.This time I didn't receive any. Last time, I saw many NGO activists on the street, requesting people to vote. I haven't seen any of them until now. What has happened ? Do these people think that Loksabha election is the only authorized election in India ? Or do have they realized that Punekar don't listen to anybody. So they are not wasting their time and money. Who knows ?

Vote wisely. Enjoy the remaining day.
4

जोगवा

आजच "जोगवा" पाहिला. त्याआधी "गंध" हा चित्रपट पाहिला होता. हल्ली मराठी चित्रपट पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मराठी चित्रपट हल्ली फारच बदलू लागला आहे. "अलका कुबल style" चे चित्रपट हल्ली फार निघत नाहीत.(नसावेत.) वेगळ्या विषयाचे आणि धाटणीचे चित्रपट हल्ली निघू लागले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. सध्याच्या टुकार हिंदी चित्रपटांच्या तुलनेत तर हे मला जास्तच चांगले वाटतात.

जोगवा पण अश्याच वेगळ्या वाटेवरचा आहे. जोगते आणि जोगतीण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे . सुली च्या (मुक्ता बर्वे ) केसात जट निघते येल्लामा देवीच्या चरणी अर्पण करून जोगविण बनवण्यात येते . तायप्पाला (उपेंद्र लिमये) सुद्धा जोगता बनून साडी घालण्यास भाग पडते. अर्थातच दोघांनाही हे स्वीकारणं जड जातं. नव्या पंथामध्ये मिसळून जाताना होणारी त्यांची धडपड, तायाप्पाचे सुरुवातीचे सुलीवरचे अव्यक्त प्रेम, जोगत्यांबद्दल असलेला समाजाचा दृष्टीकोन, तायप्पाला आणि सुलीचे फुलात जाणारे प्रेमाचे नाते बघताना आपण खिळून जातो.

चित्रपटात आवडण्यासारख्या गोष्टी बर्याच आहेत. पहिले म्हणजे विषय. चित्रपट डॉ. राजन गवस यांच्या 'चोंडकं' आणि 'भंडारभोग' या कादंबऱ्यांवर व चारुता सागर यांच्या 'दर्शन' या कथेवर आधारित आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये, किशोर कदम, विनय आपटे यांनी आपापल्या भुमिका अतिशय उत्तम साकार केल्या आहेत. अजय-अतुल चे संगीत तर दर्जेदारच आहे.

चित्रपटात काही गोष्टी जाणवतात. उदा, तायप्पाला किंवा सुली गावातून पळून का जात नाहीत ? शेवटी त्यांनी केलेले बंड पण जरा फिल्मी वाटले. पण या गोष्टी मला फक्त जाणवल्या, खटकल्या नाहीत.

या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तब्बल साठ नामांकने आणि ३७ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (महाराष्ठ्र शासन, पिफ, झी गौरव, मटा सन्मान, संस्कृती कलादर्पण, व्ही शांताराम इत्यादी) पुरस्कार पटकावला आहे.

एवढे सगळे सांगून झाल्यावर "जोगवा पाहाच" असे वेगळे सांगण्याची गरज नाही.
1

Some hilarious videos

I am sharing some hilarious videos which I found funny. Some of them are pretty famous.

Warning : Watch this videos at your own risk. :D

1) Scene from Clerk
This is suppose to be most hilarious scene from Hindi cinema. After watching this scene, I thought Indian Army is totally wasting money in medical facilities. Instead of building hospitals, they should just buy an Ipod for each soldier with only one song in it.

2) Scene from Loha
The tru power of Dharmendra is revealed in this scene.

3) Some pathetic dance items
These are some of the most pathetic dance items I have ever seen. Have a look at this and this

4) Taki ka Taka
Our very own Taki Sawant is getting married! Here some of the videos of her swayamwar. 1 2 3 4 5

5) Eschool ke tem pe
Male & female version. I don't konw why female version is called Nagpuri. Anyone from Nagpur knows ?

6) Eye catching fighting scene
This video will literary bring your eyes out.

7) Meri jaan hai radha
Video & lyrics both are awesome. I am sure these kids in the video will commit suicide when they will realize what they have done.

8) Reporter
How can you forget the most dedicated reported in Pakistan ?

9) Doyal Baba
This is live dance show of Doyal baba.

10) Sunny Deol
How can we miss Sunny Deol ? This is his extraordinary dance & this is his interview with Taki Sawant

11) South Indian movies
South Indian movies are full of imagination & creative ideas. Here is some of the genius piece of work from South Indian movies. 1 2 3 4 5 6 and 7

Hopefully I will be posting another set of such videos in some days.
17

साडी, दारू आणि खेळणी

Azingo चे canteen म्हणजे आमच्यासाठी एक भन्नाट जागा आहे. ऑफीसची coffee पिता पिता आमची कल्पनाशक्ती अगदी गगनात भराऱ्या मारत असते. "साडी, दारू आणि खेळणी " हि आमची आजची कल्पना !

साडी, दारू आणि खेळणी यांची दुकाने शेजारी शेजारी टाकायची. म्हणजे बायको साड्या खरेदी करत असताना नवरा शेजारच्या बार मध्ये जावून पेग मारत बसेल आणि लहान मुलगा खेळण्यांच्या दुकानात रमेल. दुसऱ्याला वेळ लागतोय म्हणून कोणी कंटाळणार नाही. संपूर्ण कुटुंबाचे हमखास मनोरंजन होण्याची खात्री ! (कुटुंबात आजी, आजोबा असतील तर ते घरी TV वर daily soap बघत असतील असे गृहीत धरण्यात आले आहे.)


फक्त दुकानाबाहेर आल्यावर ३ माणसे लागतील. एक बायकोनी खरेदी केलेल्या साड्या सांभाळण्यासाठी, एक मुलाला सांभाळण्यासाठी (हे काम मुलाची आईपण करू शकते.) आणि शेवटचा नवऱ्याला सांभाळण्यासाठी.

इथून कल्पनाशक्ती कितीही पुढे जाउ शकते. साडीवर १ पेग फ्री, quarter वर खेळणे फ्री अश्या अनेक ऑफर्स देता येतील. विजय मल्ल्याला ही कल्पना विकता येवू शकेल का यावर सध्या विचार करतोय.

Update : जर तुम्ही पोस्टवरील comments वाचत नसाल तर सलील ने या दुकानासाठी "अपाची'स शगुन खेळीया" असे नाव सुचवले आहे आणि नचिकेतने ह्या दुकानाच्या जाहिरातीचासुद्धा विचार केला आहे.

रेडियो वर अशी जाहिरात करता येइल (कुठली तरी weird tune ... may be "साहेब म्हणतो" वाली ...)
(टिंग टॉंग)
(टिकटिकीटिकटिक .. )
आई म्हणते साडी साडी,
छबू म्हणतो गाडीगाडी ..!
बाबा म्हणला ताडीताडी ...
......................
घाबरू नका, सादर आहे, नव्या युगाचा नवीन मॉल, "अपाची'स शगुन खेळीया",
जिथे साडी ही आहे, आणि साकी ही आहे,
पदर लुंगी ही आहे, आणि घसरगुंडी ही आहे,
जिथे डब्बल घोड़ा आहे आणि Royal Stag ही आहे ...

अनेक गरजा आणि एकच Absolute तोडगा !
........... "अप्पाचे शगुन खेळइया" !
५, कुमठेकर रोड, पुणे.

(टिंगटॉंग )
3

शिवरायांचे आग्र्याहून पलायन आणि आजचे राजकारणी

स्टार प्रवाह वरच्य़ा "राजा शिव छत्रपती" या मालिकेत सध्या शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग दाखवत आहेत. हा प्रसंग सर्वांनाच माहित असेल. शिवरायांना नजरकैदेत ठेवल्यावर त्यांनी आजारी पडल्य़ाचे नाटक केले. मग बरे होण्यासाठी त्यांनी साधुसंताना आणि मग पर्यायाने पहारेकर्य़ांनापण मिठाई वाटप सुरु केले.

आज तो प्रसंग बघताना मला अचानक लक्षात आले की आपल्य़ा तमाम राजकारण्यांनी शिवरायांच्य़ा या प्रसंगातून धडा घेतला आहे. जेंव्हा केंव्हा या नेत्यांना अटक होते किंवा अटकेची चिन्हे स्पष्ट दिसतात, तेंव्हा लगेचच हे नेते "आजारी पडतात". पद्मसिंह पाटील, स्वरुपसिंह नाईक यांची उदाहरणे ठळक आहेत. स्वरुपसिंह नाईक यांनी तर शिक्षेचा पुर्ण एका महिन्याचा कालावधी रुग्णालात व्यतीत केला. तिथे हे लोक मिठाई किंवा इतर गोष्टी वाटतात की नाही याचा पुरावा नाही. पण हल्ली अश्या गोष्टी वाटल्य़ावर स्वतःहून पळून जाण्य़ाची आवश्यकता नसते. कोर्टच तुमची सुटका करते. पक्ष बदलण्य़ाची सुरुवात जशी बिभीषणानी रामायणकाळात केली तशी ही आजारी पडण्य़ाची सुरुवात स्वतः शिवरायांनी सुरू केली आहे. आणि शिवरायांचे अनुकरण तर केलेच पाहिजे ना ! :-P
3

Why do I like Altaf Raja ?

When I say to my friends that I like Altaf Raja (his songs, of course), they give me very strange expressions. Their expressions suggests that I am not worth living. But yes, I like Altaf Raja. Why ? There are numerous reasons. First of all, lyrics of his songs & secondly the way he sings.

Now, consider this particular song "yaaron maine panga le liya". What is our initial assumption from the title ? We think that he has taken panga with some Gundas or he is behind sister of some Neta or Aamir Aadami. Now, have a look at the lyrics of the song. [My expression in bracket]

vo bhi anjaan thi main bhi anjaan tha
usase vaada na tha kuch iraada na tha
bas yoon hi darling kah diya
O yaaron maine panga le liya

[WTF ? Where is the panga part ? Now we listen carefully to know what happens next..]

pahale to usane choti ko jhataka diya
apani gardan ko thoda sa mataka diya
main ye samajha mere jaal mein phans gayi
dekh daale ek pal mein sapane kai
phir achanak hi ek haadasa ho gaya
jiske sapanon mein main tha khoya hua
usane dekha idhar aur na dekha udhar
aur usi darling ne mere gaal par ek bharpoor thappad diya
yaaron maine panga ... || 1 ||

[We still don't see the panga part. This is expected behavior from any normal girl for any ordinary male]


pi raha tha main ek din beer bar mein
log khoye the music ki jhankaar mein
ek ladka sharaab is kadar pi gaya
apane saathi se takraar karne laga
maine samjhaaya use bade pyaar se
are faayada kya hai aapas ki takaraar se

[See, how seriously Altaf wants to bring peace in the world. Why doesn't he tell the same thing to Presidents of India & Pakistan ? Then he will surely get nobel prize for peace. But he is working at micro level, That too, in a beer bar. So no one takes him seriously :( ]

vo nashe mein gale mere padane laga
chhod kar vo use mujhase ladane laga
laal peela mujhe kar diya
haay yaaron maine panga ... || 2 ||

[Now this is what happens when one innocent man tries to help others in this society. ]


door ke ek rishte ki baaraat mein
mera jaana hua doolhe ke saath mein
maine usase kaha baat hi baat mein
shaadi vaadi mat kar aaise haalaat mein
kuch zara soch to kitni mahangaai hai
waqt hai bhaag ja aage rusavaai hai

[See, how much a common man is affected by this mahangaai ? One has to think twice before marriage. Thanks to Congress government ! BJP is not different !! ]

sabko chaunka diya itni si baat mein
khoob peeta mujhe saari baaraat ne
bhaagane ka na mauqa diya
haay yaaron maine panga le liya... || 3||

[I think remaining people beat him just because they were going to miss the lunch at marriage place. Everyone has different view on a single issue.]


ek numaaish ka charcha bahut aam tha
shahar ki har gali mein bada naam tha
usamein kushti ka ek program tha
har vijeta ko do laakh inaam tha
not ki chaah mein ek pahalavaan se
maine kushti ladi itani ghamaasaan se
dam ukhadane laga pasaliyaan bol utheen
vo munh mera tod ke rakh diya
uf yaaron maine panga ... || 4||

[This is what happens when we take opponent for granted. There is so much to learn from his experience. ]


Raah me ek bhikaari se takara gaya
Main ye bola ke tu des ko kha gaya
Hattakatta tha, gusse me wo aa gaya
Uske tewar jo dekhe to ghabara gaya
Punch aisa diya, main to chakara gaya
Un main apne kiye ki sajaa pa gaya
sajaa pa gaya, maine ye kya kiya
Wo bhikari na tha, na tadipar tha
Especail wala tha, wo hawaldar tha
Muzko lock up main pahuncha diya
Hai yaaron maine panga ... || 5||


[In this final lines, Altaf talks about problems created by bhikaris & policewala. But if a man can't differentiate between bhikari & police and who start delivering lectures about des & des bhakti without any reason to anyone, then he got the right treatment by policewala. ]

While singing this song, Altaf says "confusion" between some lines . So I am confused about this "confusion" word. What can be the possible significance of this ? Or Altaf just wants to confuse us with "confusion" ? I think this is "Paraag confusion" (Saree me saree, Paraag saree, waise confusion me confusion, Paraag confusion.)


Generally, duration of Altaf's song is more than 5 minutes, Above one lasts for 10.26 minutes. His other masterpiece "Tum to thehere pardesi" continues for 14.32 minutes. Total peace time for me.

I hope, I have helped you to change your opinions about Altaf Raja. Finally its your decision whether or not to take panga with Altaf.
5

दहावीची परीक्षा !

दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यावरून मला मी दहावीमध्ये असतानाच्या एका प्रसंगाची आठवण झाली.

दहावीमध्ये असताना रस्त्यावरून येता जाता दिसणाय्रा लोकांचा कधी कधी आम्हाला हेवा वाटे. आम्ही "दहावीग्रस्त" त्य़ांच्याकडे बघुन विचार करत असू कि "च्य़ायला, या सगळ्य़ा लोकांनी दहावीची परीक्षा दिली आहे. आता कसे आरामात फ़िरत आहेत हे लोक !"

आता मी जेव्हा दहावीच्या मुलांकडे बघतो तेव्हा मला त्य़ांचा हेवा वाटतो.
'The grass is always greener on other side' म्हणतात हेच खरे !
2

Delhi 6 - Fast forward review

कालच Delhi 6 हा चित्रपट fast forward मध्ये पाहाण्य़ाचा योग आला. पुर्ण चित्रपट normal speed मध्ये पाहाण्याचे धैर्य काही झाले नाही.

चित्रपट बघितल्यावर समजले की एकही story पुर्ण झालेली नाही. "काळे माकड" (असते असे खरेच काहीतरी, अनिल कपूर् नव्हे ःP) सापडत नाही. अहो, सापडले तर news channels ना नवीन प्राणी शोधावा लागेल. बिट्टु (हिरवीण) indian Idol बनत नाही. खरे म्हणजे हिंदी चित्रपटाची हिरवीण ती, अमेरिकेची प्रमुखपण बनू शकली असती, पण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, अभिषेक (हिरो)ची आजी मरत नाही. जी म्हातारी, अखेरचे दिवस शांततेत घालवण्यासाठी नातवाला भारतात घेवून येते, चक्क तीच मरत नाही. हे म्हणजे नायिकेने नदीजवळ जावूनपण आंघोळ न करण्यासारखे आहे. अरे, प्रेक्षकांची किती फ़सवणूक कराल ?

कदचित, या चित्रपटाचा पुढचा भाग Delhi -7 या नावाने येणार असेल, ज्यात हे सर्व घडेल !