3

आप का सुरूर : एक अनुभव

स्थळ : कोणत्यातरी कंपनीमधील मुलाखत
प्रश्नकर्ता : तुमचे गुण सांगा.
मी : मी सहनशील आहे... ई. ई (स्वत:चीच स्तुती काय करायची ? :P)आजच ती सहनशीलता पडताळून पाहण्याचा योग आला. सकळी ९ ते २ वाजेपर्यंत वाट बघितल्यावर ३ मिनिटांत oral पार पडली आणि १ तास थांबल्यावर project report चे काम फ़त्ते झाले. ही तर माझ्या मते ती फ़क्त एक झलक होती.


घरी आल्यावर हिमेश रेशमियाचा आप का सुरूर हा चित्रपट बघितला. मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की मी हिमेशचा कोणत्याही बाबतीत चाहता नाही. मी त्याचे १ गाणेही पुर्ण बघितलेले नाही. इथे तर २ तासांचा पूर्ण चित्रपट होता ! आणि मी तो अथपासून इतीपर्यंत न थांबता एकट्याने बघितला. एकट्याने बघणे हॆ महत्वाचे आहे. कारण जेंव्हा मी दुसर्यांसोबत हिंदी चित्रपट बघतो तेंव्हा चित्रपटातील प्रत्येक वाक्यानंतर माझ्या मौलिक शेरेबाजीने दुसर्यांना हैराण करतो.(जिद्न्यासूंनी अधिक माहितीसाठी कमलेशकडे चौकशी करावी !) आता तर मी एकटाच होतो. चित्रपट संपल्यावर मलाच माझ्यातील शक्तीचा पडताळा झाला. माझी जीवनलालसा किती तीव्र आहे, माझी सहनशक्ती किती दांडगी आहे याचा मलाच साक्षात्कार झाला. आणि आता मी जेंव्हा मी हा post लिहीत आहे तेंव्हा तर मी स्वत:ला धन्यच समजतोय !


आता ज्यांना या चित्रपटाच्या परिक्षणात रस आहे त्यांच्यासाठी थोडेसे. हिमेशचा चित्रपट असल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच तो अतिशय भंगार आहे. नायिकेचा चेहरा (अभिनय नव्हे) हीच काय ती बघण्यासारखी गोष्ट आहे. बाकी सर्व बाबतींत बोंबाबोंब आहे. एखादी चिल्लर मारामारीपण नाही. मला वाटले की एखादीतरी मारामारी असेल ज्यात हिमेश आपल्या दर्जेदार आवाजात " कुत्ते कमिने, मै तेरा खून पी जाऊंगा " असले काहीतरी संवाद फ़ेकेल, पण हिमेश कडून अपेक्षा तरी कशा ठेवाव्या ? चित्रपटाच्या नावातील सुरूर या शब्दाचा अर्थ मी अजुनही शोधत आहे ! :P

आता मी करण जोहरच्या K series मधील चित्रपट पाहण्याची हिम्मत गोळा करत आहे.