0

शिल्पकार

जय पराजय तर नशीबाचाच भाग आहे
परंतु प्रयत्न करणे मात्र तुझ्याच हातात आहे

ऊठ ! हो तयार ! दाखव साय्रा जगाला -
ढगाळलेल्या आकाशातसुद्धा सुर्य मावळलेला नसतो ,
तो अविरतपणे तळपतच असतो, परंतु
जगाला तो सुर्याचा पराभवच वाटतो

प्रयत्न करणाय्रा सगळ्यांनाच यश मिळत नाही
परंतु तुझ्यासारख्यांना ते मिळूनही
त्याचे श्रेय मिळत नाही

काय चांगले ! काय वाईट ! हे केवळ नजरेवर अवलंबून ,
कनिष्टांकडे बघितलेस तर तू श्रेष्ठ होशील ,
श्रेष्ठांकडे पाहिलेस तर स्वताला कनिष्ठ समजशील
म्हनूनच कोनशीही तुलना करू नकोस
दुसय्रांनी केलेल्या तुलनेकडे लक्षही देवू नकोस
कारण हिरा जरी मातीत पडला तरी -
तो हिराच राहतो, त्याचे ढेकूळ बनत नाही

या समाजाच्या चौकटीत राहीलास तर -
तू स्वतंत्र अवस्थेत बांधला जाशील ,
’हे कर, ते करु नको’ अशा लोकांकडून -
जे स्वत:चे निर्णयही घेवू शकत नाहीत

म्हणूनच चाकोरीबाहेर पड
काहीतरी भव्यदिव्य करुन दाखव
कारण प्रत्येकालाच शिवाजी हवा असतो
पण दुसय्राच्या घरात जन्मलेला

पेटू दे तुझ्यातला अग्नी,
दिपवून टाक साय्रा जगाला
निष्प्रभ कर त्या परशुरामाला
ज्याने एकवीस वेळा जिंकले या विश्वाला

तु गायींच्या कळपात आलेला वनराज आहेस,
पण स्व:ताला गाय समजून बसला आहेस
म्हनूनच हा सर्व खटाटोप
कारण -
जय पराजय तर नशीबाचाच भाग आहे
परंतु प्रयत्न करणे मात्र तुझ्याच हातात आहे

This is my first post in marathi. So errors may present. Though I support Mozilla Firefox, my experience is that IE is better for marathi (at least today!).

0 प्रतिक्रिया: